Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO

Storm Shadow Missiles: युक्रेनने ब्रिटीश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांनी रशियाची नोवोशाख्तिन्स्क तेल शुद्धीकरण कारखाना उद्ध्वस्त केला, ज्यामुळे रशियन सैन्याच्या इंधन आणि डिझेल पुरवठ्याला मोठा धक्का बसला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 26, 2025 | 02:56 PM
Ukraine launches major retaliatory attack on Russia British Storm Shadow missile destroys Putin's oil refinery

Ukraine launches major retaliatory attack on Russia British Storm Shadow missile destroys Putin's oil refinery

Follow Us
Close
Follow Us:
  • युक्रेनने ब्रिटीश ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्रांचा वापर करून रशियाच्या रोस्तोव्ह भागातील ‘नोवोशाख्तिन्स्क’ ऑईल रिफायनरी उद्ध्वस्त केली आहे.
  •  या हल्ल्यामुळे रशियन लष्कराला होणारा डिझेल आणि विमानांच्या इंधनाचा पुरवठा पूर्णपणे कोलमडला असून पुतिन यांच्या युद्धयंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.
  • केवळ संरक्षण न करता रशियाच्या आर्थिक आणि लष्करी मालमत्तेवर थेट हल्ला करून युद्ध रशियाच्या भूमीवर नेण्याची युक्रेनची ही मोठी चाल मानली जाते.

Ukraine Storm Shadow missile attack Russia 2025 : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध आता एका अत्यंत विनाशकारी आणि निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर युक्रेनने रशियाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. ब्रिटनने पुरवलेल्या अत्याधुनिक आणि प्राणघातक ‘स्टॉर्म शॅडो’ (Storm Shadow) क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनने रशियाच्या सीमेत खोलवर शिरून एका मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर (Oil Refinery) यशस्वी हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रशियन सैन्याची इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून पुतिन यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

नोवोशाख्तिन्स्क रिफायनरी धडाधडली!

युक्रेनियन हवाई दलाने २५ डिसेंबर रोजी रशियाच्या रोस्तोव्ह प्रदेशातील नोवोशाख्तिन्स्क येथील ऑईल रिफायनरीला आपले लक्ष्य बनवले. युक्रेनियन जनरल स्टाफच्या माहितीनुसार, स्टॉर्म शॅडो क्रूझ क्षेपणास्त्रांनी या प्लांटवर इतका अचूक मारा केला की, तिथे एकापाठोपाठ एक अनेक भीषण स्फोट झाले. हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी होती की, रिफायनरीमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते. ही रिफायनरी दक्षिण रशियातील पेट्रोलियम उत्पादनांचा सर्वात मोठा स्रोत मानली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू

रशियन लष्कराच्या रसदवर थेट प्रहार

युक्रेनने हा हल्ला अत्यंत विचारपूर्वक केला आहे. नोवोशाख्तिन्स्क रिफायनरी ही केवळ व्यावसायिक केंद्र नव्हती, तर ती रशियन सशस्त्र दलांची ‘लाईफलाईन’ होती. येथूनच रशियन लढाऊ विमानांसाठी लागणारे रॉकेट इंधन आणि रणगाड्यांसाठी लागणारे डिझेल मोठ्या प्रमाणात पुरवले जात असे. या प्लांटवर हल्ला करून युक्रेनने पुतिन यांच्या युद्धयंत्रणेचा वेग मंदावण्याचा प्रयत्न केला आहे. इंधन नसेल तर रशियन रणगाडे आणि विमाने जागची हलणेही कठीण होणार आहे, ज्याचा थेट फायदा युक्रेनला युद्धभूमीवर मिळेल.

BREAKING: Ukraine struck Russia’s Novoshakhtinsk oil refinery with British Storm Shadow missiles, triggering multiple explosions. pic.twitter.com/w79gaesqea — Republicans against Trump (@RpsAgainstTrump) December 25, 2025

credit : social media and Twitter

स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राची ताकद

या मोहिमेत वापरलेले ब्रिटीश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र हे त्याच्या अचूकतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे क्षेपणास्त्र २५० किलोमीटरहून अधिक पल्ल्यापर्यंत जाऊन शत्रूचा नाश करू शकते. सुमारे १,३०० किलोग्रॅम वजनाचे हे क्षेपणास्त्र रडारच्या नजरेत न येता (Stealth) हल्ला करण्यास सक्षम आहे. ४५० किलोच्या वॉरहेडमुळे हे क्षेपणास्त्र सिमेंटच्या मजबूत भिंती किंवा मोठ्या रिफायनरीसारख्या वास्तूंना क्षणात जमीनदोस्त करू शकते. रशियाच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींना (Air Defense) चकवून केलेल्या या हल्ल्याने रशियन लष्करी तज्ज्ञांची झोप उडवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chinese Weapons : ड्रॅगनचा बनावट माल उघड? कंबोडियातील दुर्घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या गुणवत्तेवर जगभरातून टीका

युद्ध आता रशियाच्या अंगणात!

गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया युक्रेनच्या शहरांवर आणि ऊर्जा केंद्रांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत होता. मात्र, आता युक्रेनने आपली रणनीती बदलली आहे. युक्रेन आता रशियाच्या आर्थिक शक्तीवर थेट प्रहार करत आहे. इंधन साठे आणि रिफायनरी नष्ट केल्यामुळे रशियाला केवळ लष्करीच नाही तर आर्थिक नुकसानही सहन करावे लागणार आहे. युक्रेनच्या या धाडसी पवित्र्यामुळे येत्या काळात हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, रशिया यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युक्रेनने रशियाच्या कोणत्या रिफायनरीवर हल्ला केला?

    Ans: युक्रेनने रशियाच्या रोस्तोव्ह प्रदेशातील नोवोशाख्तिन्स्क (Novoshakhtinsk) या महत्त्वपूर्ण तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला.

  • Que: या हल्ल्यात कोणत्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला?

    Ans: या हल्ल्यासाठी ब्रिटनने पुरवलेल्या 'स्टॉर्म शॅडो' (Storm Shadow) या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला.

  • Que: या हल्ल्यामुळे रशियाचे काय नुकसान झाले?

    Ans: या हल्ल्यामुळे रशियन लष्कराला होणारा डिझेल आणि लढाऊ विमानांच्या इंधनाचा पुरवठा खंडित झाला असून रशियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: Ukraine launches major retaliatory attack on russia british storm shadow missile destroys putins oil refinery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • international news
  • Russia Ukraine War
  • Russia Ukraine War Update

संबंधित बातम्या

Chinese Weapons : ड्रॅगनचा बनावट माल उघड? कंबोडियातील दुर्घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या गुणवत्तेवर जगभरातून टीका
1

Chinese Weapons : ड्रॅगनचा बनावट माल उघड? कंबोडियातील दुर्घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या गुणवत्तेवर जगभरातून टीका

Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू
2

Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू

Reliance Industries : मुकेश अंबानींची मोठी झेप! रशियन तेलासाठी अमेरिकन सरकारकडून मिळाली विशेष सवलत
3

Reliance Industries : मुकेश अंबानींची मोठी झेप! रशियन तेलासाठी अमेरिकन सरकारकडून मिळाली विशेष सवलत

Bangladesh Crisis: ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?
4

Bangladesh Crisis: ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.