Turkey's president criticizes Israel's actions in Gaza
Turkey’s Erdogan on Israel : इस्तंबूल : तुर्कीचे (Turkey) राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी इस्रायलवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी इस्रायलच्या गाझातील कारवायांना विरोध केला आहे. गाझात मोठ्या प्रमाणात नरसंहार केल्याचा आरोप नेतन्यांहूनवर करण्यात आला. त्यांच्या या आरोपांमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान एर्दोगान यांनी इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी हमास दहशतवादी संघटना नसल्याचेही म्हटले आहे.
काय म्हणाले एर्दोगान?
गाझातील परिस्थितीवर बोलताना एर्दोगान यांनी त्याला नरसंहार म्हणून वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाझात जे काही सुरु आहे तो केवळ संघर्ष किंवा कोणतीही लढाई नाही, तर स्पष्टपणे नरसंहार आहे. यासाठी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांना जबाबादार धरत त्यांच्या सैन्याला दिलेल्या आदेशांमुळे गाझातील हजारो निरापराध लोक मरत असल्याचे म्हटले आहे.
याच वेळी एर्दोगान यांना संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान हमासवर पत्रकारांकडून विचारण्यात आले की, तुर्की हमासला दहशतवादी संघटना मानतो का? यावर उत्तर देताना एर्दोगान यांनी ठामपणे नकार दिला. त्यांनी म्हटले की, हमास ही दहशतवादी संघटना नाही तर, एक प्रतिकार चळवळ आहे. हमासचे लोक त्यांच्या भूमीचे आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी लढत आहेत.
तुर्कीने सांगितले की, इस्रायलच्या गाझातील कारवायांमुळे आतापर्यंत १,२०,००० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहे. या जखमींसाठी तुर्कीने वैद्यकीय उपाचाराची आणि त्यांना बाहेर काढण्याची सोय गाझामध्ये केली आहे. तसेच गाझातील इस्रायलच्या हत्याकांडाला तीव्र विरोध केला आहे.
एर्दोगान यांनी हमासने कैद केलेल्या ओलिसांबद्दल बोलताना म्हटले आहे की, यासाठी केवळ हमासला दोष देणे योग्य ठरणार नाही. इस्रायलच्या गाझातील आक्रमक पावलांमुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रायलवर गाझातील नागरिकांना विशेष करुन महिला आणि मुलांना एक शस्त्र म्हणून वापरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एर्दोगान यांनी याला मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेवरही टीका केली आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे इस्रायल गाझातील कारवायांना सुरु ठेवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तुर्कीचे पंतप्रधान एर्दोगान यांनी इस्रायलवर काय आरोप केले?
तुर्कीचे पंतप्रधान एर्दोगान यांनी गाझातील इस्रायलच्या कारवायांना नरसंहार म्हणून संबोधले असून बेंजामिन नेतन्याहू यांच्यामुळे हे घडत असल्याचे म्हटले आहे.
हमासवर तुर्कीची काय भूमिका आहे?
एर्दोगान यांनी हमास दहशतवादी संघटना नसून एक प्रतिकार चळवळ असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, हमासच्या स्वसंरक्षणासाठी युद्धाचा मार्ग अवलंबवत आहे.
गाझातील लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी तुर्कीने कोणती पाऊले उचलली?
जॉर्जिया मेलोनींचेही सरकार कोसळणार? इटलीच्या रस्त्यांवर हिंसक निदर्शने सुरु, नेमकं कारण काय?