फोटो सौजन्य: सोशल मीडिया
रिओ दि जानेरो: नुकतीच ब्राझीलच्या रिओ दि जानेरोत G-20 शिखर परिषदत पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिशदेसाठी उपस्थित राहिले होते. त्यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील या परिषदेसाठी गेले होते. पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती एचई प्रबोवो यांची G-20 परिषदेत पहिल्यांदा भेट घेतली. यादरम्यान एस. जयशंकर यांनी देखील इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीदरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती यांनी एच.ई. प्राबोवो सुबियांतो यांनी जयशंकर यांचे कौतुक केले.
मी तुम्हाला ओळखतो- इंडोनेशियाचे राष्ट्रपती
G-20 देशांच्या परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जेव्हा इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी भेटण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी हात पुढे करताच म्हटले की, मी तुम्हाला ओळखतो. हे ऐकून जयशंकर यांना कूप आनंद झाला. सुबियांतो यांनी एस जयशंकर यांच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक केले. तसेच पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी देखील जयशंकर यांच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हटले की, “कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाने तुमच्याशी असे बोलणे ही मोठी गोष्ट आहे”. तर दुसरीकडे, कमर चीमा यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.
कमर ची मा यांनी एस. जयशंकर यांचे केले कौतुक
कमर चीमा यांनी पंतप्रधान मोदींनी म्हटले की, जयशंकर जर या पदावर नसतील तर नरेंद्र मोदींना त्यांची केस जगासमोर स्पष्ट करणे कठीण जाईल. त्यांनी भारताच्या सरकारसाठी खूप चांगले काम केले आहे. याशिवाय कमर चीमा यांनी असेही म्हटले की, जयशंकर साहेबांना कोण ओळखत नाही. करोडो लोकसंख्या असलेल्या बारतासारख्या देशात त्यांनी पाच वर्षे परराष्ट्र मंत्री पद भूषवले.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
त्यानंतर देखील दुसऱ्यांदा हे पद मिळे खूप मोठी बाब आहे. तसेच, जयशंकर साहेबांच्या व्यक्तिमत्वावर चर्चा व्हायला हवी. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला बरीच गती दिली आहे.तसेच त्यांनी इंडोनेशिया, मलेशिया, यूएई आणि सौदी अरेबिया हे देश भारताचे इतके चांगले मित्र असतील, असे कोणीही कधी विचार केले नसेल. मात्र पाकिस्तान यातही अपयशी ठरला आहे असेही त्यांनी म्हटले.
कमर चीमा यांची पाकिस्तानच्या मंत्री निवड प्रक्रियेवर चिंता व्यक्त
पाकिस्तान एक्सप्रट कमर चीमा यांनी पाकिस्तानच्या मंत्री निवड प्रक्रियेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी याबाबत आपले मत मांडताना म्हटले की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांना अर्थमंत्री बनायचे होते, पण त्यांना परराष्ट्र मंत्र्याचे पद दिले गेले. ते अर्थव्यवस्थेवर खूप चांगले नियंत्रण ठेऊ शकतात. मात्र पाकिस्तानच्या चुकीच्या निर्णय चांगलाच महागात पडला. जयशंकर यांच्यासारख्या सक्षम व्यक्तीला पाकिस्ताननेही परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त करायला हवे होते, असे मला वाटते. असे कमर चीमा यांनी म्हटले.