Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर

Bangladesh economic crisis: मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या एका वर्षात ३५३ कारखाने बंद पडले आहेत, ज्यामुळे सुमारे १.२ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 13, 2025 | 10:00 PM
Under Mohammad Yunus Bangladesh’s economy faces crisis 353 factories shut 1.2 lakh jobless

Under Mohammad Yunus Bangladesh’s economy faces crisis 353 factories shut 1.2 lakh jobless

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh factory shutdowns : ‘ग्रामिण बँके’चे संस्थापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सत्ता हातात घेताना जनतेला विकासाची, रोजगाराची आणि पारदर्शक सत्तेची स्वप्ने दाखवली होती. मात्र त्यांच्या कारभाराला आज एक वर्ष पूर्ण होत असताना, ह्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे वास्तव समोर आले आहे. आर्थिक अडचणींनी त्रस्त उद्योगधंदे एकामागोमाग एक बंद पडत आहेत, आणि सुमारे १.१९ लाखांहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत.

गेल्या एका वर्षातच ३५३ कारखाने कायमचे बंद पडले आहेत. सावर, गाजीपूर, चितगाव, नारायणगंज आणि नरसिंगडीसारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये निर्माण झालेल्या या अडचणींनी हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. विशेषत: रेडीमेड कपडे, निटवेअर आणि कापड उद्योग — जे शेख हसीना यांच्या काळात सुवर्णयुग अनुभवत होते आता अस्तित्वासाठी झगडत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ

कारखाने बंद होण्याची कारणे स्पष्ट

कारखाना तपासणी विभाग आणि औद्योगिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक कर्जावरील अवाजवी व्याजदर, कच्च्या मालाच्या आयातीतील एलसी (Letter of Credit) समस्या, गॅस व वीजटंचाई, गॅसदरात सतत होणारी वाढ, तसेच कामगारांच्या वेतनवाढीमुळे वाढलेला उत्पादन खर्च  या साऱ्यामुळे उद्योगधंद्यांची स्पर्धात्मकता पूर्णपणे कमी झाली आहे. त्यातच कामगारांचा असंतोष वाढल्याने उत्पादनात अडथळे येऊ लागले, आणि अखेर मालकांना कारखाने बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

बेरोजगारीचा भस्मासुर

अनेक कारखान्यांचे दरवाजे कायमचे बंद झाल्याने, हजारो कामगार रोजीरोटीच्या शोधात शहरातून गावाकडे परतत आहेत. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकजण वेगवेगळ्या शहरांत नोकरीच्या शोधात भटकंती करत होते, मात्र सततचे अपयश आणि वाढते आर्थिक ओझे यामुळे त्यांचा आत्मविश्वास खचला आहे.

युनूस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळाचा पहिला वर्धापनदिन हा त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा क्षण ठरायला हवा होता. पण त्याऐवजी, विरोधक त्यांच्यावर अपयशाचा ठपका ठेवत आहेत. केवळ आर्थिक संकटच नव्हे, तर कायदा-सुव्यवस्था देखील ढासळत चालल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून होत आहे.

नवीन पंतप्रधानांच्या प्रतीक्षेत बांगलादेश

सत्तेच्या वर्षपूर्तीनिमित्त युनूस यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या सत्तेतील हेतूंवर शंका घेतली असून, पुढील काही महिने बांगलादेशासाठी राजकीयदृष्ट्या अतिशय निर्णायक ठरणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची मोठी कारवाई; 55 हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद

भारताशी संबंध आणि आर्थिक घसरण

राजकीय विश्लेषकांच्या मते, युनूस यांच्या भारताशी असलेल्या तणावपूर्ण संबंधांनी देखील बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम केला आहे. व्यापारातील अस्थिरता, परकीय गुंतवणुकीतील घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विश्वासाचा तुटवडा यामुळे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

आज बांगलादेशात एकच प्रश्न घुमतो आहे  “सत्ता बदलून नेमके काय मिळाले?”

जनतेच्या अपेक्षा आणि वास्तव यातील प्रचंड दरी, बेरोजगारीचा वाढता दर आणि ढासळलेली उद्योगव्यवस्था यामुळे पुढील निवडणुका युनूस यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरणार आहेत.

Web Title: Under mohammad yunus bangladeshs economy faces crisis 353 factories shut 12 lakh jobless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh Crisis
  • india
  • Mohammad Yunus

संबंधित बातम्या

आपल्या मुलांना दाखवा आपल्या देशाचा गौरव! अशाप्रकारे पटवून द्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व
1

आपल्या मुलांना दाखवा आपल्या देशाचा गौरव! अशाप्रकारे पटवून द्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व

Paytm सोबत असे करा तुमचे बँक खाते ५ मिनिटांत लिंक
2

Paytm सोबत असे करा तुमचे बँक खाते ५ मिनिटांत लिंक

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
3

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

वयाची कोणतीही मर्यादा नाही…, संपूर्ण जगाला ‘या’ देसी व्हिस्कीचे व्यसन, त्यात असे काय आहे खास ?
4

वयाची कोणतीही मर्यादा नाही…, संपूर्ण जगाला ‘या’ देसी व्हिस्कीचे व्यसन, त्यात असे काय आहे खास ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.