ऑस्ट्रेलिया पुन्हा हिंसाचार! मेलबर्नमध्ये ख्रिसमसच्या सकाळी रब्बी कारवर फायरिंग, यहूदींना पुन्हा लक्ष्य? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२५ डिसेंबर) ख्रिसमसच्या पहाटे २.५० वाजता बालाक्लावा रोडवरील एका रब्बी घराच्या बाहेर हल्ला करण्यात आला आहे. घराबाहेर ड्राइव्ह-वेममध्ये उभ्या असलेल्या हॅप्पी हनुक्का लिहिलेल्या एका कारला लक्ष्य करण्यात आले. यामुळे हा हल्ला यहुंदीवरील हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बोडीं बीचवरील हल्ल्याच्या ११ दिवसानंतरच हा हल्ला झाल्याने ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी गाडीवर फायर बॉम्ब फेकला.
सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु यहुंदीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तसेच रब्बीच्या कुटुंबाला देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर व्हिक्टोरिया पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. घटनास्थळावरुन पुरावे, सीसीटीव्हीज फुटेजची पाहणी केली जात आहे. पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली आहे. सध्या त्याच्या शोध सुरु आहे.
या हल्ल्याच्या ११ दिवसांपूर्वीच बोंडी बीचवर भीषण गोळीबार (Firing) झाला होता. ज्यामध्ये १५ निरापराध लोकांचा बळी गेला होता. यहुदींच्या पवित्र सण हनुक्का दरम्यान हा हल्ला करण्यात आला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. जगभरातून अनेकांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला होता. तसेच पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील याला विरोध केला होता.
नुकत्याच ताज्या घडलेल्या हल्ल्याचा देखील पंतप्रधान अल्बानीज यांनी निषेध नोंदवला आहे. त्यांनी याला अँटी-सेमिटिझमचे स्वरुप म्हटले आहे. तसेच त्यांनी ऑस्ट्रेलियात दहशत, द्वेष आणि धार्मिक हिंसाचाराला कोणत्याही प्रकारची जागा नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी आरोपीला देखील कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट
Ans: ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा मेलबर्न येथे सेंट किलडा ईस्ट भागात एका यहुदीच्या कारवार फायरिंग करण्यात आली आहे.
Ans: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मेलबर्न येथील हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून देशात कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद, द्वेष आणि धार्मिक हिंसाचाराला जागा नसल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपीला कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.






