
israel terror attack today
ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या पहाटे फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य?
इस्रायलच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बेत शेआन शहरात झाला आहे. एका पॅलेस्टिनी हल्लेखोराने गर्दीक कार घुसवून लोकांना चिरडले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. हल्लेखोराने तिथून पळ काढला. त्याने आपले वाहन जागीच सोडले. या हल्लेखोराने पूढे जाऊन इस्रायलच्या अफुला शहरात एका महिलेवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महिला जागीच मृत्यूमुखी पडली. याशिवाय आणखी एक व्यक्ती देखील जखमी झाले. एकापाठोपाठ या दोन हल्ल्यांमुळे इस्रायल हादरला आहे.
या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांशी चकामकीत त्याला गोळी लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दोषीला शिक्षेचे आश्वासनही दिले आहे. त्यांनी मृतांची ओळख जाहीर करताना सांगितले की, किशओ अवीव माओर (वय ६८) आणि शिमशोन मोर्देताई यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा इस्रायलमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जातील असेही नेतन्याहूंनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील हल्लेखोराच्या गावात कबातियामध्ये मोठी कारवाई सुरु केली आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच संशयितांचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यामागचे कारण सध्या अस्पष्ट असून नेतन्याहूंनी याच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देखील या विरोध करत तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये ज्यू समुदायाच्या लोकांवर हल्ला करण्यात आला होता. हनुक्का फेस्टिव्हल दरम्यान लोकांवर सामूहिक गोळीबार करण्यात आला होता. तर यानंतर एका यहूदीच्या घराखाली त्याच्या कारवाई बॉम्ब फायरिंग करण्यात आले होते. या हल्ल्यांचाही इस्रायलने तीव्र निषेध नोंदवला होता.