Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Protests: नेपाळ सत्तापालटामध्येही अमेरिकेचा मोठा हाथ; 900 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक अन् Gen-Z आंदोलनाची पटकथा

Gen Z Protest Nepal : NDIने 2020-22 दरम्यान संघराज्यीय रचना, दलित हक्क, हवामान बदल आणि तरुणांची भूमिका यावर अहवाल प्रसिद्ध केले आणि तरुणांसाठी प्रशिक्षण टूलकिट तयार केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 15, 2025 | 12:40 PM
us 900 million nepal genz movement questions

us 900 million nepal genz movement questions

Follow Us
Close
Follow Us:
  • 900 दशलक्ष डॉलर्सची अमेरिकन मदत 

  • एनजीओंचा संशयास्पद सहभाग 

  • हिंसक निदर्शनांनी सरकार पडले

Nepal Protests : नेपाळ हा हिमालयाच्या कुशीतला एक लहानसा पण धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा देश. शेजारी भारत आणि चीन या दोन महासत्तांच्या सावलीत असलेला हा देश नेहमीच जागतिक राजकारणाचा भाग राहिला आहे. परंतु अलीकडच्या काळात झालेल्या सत्तापालटामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत या सगळ्यामागे अमेरिकेचा काही अजेंडा होता का?

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peñico city discovery : अमेरिकन संस्कृतीच्या उगमाचे रहस्य उलगडले; पेरूमध्ये सापडलेले 3800 वर्ष जुने शहर

900 दशलक्ष डॉलर्सची ‘मदत’ की हस्तक्षेप?

द संडे गार्डियनच्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत USAID आणि MCC या दोन मोठ्या करारांमधून नेपाळला तब्बल 900 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त निधी देण्यात आला.

  • USAID करार (2022): 402.7 दशलक्ष डॉलर्सचा करार, ज्यात मोठा निधी अजूनही न वापरलेला आहे.

  • MCC करार (2017, मंजूर 2022): 500 दशलक्ष डॉलर्सचा करार, जरी त्यातील फक्त 8.63% रक्कम प्रत्यक्ष खर्च झाली आहे.

या निधीतून नागरी समाज, माध्यमे, लोकशाही प्रक्रिया, युवक प्रशिक्षण, आरोग्य आणि संशोधनाच्या नावाखाली अनेक प्रकल्प राबवले गेले. उदाहरणार्थ 37 दशलक्ष डॉलर्स नागरी समाज-माध्यमांसाठी, 35 दशलक्ष डॉलर्स किशोरवयीन आरोग्यासाठी, 8 दशलक्ष डॉलर्स लोकशाहीसाठी असे वाटप करण्यात आले. टीकाकारांचा दावा आहे की हे सर्व प्रकल्प प्रत्यक्षात राजकीय कथा तयार करण्याचे साधन ठरले.

एनजीओंचा संशयास्पद सहभाग

या निधीमागे NDI (National Democratic Institute), IRI (International Republican Institute) आणि IFES (International Foundation for Electoral Systems) या संस्थांचा सहभाग होता.

  • NDI ने 2020-22 दरम्यान संघराज्यीय रचना, दलित हक्क, हवामान बदल आणि युवकांच्या भूमिकेवर अहवाल सादर केले. त्यासोबतच युवकांसाठी प्रशिक्षण टूलकिट तयार करण्यात आले.

  • IRI ने राष्ट्रीय सर्वेक्षणाद्वारे लोकांच्या असंतोषाचे मोजमाप केले आणि तरुणांचा नवा राजकीय पर्याय हवा आहे हे अधोरेखित केले.

  • IFES ने स्थानिक निवडणुकांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मतदार जागरूकता मोहिमा राबवल्या.

अधिकृतपणे हे कार्यक्रम “लोकशाही मजबूत करण्यासाठी” होते. पण समीक्षक म्हणतात, या मार्गाने अमेरिकेने नेपाळच्या राजकारणात अजेंडा घुसवला.

निदर्शनांतून सत्तापालट

दरम्यान, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडियावरील बंदी या कारणांवरून नेपाळभर निदर्शने उसळली. सुरुवातीला शांततेत झालेल्या आंदोलनांनी लवकरच हिंसक रूप घेतले.

  • गेल्या आठवड्यात झालेल्या संघर्षांत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

  • संसद आणि सर्वोच्च न्यायालयाला आग लावण्यात आली.

  • शेकडो इमारतींचे नुकसान झाले.

याच गोंधळात पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार कोसळले.

जनरल झेड आंदोलन : तयार केलेली पटकथा?

विशेष म्हणजे, आज जे युवक आंदोलनाच्या अग्रभागी आहेत, तेच काही वर्षांपूर्वी अमेरिकन निधीतून चालवलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले असल्याचे दस्तऐवज दाखवतात. त्यामुळेच समीक्षक प्रश्न विचारतात नेपाळच्या जनरल झेड चळवळीची पटकथा अमेरिकेत बसून लिहिली गेली का?

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peñico city discovery : अमेरिकन संस्कृतीच्या उगमाचे रहस्य उलगडले; पेरूमध्ये सापडलेले 3800 वर्ष जुने शहर

लहान देश, मोठा प्रश्न

नेपाळसारख्या लहान देशाला एवढी प्रचंड आर्थिक मदत मिळणे हेच एक गूढ आहे. मदत खरोखर विकासासाठी होती का, की त्यामागे राजकीय धोरण लपले होते? हा प्रश्न आज नेपाळपुरता मर्यादित नाही. कारण जगभरात अमेरिकेच्या “लोकशाही प्रसार” कार्यक्रमावर नेहमीच अशा प्रकारचे आरोप होत आले आहेत.

Web Title: Us 900 million nepal genz movement questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • America
  • Nepal News
  • Nepal Protest
  • Nepal Violence

संबंधित बातम्या

अमेरिकेत भारतीय व्यक्तीचा थेट शिरच्छेद; निर्घृण हत्येप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडले मत
1

अमेरिकेत भारतीय व्यक्तीचा थेट शिरच्छेद; निर्घृण हत्येप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडले मत

Peñico city discovery : अमेरिकन संस्कृतीच्या उगमाचे रहस्य उलगडले; पेरूमध्ये सापडलेले 3800 वर्ष जुने शहर
2

Peñico city discovery : अमेरिकन संस्कृतीच्या उगमाचे रहस्य उलगडले; पेरूमध्ये सापडलेले 3800 वर्ष जुने शहर

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये शरिया कायद्यावर बंदी ; मुस्लिम संघटनांमध्ये उसळली संतापाची लाट
3

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये शरिया कायद्यावर बंदी ; मुस्लिम संघटनांमध्ये उसळली संतापाची लाट

सुशीला कार्कींची मोठी घोषणा; हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीदांचा दर्जा अन् पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई
4

सुशीला कार्कींची मोठी घोषणा; हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीदांचा दर्जा अन् पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.