Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या अडचणीत वाढ; ‘मोबाईल बॉम्ब’च्या वाढत्या धोक्यामुळे देशाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह

PTA unregistered phones : एकीकडे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण कायम असताना, दुसरीकडे पाकिस्तानला आता आपल्या देशातीलच एका नव्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 14, 2025 | 01:36 PM
Unregistered and cloned phones are a major security threat warns PTA

Unregistered and cloned phones are a major security threat warns PTA

Follow Us
Close
Follow Us:

PTA unregistered phones : एकीकडे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण कायम असताना, दुसरीकडे पाकिस्तानला आता आपल्या देशातीलच एका नव्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे बनावट व क्लोन मोबाईल फोनचा स्फोटक प्रसार. भारताच्या राफेल लढाऊ विमानं आणि रशियन S-400 हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांना तोंड देताना अतुलनीय भूमिका बजावली. मात्र याचवेळी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला नोंदणीकृत नसलेल्या आणि क्लोन मोबाईल फोनमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.

PTA चा इशारा, मोबाईलमुळे देश सुरक्षेवर गदा

पाकिस्तान टेलिकॉम अथॉरिटी (PTA) ने नुकताच इशारा दिला की, देशात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत नसलेले आणि क्लोन केलेले मोबाईल फोन विकले जात आहेत. हे फोन्स केवळ तांत्रिक नियमांचे उल्लंघन करत नाहीत, तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीही मोठा धोका ठरू शकतात, असे PTA चे म्हणणे आहे.

सायबर गुन्हेगारी, आर्थिक फसवणूक आणि दहशतवादी संवाद यासाठी अशा मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती PTA आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या बनावट फोन्सवर कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.

कायदेशीर कारवाई आणि जनतेसाठी आवाहन

PTA ने स्पष्टपणे सांगितले आहे की बनावट किंवा क्लोन मोबाईल विकणाऱ्या व्यक्तीवर तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, त्याच्यावर फौजदारी खटला चालवला जाईल, आणि संबंधित मोबाईल ताब्यात घेण्यात येईल. PTA ने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही प्रकारचे मोबाईल विक्रीचे प्रकार आढळल्यास तात्काळ FIA कडे तक्रार करावी. त्याचप्रमाणे, DIRBS (Device Identification Registration and Blocking System) मध्ये नोंदणी नसलेले मोबाईल फोन स्वयंचलितपणे ब्लॉक केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

भारताची सैनिकी कारवाई आणि S-400 ची भूमिका

८ मे रोजी पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात सीमेवरून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. याआधी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके व पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्याला उत्तर देताना भारताने राफेल लढाऊ विमानं आणि S-400 हवाई संरक्षण प्रणाली यांचा वापर केला. विशेषतः S-400 ने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवाईतच उधळून लावली, आणि भारताच्या हवाई सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या राजकारणात वाहणार बदलाचे वारे; तुरुंगातूनही इम्रान खानने खेळली तिरपी चाल

S-400 प्रणाली म्हणजे काय?

S-400 ही रशियन बनावटीची एक आधुनिक आणि प्रभावी हवाई संरक्षण प्रणाली आहे. ती शत्रूच्या ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट लाँचर आणि लढाऊ विमानांपासून संरक्षण करते. भारताने २०१८ मध्ये रशियाशी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा करार करत S-400 ची ५ युनिट्स खरेदी केली होती. या प्रणालीच्या मदतीने भारताने सीमारेषेवर झालेल्या हल्ल्यांना अचूक प्रत्युत्तर दिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पुन्हा दहशतवादी छावण्या उभारणार…’ शाहबाज शरीफ यांनी खुली केली देशाची तिजोरी

 पाकिस्तानवर आता ‘मोबाईल’ हल्ल्याची वेळ

भारताकडून मिळालेल्या तांत्रिक आणि सामरिक दबावामधून वाचण्यासाठी झगडत असलेल्या पाकिस्तानसाठी आता अंतर्गत सुरक्षेचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे. बनावट मोबाईल फोन्सचा वाढता स्फोट आणि त्यामुळे होणारे सायबर गुन्हे यामुळे देशाची अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. PTA ने घेतलेल्या कडक भूमिकेचा प्रभाव कितपत पडतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सध्या तरी पाकिस्तानसाठी राफेल किंवा S-400 नव्हे, तर मोबाईलच ‘महाभयंकर’ ठरू शकतो, हे निश्चित.

Web Title: Unregistered and cloned phones are a major security threat warns pta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • international news
  • pakistan
  • Pakistan News

संबंधित बातम्या

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?
1

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
2

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?
3

PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?

शाहबाज सरकार घाबरले! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाच्या भितीने PTI च्या नेत्यांवर लाहोरमध्ये प्रवेशास बंदी
4

शाहबाज सरकार घाबरले! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाच्या भितीने PTI च्या नेत्यांवर लाहोरमध्ये प्रवेशास बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.