
UN Concerns over bangladesh violence against hindu and other minority
गेल्या आठवड्यात बांगलादेशचा विद्यार्थी नेता उस्मान हादीची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर बांगलादेशात प्रचंड मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या. यामध्ये एका व्यक्तीचे जाळून हत्याही करण्यात आली आहे. या परिस्थितीवर भारतासह, अमेरिका, संयुक्त राष्ट्र संघाने देखील चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्र संघराने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही लोकशाही समाजात सूड आणि सूड घेण्यास जागा नाही. अल्पसंख्यांक लोकांची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे, जेवढी बहुसांख्यिक लोकांची. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी पत्रकार परिषेदत बोलताना बांगलादेशच्या अंतरिम सरकारला इशारा दिला आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचार चिंताजनक असून ते थांबवले पाहिजेत असे गुटेरस यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्व बांगलादेशींना सुरक्षित वाटावे अशा इशारा दिला आहे. याशिवाय गुटेरस यांनी असेही स्पष्ट केले आहे की, केवळ बांगलादेशच नव्हे, इतर इतर कोणत्याही देशाच बहुसांख्यिक लोकांनी अल्पसंख्याकाना असुरक्षित वाटा नये हे सुनिश्चित केले पाहिजे.
याच वेळी भारतीय-अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती आणि सुहास सुब्रमण्यम यांनी बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. दीप चंद्र दास याच्या हत्येवर त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त व्होल्कर टर्क यांनी देखील निवडणुकांसाठी युनूस सरकारला शांतता प्रस्थापित करण्याचे आणि हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे.
याच वेळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देखील सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, फेब्रुवारीत १२ तारखेला ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका होती. तसेच सरकारचा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात घेण्याचा हेतू असल्याचेही युनूस यांनी स्पष्ट केले आहे.
Bangladesh News : बांगलादेशी नेत्यांची उडाली भंबेरी! हादीच्या हत्येनंतर गन लायसन्ससाठी झुंबड