बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangkok Viral Video : बॅंकॉक : थायलंडची (Thailand) राजधानी बॅंकॉकमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. भर रहदारीच्या रस्त्यावर अचानक ५० मीटर खोल खड्डा पडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मोठ्या खड्ड्यात तीन गाड्या आणि विजेचे खांब जमिनदोस्त झाले आहे.
स्थानिक वेळेनुसार, २४ सप्टेंबरच्या सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहे. या घटनेने संपूर्ण थायलंड हादरला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भारत आणि तैवानच्या संबंधाला नवी दिशा; EXPO 2025 मध्ये तंत्रज्ञान प्रकल्पांचे होणार भव्य प्रदर्शन
काय आहे जमिनी खचण्याचे कारण?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरला सकाळी बॅंकॉकमधील सॅमसन रोडवर अचानक भेगा पडण्यास सुरुवात झाली आणि काही क्षणात अर्धा रस्त्या खचला. यामुळे ३० मीटर लांब, ३० मीटर रुंद आणि ५० मीटर खोल असा खड्डा तयार झाला.
बॅंकॉकच्या गव्हर्नर चॅडचार्ट सिट्टीपुंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रस्त्याखाली सुरु असलेल्या एका रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जमिनी हळूहळू खाली कोसळत आहे. तेच रत्स्याच्या बाजूला असलेला एक विजेचा खांबही आणि पाण्याच्या पाइपलाइन कोसळल्या आहे.
Dramatic moment in Bangkok: road suddenly collapsed into a giant sinkhole, swallowing a car & an electric pole into a 50m-deep hole The sinkhole continues to widen as people run for their safety pic.twitter.com/uAIFigxrvj — RT (@RT_com) September 24, 2025
हा खड्डा इतका मोठा झाला आहे की, जवळच असलेल्या पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. तसेच याचा रुग्णालयाच्या कार्यावरही परिणाम झाला आहे. यामुळे रुग्णालयाच्या ओपीडी सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहे. रुग्णलायच्या अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, रुग्णलायचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
सुरक्षेच्या कारणास्तवर परिसरातील विज आणि पाणीपुरठा खंडित करण्यात आला आहे. गव्हर्नर चॅडचार्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या खड्डा भरुन काढण्याचे काम सुरु आहे. पण मुसळधार पावसामुळे कामात अडथळा येण्याची शक्यता आहे.
बॅंकॉकमध्ये नेमंक काय घडलं?
थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये सॅमसनमधे एका रस्त्यावरची आर्धी जमिनी अचानक खचली, ज्यामुळे ५० मीटर खोल खड्डा पडला.
काय आहे या घटनेमागचे कारण?
बॅंकॉकमधील ही घटना कोणत्याही भूकंपाच्या झटक्याने नाही, तर रस्त्याखाली सुरु असलेल्या एका रेल्वे स्टेशनच्या बांधकामुळे झाले आहे.
घटनेमध्ये कोणती जीवितहानी झाली का?
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत रस्त्यावर विजेच्या खांबासह तीन गाड्या खाली कोसळ्या आहेत. सुदैवान यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.