Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

India US Trade Deal : भारत आणि अमेरिकेत व्यापार कारार अंतिम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला आहे. यावर भारताने कोणतेही थेट उत्तर दिलेले नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 01:16 PM
India US Trade Deal

India US Trade Deal

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताच्या रशियाकडून तेल खरेदी बंदीच्या दाव्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद
  • भारताच्या निर्णयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष
  • ट्रम्पचा दावा ठरणार का खरा?
India US Agreement : वॉशिंग्टन/ नवी दिल्ली : अलीकडे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार हा जागतिक चर्चेचा मुद्दा बनला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावरील टॅरिफ (Tariff) कमी करत दोन्ही देशात मोठ्या व्यापार कराराची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी देखील याबाबत माहिती देत हा करार भारताच्या मेक इन इंडियाला चालना मिळणार असे म्हटले. पण या सगळ्यात मुद्दा जास्त चर्चेचा राहिला तो भारताच्या रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचा ट्रम्प यांचा दावा. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

मोठी बातमी! ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीमुळे लावलेला जाचक करही हटवला; भारतीय व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन?

भारत अमेरिका व्यापार करार

भारत-अमेरिकेतील व्यापार करारांतर्गत २५% परस्पर कर (Reciprocal Tax) १८% पर्यंत कमी केला आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार सहकार्य वाढविण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीही केली आहे. पण ट्रम्प यांनी हे जाहीर करताना भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे मान्य केले आहे, असे म्हटले होते. त्यांच्या मते भारत रशियाकडून नव्हे, तर अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करेल. त्यांच्या या दाव्यांमुळे सध्या भारत आणि रशियाच्या उर्जा धोरणांवर आणि राजनैतिक संबंधावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

भारताची अप्रत्यक्ष भूमिका

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालायाने यापूर्वी केवळ हे स्पष्ट केले की, १.४ अब्ज नागरिकांची उर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे ही भारताचे प्राधान्य आणि प्राथमिक जबाबादारी असेल. पण यावरुन भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार का हे स्पष्ट झाले नाही.

रशियाची प्रतिक्रिया

याच पार्श्वभूमीवर रशियाने देखील भारताकडून तेल खरेदी बंद करण्याबाबत कोणतेही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे म्हटले. रशियाच्या क्रेमलिन कार्यालयाने निवेदन जारी केले होते. यामध्ये भारत हा स्वतंत्र देश असून कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करु शकतो असे म्हटले होते. तसेच रशिया हा भारताचा एकमेव तेल पुरवठादार नसून भारताने यापूर्वीही इतर देशांकडून तेल खरेदी केले आहे आणि ही सामान्य बाब असल्याचे सांगितले. शिवाय दोन्ही देशांतील उर्जा सुरक्षेला प्राधान्य राहिले असेही रशियाने स्पष्ट केले होते.

जगाच्या नजरा भारतावर

जागतिक स्तरावर चर्चा सध्या रशिया आणि भारत दोन्ही देशांकडून तेल खेरदीवर अप्रत्यक्ष विधाने समोर आली आहे. रशियाच्या विधानातून अद्याप भारताने त्यांच्याकडून तेल खरेदी बंद केली नसल्याचे स्पष्ट होते. तर भारताचे विधान हे काहीसे गोंधळात टाकणार आहे. भारत नागरिकांच्या उर्जा सुरक्षेला प्राधान्य देणार हे खरे, पण रशिया, अमेरिका, व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा सध्या भारतावर खिळल्या आहेत.

भारत परतफेड करणार का?

दरम्यान ट्रम्प यांनी आपल्या नव्या आदेशात इशारा दिला आहे की, भारताने रशियाकडून खरेदी सुरु ठेवली तर त्याला कठोर परिणामांना सामोरे जावे लागेले. भारतावर पुन्हा २५% कर लादला जाऊ शकतो. यावरुन ट्रम्प भारत आणि रशियाला वेगळं करण्यापासून किती आक्रमक आहेत हे स्पष्ट होते. मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडच्या आठवड्यात रशियन तेल आयात कमी झाली आहे पण यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सध्या भारतासोर नागरिकांच्या उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठे आव्हानं उभे राहिले आहे. तज्ज्ञांच्या मते भारताने रशियन तेल बंद केले तर भारताला यासाठी पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागली. परंतु भारताला तेलाच्या किमती आणि बाजारातील परिस्थितीनुसारच पाऊल उचलावे लागेल.

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत खरंच रशियाकडून तेल खरेदी बंद करणार का?

    Ans: सध्या भारताकडून रशियन तेल खरेदी बंद करण्याबाबात कोणतचेही अधिकृत विधान आलेले नाही. भारताने केवळ नागरिकांच्या उर्जा सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल असे म्हटले आहे.

  • Que: भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्यास काय होईल?

    Ans: भारताने रशियन तेल खरेदी थांबवली तर यासाठी त्याला इतर तेल बाजारपेठा शोधाव्या लागतील परंतु यामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

  • Que: ट्रम्प यांनी भारताला कोणता नवा इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नसल्याचे पुरावे आढळल्यास पुन्हा २५ टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे

Web Title: Ndia us trade deal trumps tariff cuting srategy will india return favor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • India Russia relations
  • narendra modi
  • Tariff
  • World news

संबंधित बातम्या

Savannah Guthrie : प्रसिद्ध अमेरिकन अँकरच्या आईचे अपहरण! घराबाहेर सापडलं रक्त; 7 दिवसांपासून नॅन्सी गुथरी बेपत्ता
1

Savannah Guthrie : प्रसिद्ध अमेरिकन अँकरच्या आईचे अपहरण! घराबाहेर सापडलं रक्त; 7 दिवसांपासून नॅन्सी गुथरी बेपत्ता

Iran-US Tension: ‘आम्ही अमेरिकेसोबत चर्चेला तयार, पण…!’ इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुकार्यक्रमाबद्दल स्पष्ट केली भूमिका
2

Iran-US Tension: ‘आम्ही अमेरिकेसोबत चर्चेला तयार, पण…!’ इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुकार्यक्रमाबद्दल स्पष्ट केली भूमिका

PM मोदींचे मोठे विधान! मलेशियातून दिला दहशतवादावर थेट संदेश; पाकिस्तानची उडणार झोप
3

PM मोदींचे मोठे विधान! मलेशियातून दिला दहशतवादावर थेट संदेश; पाकिस्तानची उडणार झोप

Russia-Ukraine War : ट्रम्प यांचा युक्रेनला अंतिम इशारा! जुनपर्यंत युद्ध थांबवा नाहीतर…; झेलेन्स्कींनी अमेरिकेबाबात मोठा खुलासा
4

Russia-Ukraine War : ट्रम्प यांचा युक्रेनला अंतिम इशारा! जुनपर्यंत युद्ध थांबवा नाहीतर…; झेलेन्स्कींनी अमेरिकेबाबात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.