UN tensions after US-Iran strike Guterres urges diplomacy
Trump Iran strikes : इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला असून, संयुक्त राष्ट्रसंघातही याचे गंभीर पडसाद उमटले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या कृतीला ‘चिथावणीखोर’ आणि ‘प्रादेशिक तसेच जागतिक शांततेसाठी धोका’ असे संबोधले आहे.
गुटेरेस म्हणाले की, “अमेरिकेचा हा हल्ला संपूर्ण संघर्षाला नियंत्रणाबाहेर नेणारा टप्पा ठरू शकतो. या कृतीचा विनाशकारी परिणाम सामान्य नागरिकांपासून संपूर्ण प्रादेशिक स्थैर्यापर्यंत जाणवू शकतो.” त्यांनी तातडीने सर्व सदस्य देशांना संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक तोडग्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इस्रायलला खुला पाठिंबा देत इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन महत्त्वाच्या अणु संशोधन व साठवण केंद्रांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यामुळे इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, गुटेरेस यांनी जगाला इशारा दिला आहे की, “ही लढाई लष्करी उपायांनी सुटणार नाही. राजनैतिक संवाद, शांततामय मार्ग आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन हेच यावर उपाय आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Iran strikes : गुप्तचर यंत्रणेत झाली मोठी चूक? अमेरिकेने जिथे बॉम्ब टाकला होता तिथून इराणने आधीच…
सरचिटणीस गुटेरेस यांनी सर्व राष्ट्रांना उद्देशून म्हटले की, “आता अराजकता टाळण्याची गरज आहे. या नाजूक परिस्थितीत कोणतीही आक्रमक कृती संकट अधिक गडद करू शकते.” त्यांनी युएनच्या सनदेनुसार देशांनी आपली आंतरराष्ट्रीय जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.
“ही स्थिती फारच नाजूक आहे. लष्करी कारवाई नव्हे तर राजनैतिक वाटाघाटीच शाश्वत उपाय आहेत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
I am gravely alarmed by the use of force by the United States against Iran today. This is a dangerous escalation in a region already on the edge – and a direct threat to international peace and security.
There is a growing risk that this conflict could rapidly get out of…
— António Guterres (@antonioguterres) June 22, 2025
credit : social media
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प म्हणाले, “इराणला आता शांततेचा मार्ग स्वीकारावा लागेल, अन्यथा मोठ्या प्रमाणावर विनाशाचा सामना करावा लागेल.” त्यांनी पुढे म्हटले, “मी अजूनही मोठे हल्ले करण्यास तयार आहे.”
इराणवर हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. या संवादात ट्रम्प यांनी नेतन्याहूंना आश्वस्त केले की, “इस्रायल आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे.” नेतन्याहूंनी यासाठी ट्रम्प यांचे आभार मानले.
🚨HAIFA 😭😭 pic.twitter.com/zHaVkSamG7
— 👑 Royal Intel (@RoyalIntel_) June 22, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : खुला युद्धप्रारंभ! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण आक्रमक, इस्रायलवर डागली 30 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे
या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, जागतिक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला इशारा लक्षात घेता, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर व अनाकलनीय होण्याची शक्यता आहे. गुटेरेस यांच्या मतानुसार, जर तातडीने संयम राखला गेला नाही, तर हा संघर्ष फक्त इराण आणि अमेरिका एवढ्यापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण जगाच्या शांततेसाठी धोका बनू शकतो. त्यामुळे सर्व देशांनी डोके शांत ठेवून राजनैतिक उपाययोजना सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.