Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : युद्धविराम म्हणजे आत्महत्या! Saudi Arabia आणि UAE आता थेट मैदानात; अमेरिकेला दिलं विनाशाचं निमंत्रण

Middle East Crisis : डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु इस्रायल, तसेच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती त्यांना विरोध करत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 26, 2026 | 03:00 PM
uae saudi arabia warn us against ceasefire with iran mbs call trump 2026

uae saudi arabia warn us against ceasefire with iran mbs call trump 2026

Follow Us
Follow Us:
  • अरब देशांचा आक्रमक पवित्रा
  • ट्रम्प यांच्यावर दबाव
  • अस्तित्वाचा प्रश्न

Saudi Arabia UAE stance on Iran war 2026 : मध्य-पूर्वेतील युद्धाची धग (US-Israel Iran War) आता अशा वळणावर पोहोचली आहे, जिथे अमेरिकेचे सर्वात जवळचे मित्रराष्ट्र असलेले आखाती देशच आता युद्धाचा आग्र धरत आहेत. अमेरिकेतील संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राजदूत युसेफ अल ओतैबा यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एक लेख लिहून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, इराणसोबतचे हे युद्ध अशा प्रकारे संपले पाहिजे की तेहरानचा धोका कायमचा संपुष्टात येईल. हा केवळ एका देशाचा इशारा नसून संपूर्ण आखाती प्रदेशातील बदललेल्या रणनीतीचे संकेत आहेत.

ट्रम्प यांचा ‘युद्धविराम’ आणि अरब देशांची नाराजी

डोनाल्ड ट्रम्प सध्या इराणसोबत युद्धविराम (Ceasefire) घडवून आणण्यासाठी हालचाली करत आहेत. मात्र, या प्रयत्नांना इस्रायलसह सौदी अरेबिया आणि यूएईचा तीव्र विरोध आहे. या देशांनी ट्रम्प प्रशासनामध्ये जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) स्वतः ट्रम्प यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर वारंवार कॉल करत आहेत. युवराज सलमान यांचे म्हणणे आहे की, “जर यावेळी इराणला रोखले नाही, तर ते आधीपेक्षा अधिक शक्तिशाली होऊन उदयास येईल, जे संपूर्ण जगासाठी घातक ठरेल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: मला दुसरं काम आहे, युद्ध लवकर संपवा! ट्रम्पच्या एका फोनने सर्वांच्याच मनात उठले भीतीचे काहूर; नेमकी कशाची चाहूल?

इराणची क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करण्याचे लक्ष्य

सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना भीती आहे की, जर आता युद्धविराम झाला, तर परिस्थिती युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या काळापेक्षाही अधिक भयावह होईल. सौदी अरेबियाला कोणत्याही परिस्थितीत तेहरानची क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता “शक्य तितकी” कमकुवत करायची आहे. दुसरीकडे, यूएईला वाटते की इराणच्या प्रगत ड्रोन आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांसोबत सुरक्षित जगणे या प्रदेशासाठी अशक्य आहे. म्हणूनच, इराणचा लष्करी पायाभूत आराखडा उद्ध्वस्त झाल्याशिवाय हे युद्ध थांबवू नये, असा या देशांचा हट्ट आहे.

Joint Statement by UAE, Kuwait, Bahrain, Saudi Arabia, Qatar and Jordan on Iran’s Blatant Attackshttps://t.co/EHAkaeAnD0 pic.twitter.com/RPYxEQLkA2 — MoFA وزارة الخارجية (@mofauae) March 26, 2026

credit – social media and Twitter

“अस्तित्वाचा धोका”: यूएई आणि सौदीची संयुक्त भूमिका

यूएईच्या राष्ट्रपतींचे सल्लागार अन्वर गर्गाश यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा विचार केवळ तात्पुरत्या युद्धविरामापुरता मर्यादित नाही. आखाती प्रदेशात चिरस्थायी शांतता हवी असेल, तर इराणचे अणुधैर्य, त्याची क्षेपणास्त्रे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील दादागिरी कायमची संपवावी लागेल. इराणने आपल्या बहुतेक क्षेपणास्त्रांचा वापर या अरब देशांविरुद्धच केला आहे, ज्यामुळे या नेत्यांच्या मनात भीती आणि संताप आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आखाती देशांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतही इराणवर दहशतवाद आणि विस्तारवादाचा आरोप करत त्याला “अस्तित्वाचा धोका” म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Alireza Tangsiri : समुद्रात ‘अदृश्य युद्ध’! इस्रायलचा थेट इराणच्या ‘नौदल प्रमुखा’वर अचूक नेम; अलीरेझा तंगसिरी खल्लास

अमेरिकेची भूमिका आणि भविष्यातील पेच

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनीही इराणच्या नौदल आणि सुरक्षा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ट्रम्प यांचे ‘युद्ध थांबवण्याचे’ आश्वासन आणि अरब मित्रांची ‘युद्ध सुरू ठेवण्याची’ मागणी, यामध्ये अमेरिका अडकली आहे. इराणने अरब देशांवर केलेल्या हल्ल्यांमुळे हे देश आता थेट इराणविरुद्ध उभे ठाकले आहेत. जर ट्रम्प यांनी आपल्या मित्र राष्ट्रांचा सल्ला डावलून युद्धविराम केला, तर अमेरिकेचे या प्रदेशातील संबंध कायमचे बिघडू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबिया आणि यूएई इराणसोबतच्या युद्धविरामाला विरोध का करत आहेत?

    Ans: इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय युद्ध थांबवणे म्हणजे भविष्यातील मोठ्या संकटाला निमंत्रण देणे होय, असे या देशांना वाटते.

  • Que: युवराज मोहम्मद बिन सलमान ट्रम्प यांना काय सांगत आहेत?

    Ans: इराणला आताच पूर्णपणे कमकुवत केले नाही, तर तो भविष्यात अधिक शक्तिशाली आणि आक्रमक होऊन परतेल, असा इशारा युवराज सलमान देत आहेत.

  • Que: इराणने अरब देशांवर हल्ले का केले?

    Ans: इराणचा असा आरोप आहे की, आखाती अरब देशांनी अमेरिकेला त्यांच्या भूभागावरून इराणवर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे, जरी या देशांनी त्याचा इन्कार केला आहे.

Web Title: Uae saudi arabia warn us against ceasefire with iran mbs call trump 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

World War 3: युक्रेन युद्धातून तोडगा न निघाल्यास पुतीन सुरु करणार तिसरे महायुद्ध; ‘हे’ NATO देश रडारवर, अमेरिकेचा दावा
1

World War 3: युक्रेन युद्धातून तोडगा न निघाल्यास पुतीन सुरु करणार तिसरे महायुद्ध; ‘हे’ NATO देश रडारवर, अमेरिकेचा दावा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
2

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

US-Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला लावले भिकेला; मर्यादितच पर्याय उपलब्ध, अमेरिकन जनरलने सांगितले युद्धाचे भीषण वास्तव
3

US-Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला लावले भिकेला; मर्यादितच पर्याय उपलब्ध, अमेरिकन जनरलने सांगितले युद्धाचे भीषण वास्तव

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट
4

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.