Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले…’, पाकिस्तानच्या खास मुस्लिम मित्र देशाकडून भारताची तोंडभरून स्तुती

UAE visa on arrival Indians :  पाकिस्तानचा पारंपरिक मुस्लिम मित्र मानला जाणारा संयुक्त अरब अमिराती (यूएई) सध्या भारतासोबतच्या संबंधांना अधिक प्राधान्य देत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 30, 2025 | 05:00 PM
UAE envoy Abdulnasser Alshali said expanding Visa on Arrival for Indians reflects strong India-UAE ties

UAE envoy Abdulnasser Alshali said expanding Visa on Arrival for Indians reflects strong India-UAE ties

Follow Us
Close
Follow Us:

UAE visa on arrival Indians :  पाकिस्तानचा पारंपरिक मुस्लिम मित्र मानला जाणारा संयुक्त अरब अमिराती (यूएई) सध्या भारतासोबतच्या संबंधांना अधिक प्राधान्य देत असून, दोन्ही देशांतील राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्याला नवे उधाण आले आहे. याच अनुषंगाने, यूएईने भारतीय नागरिकांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ कार्यक्रमाचा विस्तार करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १३ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झालेल्या या धोरणामुळे, भारत आणि यूएईमधील प्रवास अधिक सुलभ आणि विस्तृत झाला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यातील सीमापार संधी आणि सहभागात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

यूएई दूतावासाकडून भारताच्या भूमिकेचे खुले कौतुक

भारत-यूएई संबंधांबाबत यूएईचे भारतातील राजदूत अब्दुलनासेर अलशाली यांनी मोठे वक्तव्य करत म्हटले की,

“भारतीय नागरिकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल कार्यक्रमाचा विस्तार हा भारतासोबतच्या आमच्या कायमस्वरूपी आणि विश्वासार्ह भागीदारीचे प्रतिबिंब आहे. हा निर्णय केवळ व्यवहारिकच नाही तर दोन राष्ट्रांतील लोकसांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक देखील आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, या निर्णयामुळे कुटुंबांना पुन्हा एकत्र येण्यास, व्यवसायिक सहकार्य वाढवण्यास आणि जागतिक व्यापारात सहभाग घेण्यास मोठा हातभार लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिमाचलमध्ये 72 तासांची गुप्त बैठक; चीनची अस्वस्थता वाढली, भारताचे धोरण ठाम

प्रवेशासंदर्भातील नियम सुलभ, पर्यटनास चालना

यूएईच्या नवीन धोरणानुसार, आता ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, कोरिया आणि सिंगापूर यांसारख्या देशांतील वैध निवास परवाने असलेले भारतीय नागरिक कोणत्याही यूएईच्या प्रवेश बिंदूवर ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ सुविधा घेऊ शकतात. या निर्णयाचा भारताला मोठा फायदा होणार आहे. एकट्या २०२३ मध्ये ४.५ दशलक्ष भारतीयांनी यूएईला भेट दिली होती. पर्यटन, गुंतवणूक आणि वैद्यकीय प्रवासासाठी यूएई हे भारतीयांसाठी एक प्रमुख गंतव्य बनले आहे.

भारत-यूएई मैत्रीचा ऐतिहासिक प्रवास

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय संबंध सतत बळकट होत आले आहेत.

1. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक यूएई भेटीने दोन्ही देशांमधील संबंध नव्या टप्प्यावर गेले.

2. २०२२ मध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, व्यापार आणि गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली.

या अनुषंगाने, यूएई दूतावासाने स्पष्टपणे नमूद केले की,

“गतिशीलता ही केवळ व्यवहारिक गरज नाही, तर परस्पर विश्वासाचे आणि सहकार्याचे प्रतीक आहे.”

द्विपक्षीय संबंधांना बळकटी देणारा निर्णय

यूएई मिशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,

“प्रवेशामधील अडथळे दूर करून आणि सीमापार हालचाली सुलभ करून, ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ उपक्रम हा नागरिक, गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यातील सक्रिय संवादाला चालना देतो आणि द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करतो.”

भारत-यूएई CEPA कौन्सिलनेही आपल्या अहवालात या धोरणाचे स्वागत करत म्हटले की, कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि व्हिसा सुलभता हे आर्थिक सहकार्याच्या वाढीसाठी महत्त्वाचे टप्पे आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ग्रोसी’च ठरला इराणवर झालेल्या हल्ल्याचे कारण? डेली इराण मिलिटरीने केला अत्यंत ‘गंभीर’ आरोप

भारत-यूएई संबंध

यूएईने भारतीय नागरिकांसाठी घेतलेला हा निर्णय राजनैतिक संबंधांपुरताच मर्यादित न राहता, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे भारत-यूएई संबंध विश्वास, सुलभता आणि परस्पर सहकार्याच्या अधिक मजबूत अधिष्ठानावर उभे राहत आहेत.

Web Title: Uae envoy abdulnasser alshali said expanding visa on arrival for indians reflects strong india uae ties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • india
  • India UAE Trade
  • international news
  • UAE

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे
2

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी
4

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.