Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crimea Bridge : युक्रेनने ११०० किलो स्फोटके लावून रशियाचा महत्त्वाचा पूल उडवला; याच मार्गाने सैन्याला पुरवली जायची रसद

युक्रेनच्या सैन्याने मंगळवारी क्रिमियन पुलावर तिसऱ्यांदा हल्ला केला. पुलाच्या पाण्याखालील स्फोटके लावून पूड उडवून देण्यात आला. यात पुलाचा बराचसा भाग कोसळला आहे. पुलाखाली 1,100 किलो टीएनटी स्फोटके लावण्यात आल्याचा दावा कर

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 03, 2025 | 08:13 PM
युक्रेनने ११०० किलो स्फोटके लावून क्रिमिया पूल उडवलं; रशियाला पुन्हा डिवचलं

युक्रेनने ११०० किलो स्फोटके लावून क्रिमिया पूल उडवलं; रशियाला पुन्हा डिवचलं

Follow Us
Close
Follow Us:

युक्रेनच्या सैन्याने मंगळवारी क्रिमियन पुलावर तिसऱ्यांदा हल्ला केला. पुलाच्या पाण्याखालील स्फोटके लावून पूड उडवून देण्यात आला. यात पुलाचा बराचस भाग कोसळला आहे. पुलाखाली 1,100 किलो टीएनटी स्फोटके लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनने दोनच दिवसांपूर्वी रशियाची ४० बॉम्बर विमाने उडवून दिली होती. त्यानंतर पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर क्रिमिया पुलावर स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:44 वाजता हा स्फोट घडवून आणला.

CDS Anil Chauhan : पाकिस्तानचा ४८ तासांचा होता प्लान, भारतीय सैन्याने ८ तासांत चारली धूळ : CDS अनिल चौहान

एसबीयूचा दावा

या ऑपरेशनमध्ये १,१०० किलो टीएनटी स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या वेळेनुसार पहाटे ४:४४ वाजता हा स्फोट झाला. एसबीयूने म्हटले आहे की ही विशेष ऑपरेशन करण्यासाठी अनेक महिने कठोर परिश्रम करावे लागले. हा हल्ला क्रिमिया पुलाच्या बुडालेल्या खांबाला लक्ष्य करून पुलाचा तळ कमकुवत करण्याच्या रणनीतीचा एक भाग होता, असं सांगितलं जात आहे

रशियासाठी क्रिमिया पूल इतका का महत्त्वाचा?

क्रिमिया पूल, ज्याला केर्च ब्रिज असेही म्हटलं जातं. रशिया आणि क्रिमियाला जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आणि रेल्वे पूल आहे. २०१४ मध्ये क्रिमियाचं रशियात विलिन केल्यानंतर हा पूल उभारण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. हा पूल रशियासाठी अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे, विशेषतः युद्धादरम्यान, कारण याच मार्गाने रशियाने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि सैन्य पाठवलं आहे, परंतु युक्रेनचे नियोजन आता रशियासाठी एक मोठी समस्या बनली आहे.

हा हल्ला क्रिमियन पुलावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी, ८ ऑक्टोबर २०२२ रोजी, या पुलावर एका ट्रकचा स्फोट झाला, ज्यामुळे मोठी आग लागली. जुलै २०२३ मध्ये आणखी एक हल्ला झाला, ज्यामध्ये पुलाचे दोन भाग उद्ध्वस्त झाले. त्यावेळी एसबीयू प्रमुख वासिल मलिक यांनी पुष्टी केली की या ऑपरेशनमध्ये ‘सी बेबी’ या समुद्री ड्रोनचा वापर करण्यात आला होता.

युक्रेन जगाच्या नकाशावरुन नामशेष होणार? पुतिनची प्राणघातक हल्ला करण्याची नवी रणनीती आली समोर

युक्रेनचा एका आठवड्यात दुसरा मोठा हल्ला आहे. एसबीयूने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर म्हटले आहे की, “युक्रेनच्या सुरक्षा सेवेने एक नवीन विशेष ऑपरेशन केले आणि क्रिमियन पुलाला लक्ष्य केले.” या हल्ल्यापूर्वी, रविवारी, एसबीयूने रशियाच्या अणु-सक्षम स्ट्रॅटेजिक बॉम्बर फ्लीटवर हवाई हल्ले देखील केले. मात्र आतापर्यंत या दाव्यावर रशियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. हल्ल्यानंतर लगेचच ब्रिज ऑपरेटरने टेलिग्रामद्वारे पुलावरील वाहतूक सेवा स्थगित केली असली तरी, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत झाली. नुकसानीचे नेमके प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही.

Web Title: Ukraine attack on crimea bridge of russia after drone strikes on airbase bombers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • third world war
  • ukraine

संबंधित बातम्या

Russia Ukraine War Update : डोनबास सोडा, नाटोपासून तटस्थ रहा; पुतिनच्या नवीन प्रस्तावाने बदलला युक्रेन युद्धाचा मार्ग
1

Russia Ukraine War Update : डोनबास सोडा, नाटोपासून तटस्थ रहा; पुतिनच्या नवीन प्रस्तावाने बदलला युक्रेन युद्धाचा मार्ग

Zelenskyy : झेलेन्स्की पुतिनसमोर झुकणार? युद्धबंदीपूर्वी ‘सुरक्षा हमी’ची अट, युक्रेनच्या राष्ट्रपतींचे मोठे विधान
2

Zelenskyy : झेलेन्स्की पुतिनसमोर झुकणार? युद्धबंदीपूर्वी ‘सुरक्षा हमी’ची अट, युक्रेनच्या राष्ट्रपतींचे मोठे विधान

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप
3

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
4

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.