
Russia's largest air attack on Ukraine with drone and missiles
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम युक्रेनमध्ये हे हल्ले करण्यात आले आहे. यामध्ये एका अमेरिकन कंपनीला देखील उडवण्यात आले आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. चार वर्षापासून सुरु असलेल्या युद्ध थांबवण्यासाठीचे सर्व प्रयत्न रशियाच्या या हल्ल्यामुळे अपयशी झाले आहेत.
युक्रेनच्या हवाई दलाने दावा केला आहे की, हा रशियाचा तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यांमध्ये एकजण ठार तर १५ जण जखणी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी म्हटले आहे की, चर्चा झाल्यानंतरही युद्धबंदीवर किंवा शांतता चर्चेसाठी रशियाकडून कोणतेही संकेतल मिळालेले नाही. युक्रेनला युद्ध संपवायचे आहे सध्या यासाठी त्यांच्या चर्चा सुरु आहे.
मॉस्कोच्या शत्रूंची उडाली झोप! S-400 घेऊन समुद्रात उतरली जगातील सर्वात ताकदवर रशियन युद्धनौका
दरम्यान गेल्या आठवड्यात शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट झाली होती. यावेळी रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukriane War) संपवण्यावर चर्चा झाली. परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता.
या भेटीनंतर ट्रम्प यांनी सोमवारी १८ ऑगस्ट रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय देशांसोबत चर्चा केली होती. या चर्चेत रशिया आणि युक्रेन युद्धबंदी आता झेलेन्स्कींच्या हातता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. यानंतर सांगण्यात आले होते की, रशियाचे आणि युक्रेनचे अध्यक्ष आमने-सामेन शांतता चर्चा करतील.
यानंतर आणखी एका बैठकीत ट्रम्पही उपस्थित राहतील. या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी पुतिन ला फोन केला होता आणि याची माहिती दिली होती. ज्यावर पुतिन यांनी देखील सहमती दर्शवली होती.