Zelensky gave a special letter to trump from his wife but not for Trump
Trump Zelensky Meeting : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांच्या व्हाइट हाउसमध्ये बैठक पार पडली. ही बैठक रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर होती. ही बैठक यशस्वी झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता लवकरच रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि झेलेन्स्कींमध्ये बैठक होईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याच वेळी आणखी एका गोष्टीच्या चर्चेला उधाण आहे. ते म्हणजे झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना दिलेले पत्र.
सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना यांनी लिहिलेले हे पत्र आहे. पण हे पत्र देताना झेलेन्स्की यांनी हे पत्र तुमच्यासाठी नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. यामुळे मग हे पत्र कोणासाठी होते? आणि यामध्ये काय लिहिले होते? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
मिळालेल्या माहितीनुसार, ओलेना यांनी लिहिलेले पत्र हे मेलानिया ट्रम्प म्हणजेच ट्रम्पच्या पत्नीसाठी होते. हे पत्र देताना जेव्हा झेलेन्सकी म्हणाले की, हे तुमच्यासाठी नव्हे तर तुमच्या पत्नीसाठी आहे. यावेळी झेलेन्स्की, ट्रम्प आणि तिथे उपस्थित सर्व लोक हसायला लागले होते. तसेच झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे यांचे आभार मानले.
या पत्रापूर्वी मेलानिया ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin)यांना एक पत्र लिहिले होते. ज्यात युक्रेन आणि रशियामधील मुलांच्या परिस्थिती बद्दल चिंता व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी हे पत्र १५ ऑगस्ट रोजी झालेल्या अलास्का भेटीदरम्यान पुतिन यांना दिले होते. याला उत्तर म्हणून झेलन्स्कीच्या पत्नीने मेलानिया ट्रम्प यांना हे पत्र लिहिले आहे
मेलानिया यांनी पुतिन यांना लिहिलेल्या पत्रात रशिया युक्रेन युद्धामुळे देशातील मुलांच्या परिस्थितीतवर भाष्य केले होते. युद्धामुळे मुलांचे जीवन अंध:कारात जात असून यावर विचार करण्याचे आवाहन मेलानिया यांनी केले होते. संघर्षात अडकेलेल्या आणि स्माइल हरवलेल्या निर्दोष मुलांचे रक्षण पुतिन करु शकतात असे मेलानिया यांनी म्हटले होते.
सध्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) दोन्ही देशात मोठे नुकसान झाले आहे. विशेष करुन हजारो युक्रेनियन मुलांचे आणि कुटुंबाचे जीवन विस्कळती झाले आहे. दरम्यान रशियावर कुटुंबाच्या परवानगीशिवाय युक्रेनियन मुलांना रशियात नेले असल्याचा आरोप आहे. याला अपहरण म्हणून वर्णन केले असून या मुलांना युक्रेनविरोधात वापरले जात असल्याचा दावा केला जात आहे.
पण रशियाने या आरोपांना फेटाळले असून त्यांनी केवळ मुलांचे रक्षण केल्याचे म्हटले आहे. २०२२ मध्ये युक्रेनियन मुलांच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने युद्ध गुन्ह्यांसाठी पुतिन विरोधात अटक वॉरंट जापी केले आहे.