Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Kuwait Attack : इराण हल्ल्यात कुवेती अधिकाऱ्यांचा मृत्यू; संपूर्ण देश शोकाकुल, गृह मंत्रालयाने वाहिली श्रद्धांजली

Israel-Iran War: इराणने कुवेत विमानतळावर इंधन टँकरवर हल्ला केला, ज्यामध्ये दोन कुवेती अधिकारी ठार झाले. गृह मंत्रालयाने त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि देशाच्या संरक्षणातील त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 08, 2026 | 12:45 PM
two kuwaiti officers martyred in iranian attack on airport fuel tanks

two kuwaiti officers martyred in iranian attack on airport fuel tanks

Follow Us
Follow Us:
  • कुवेती अधिकारी शहीद
  • इराणचा विश्वासघात
  • देश शोकाकुल

Kuwaiti officers martyred in Iran attack 2026 : मध्यपूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता केवळ लष्करी संघर्षच नाही, तर माणुसकी आणि विश्वासालाही तडा दिला आहे. ज्या इराणने काल जगासमोर आखाती देशांची माफी मागितली होती, त्याच इराणने आज रविवारी सकाळी कुवेतच्या भूमीवर रक्ताचा सडा घातला आहे. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टँकरला लक्ष्य करून केलेल्या या हल्ल्यात कुवेतच्या दोन अत्यंत निष्ठावान आणि शूर अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुवेत देशावर शोककळा पसरली असून, इराणविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

कर्तव्य बजावताना आहुती: कोण होते ते दोन शूर अधिकारी?

कुवेतच्या गृह मंत्रालयाने अत्यंत जड अंतःकरणाने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या वीरमरणाची माहिती दिली आहे. लेफ्टनंट कर्नल अब्दुल्ला इमाद अल-शर्राह आणि कॅप्टन फहाद अब्दुलअजीज अल-मजमूद अशी या दोन शहीद वीरपुत्रांची नावे आहेत. हे दोन्ही अधिकारी कुवेतच्या ‘भू-सीमा सुरक्षा विभागा’त (Land Border Security Department) कार्यरत होते. रविवारी सकाळी जेव्हा इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे विमानतळाच्या दिशेने झेपावली, तेव्हा हे अधिकारी विशेष सुरक्षा कार्यांतर्गत आपली सेवा बजावत होते. देशाच्या सीमांचे रक्षण करत असतानाच इराणच्या एका क्षेपणास्त्राने त्यांचा बळी घेतला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे

गृह मंत्रालयाकडून भावूक श्रद्धांजली

शहीद अधिकाऱ्यांच्या बलिदानाचे स्मरण करताना कुवेतच्या गृह मंत्रालयाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “आम्ही आमच्या दोन शूर पुत्रांच्या हौतात्म्याबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. लेफ्टनंट कर्नल अब्दुल्ला आणि कॅप्टन फहाद यांनी आपल्या मातृभूमीच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांचे हे शौर्य कुवेत कधीही विसरणार नाही,” अशा शब्दांत मंत्रालयाने भावना व्यक्त केल्या आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कुटुंबाप्रती संपूर्ण देशाने सहवेदना व्यक्त केल्या असून, त्यांचे बलिदान कुवेतच्या सुरक्षा दलांना अधिक मजबूत करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

इराणचा दुटप्पी चेहरा: काल माफी, आज हल्ला!

या हल्ल्याची सर्वात संतापजनक बाजू म्हणजे त्याची वेळ. केवळ २४ तासांपूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दूरदर्शनवरून आखाती देशांची जाहीर माफी मागितली होती. “जोपर्यंत आमच्यावर हल्ला होत नाही, तोपर्यंत आम्ही शेजाऱ्यांना लक्ष्य करणार नाही,” असे मोठे विधान त्यांनी केले होते. मात्र, इराणमधील कट्टरपंथी लष्करी गट IRGC (इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स) ने राष्ट्रपतींच्या या ‘माफीनाम्या’ला कचऱ्याची टोपली दाखवत आज सकाळी कुवेत, सौदी आणि बहरीनवर हल्ल्यांचा वर्षाव केला. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, इराणमध्ये राजनैतिक नेतृत्व आणि लष्करी नेतृत्व यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gulf War 2026: सौदीचा संयम सुटला! इराणला दिला थेट युद्धाचा इशारा; ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाल्यास तेहरान मोजणार मोठी किंमत

सुरक्षा हाय अलर्टवर; युद्धाचे सावट गडद

कुवेत विमानतळावरील या हल्ल्यानंतर संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुवेतची सुरक्षा दले आता ‘हाय अलर्ट’वर असून, देशाच्या सीमा आणि महत्त्वाची ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. इराणने आपल्या शेजारील देशांवर केलेल्या या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील शांततेच्या सर्व आशा आता धुळीला मिळाल्या आहेत. या दोन अधिकाऱ्यांच्या बलिदानामुळे कुवेत आता इराणला सडेतोड उत्तर देणार का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुवेतमध्ये शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे काय आहेत?

    Ans: शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे लेफ्टनंट कर्नल अब्दुल्ला इमाद अल-शर्राह आणि कॅप्टन फहाद अब्दुलअजीज अल-मजमूद अशी आहेत.

  • Que: इराणने कुवेतमध्ये नेमके कुठे आणि कसे हल्ले केले?

    Ans: इराणने कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टँकर सुविधेला लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात सुरक्षा कर्तव्यावर असलेले अधिकारी शहीद झाले.

  • Que: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या माफीनंतरही हे हल्ले का झाले?

    Ans: इराणमधील लष्करी गट IRGC ने राष्ट्रपतींच्या भूमिकेचा विरोध केला असून, इराण सरकारवर लष्कराचे वर्चस्व असल्यामुळे माफीनंतरही हे हल्ले सुरूच राहिले.

Web Title: Two kuwaiti officers martyred in iranian attack on airport fuel tanks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
1

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ
2

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ

Mojtaba Khamenei : हवाई हल्ल्यात जखमी, रुग्णालयाचा विध्वंस अन् सुटका; अमेरिकन हल्ल्यातून  कसे वाचले मोजतबा खामेनी?
3

Mojtaba Khamenei : हवाई हल्ल्यात जखमी, रुग्णालयाचा विध्वंस अन् सुटका; अमेरिकन हल्ल्यातून कसे वाचले मोजतबा खामेनी?

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
4

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.