Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेचे वर्चस्व धोक्यात? UNGA मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांचे मोठे विधान; जग बहु-केंद्रित शक्तींच्या दिशने करत आहे वाटचाल

Multipolar World : संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी UNGA अधिवेशनात जग बहु-केंद्रित शक्तींच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. पण यामुळे...

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 24, 2025 | 10:34 PM
UN Secretary-General's says World is leading towards multipolar power

UN Secretary-General's says World is leading towards multipolar power

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेचे जागतिक वर्चस्व धोक्यात
  • UNGA च्या व्यासपीठावर नवीन आणि अनेक देश आले एकत्र
  • जग बहु-केंद्रित शक्तींच्या मार्गावर

UN General Assembly Multipolar World: न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचे ८० व्या अधिवेशनाचे सत्र सुरु आहे. २९ सप्टेंबरपर्यंत हे सत्र सुरु राहणार आहे. दरम्यान या अधिवेशान अनेक जागतिक बदलांचे रुप पाहायला मिळाले आहे. विशेष करुन यामध्ये राजकारणातील बदलही स्पष्ट दिसून आहे. जह बहु-केंद्रित जगाच्या दिशेने वाटचाल करत आहे. शिवाय यामध्ये सर्वात शक्तीशाली मानला जाणाऱ्या अमेरिकेचे वर्चस्व कमी झालेले दिसून येत आहे.

UN च्या महासचिवांचे मोठे विधान

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी UNGA च्या उद्घाटनाच्या भाषणात मोठे विधान केले . त्यांनी म्हटले की, जग  बहु-केंद्रित (Multiple World) देशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण यामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता वाढत आहे. जरी नव्या शक्तींचा उगम होत असला तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी सक्षम आणि न्यायपूर्ण समावेशी संस्थेची आवश्यकता आहे.

त्यांनी पुढे म्हटले की,  नव्या बहु-केंद्रित व्यवस्थेत जागतिक संस्था, UN, WTO, आंतरराष्ट्रीय न्यायालय सक्षम, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कायदे, न्याय, विकास, पर्यावरणीय धोरणे, अन्न सुरक्षा,शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवरही सर्व देशांनी सहमती ठेवणे गरजेचे आहे.

ग्रीनलँडच्या स्त्रियांची डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मागितली माफी; जबरदस्तीने करण्यात आली होती नसबंदी

प्रत्येक देशांनी अधिवेशनात मांडली स्वतंत्र भूमिका

या अधिवेशनात अनेक देशांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे. उदाहरणार्थ फ्रान्सने पॅलेस्टिईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. तसेच ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, देखील या दिशेने पाऊल उचलले आहे. परंतु अमेरिका, इस्रायल आणि इटली या देशांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. पण यावरुन लक्षात येते की पाश्चात्या देशांमध्ये एकता राहिलेली नाही. प्रत्येक देश स्वतंत्र धोरणे स्वीकारत आहे.

अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात

शिवाय अमेरिकेचे वर्चस्व देखील संपुष्टात येताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधी परराष्ट्र धोरणांमुळे मेक द अमेरिका ग्रेट अगेनच्या स्थितीतला धक्का बसला आहे. अमेरिकाला साथ देणारे देशही त्याच्याविरोधात गेले आहेत. यामुळे अमेरिका अधोगतीच्या मार्गावर आहे. सध्या बहु-केंद्रित जगातमध्ये चीन, रशिया, भारत, युरोपियन यूनियन, ऑफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांचे सामर्थ वाढत आहे. मात्र यामध्ये अमेरिकेचे वर्चस्व गायब झाल्याचे दिसत आहे.

याशिवाय ग्लोबल साऊथच्या विकसनशील देशांनी देखील मानवी हक्क, युद्ध आणि सुरक्षा यांसारख्या प्रस्तावर पाश्चात्य देशाच्या दबावाला न जुमानता स्वतंत्र मतदान केले आहे.हे एक धोरणात्मक स्वांतत्र्याचे उदाहरण आहे. याचे एक उदाहरण म्हणजे अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडला नाही. भारताने राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थरितेसाठी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली. यावरुन पाश्चत्य देश अमेरिका आता मागे पडत असल्याचे लक्षात येते.

FAQs(संबंधित प्रश्न)

अमेरिकेचे वर्चस्व खरंच धोक्यात आहे का? 

अनेक तज्ज्ञांच्या मते, अमेरिका अजनूही महाशक्ती देश आहे, पण ट्रम्प यांच्या विरोधी परराष्ट्र धोरणामुळे, तसेच नव्या देशांच्या स्वंतत्र भूमिकेमुळे अमेरिकेचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे.

काय आहे Multipolar World? 

Multipolar World चा अर्थ बहुकेंद्रित देश असा होतो. म्हणजेच सत्ता किंवा सामर्थ आता एका देशापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर अनेक जागतिक केंद्रामध्ये वाढत आहे.

UNGA मध्ये कोणते बदल दिसून आले? 

यंदाच्या UNGA  सत्रात अनेक पाश्चत्य देश स्वताची स्वतंत्र भूमिका मांडताना दिसले, युरोपीय देशांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. तसेच अनेक देशांनी पाश्चत्य देशांच्या दबावाला बळी न पडता आपली भूमिका मांडली.

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral

Web Title: Un secretary generals says world is leading towards multipolar power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 10:30 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त
1

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर
2

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO
3

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO

Saudi Bus Accident : सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात; उमराहवरुन परतताना ४२ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू
4

Saudi Bus Accident : सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात; उमराहवरुन परतताना ४२ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.