
US Canada Relations
युरेनियम ते हिरे…. ‘या’ देशासोबतच्या मैत्रीमुळे भारतासाठी सुरु होणार सुवर्णकाळ ; तिजोरी होणार मालामल
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्पवर ग्रीनलँड आणि टॅरिफच्या मुद्यावरुन हल्लाबोल सुरु केला होता. दरम्यान यावेळी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी देखील या मुद्यांवरुन अमेरिकेवर अप्रत्यक्ष टीका केली होती. कार्नी यांनी अमेरिकेमुळे जागतिक व्यवस्थेत गंभीर परिणाम होत असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले होते. यावरुन डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तीव्र संताप व्यक्त करत कॅनडाच्या सुरक्षेबाबत मोठा स्फोट केला होता. तसेच कॅनडा अमेरिकेमुळे सुरक्षित असल्याचे म्हटले.
कॅनडाच्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जागतिक व्यवस्थेवरुन मोठे विधान केले होते. कार्नी यांनी ट्रम्प यांचा थेट उल्लेख न करता अमेरिकेच्या धोरणांमुळे जागतिक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, जग सध्या अशा वळणावर येऊन पोहोचले आहे. जिथे प्रमुख जागतिक शक्ती आर्थिक दबावाचा आणि जबरस्तीचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. त्यांच्या या विधानावर मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान कॅनडाच्या पंतप्रधानांच्या अप्रत्यक्ष टीकेनंतर ट्रम्प संतापले होते. त्यांनी सभेत आपल्या भाषणादरम्यान कॅनडाने अमेरिकेबद्दल कृतज्ञता दाखवली नाही असे दावा केला. त्यांनी दावा केला की अमेरिकेमुळेच कॅनडा सुरक्षित आहे. अमेरिकेच्या गोल्डन डोम एअर डिफेन्स सिस्टीमचा उल्लेख केला. अमेरिकेसाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते असे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांनी कॅनडाने कोणतेही विधान करण्यापूर्वी हे लक्षात ठेवावे, गोल्डन डोम केवळ अमेरिकेसाठीन नाही, तर कॅनडाच्या सुरक्षेसाठीही महत्वाची आहे.
🚨 HOLY CRAP! President Trump is now calling out Canada PM Mark Carney to his FACE for not being grateful to America 🔥 “Canada LIVES because of the US. Remember that, Mark [Carney], the next time you make your statements!” “I watched your PM yesterday, he wasn’t grateful!”… pic.twitter.com/wetyWc5z6C — Eric Daugherty (@EricLDaugh) January 21, 2026
भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप
Ans: मार्क कार्नी यांनी जागतिक आर्थिक मंचावर अमेरिकेचा थेट उल्लेख न करता वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, प्रमुख शक्ती आर्थिक दबावाचा आण जबरदस्तीचा वापर दुसऱ्या देशांवर करत आहे. यामुळे जागतिक व्यवस्थेवर परिणाम होत आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्क कार्नी यांच्या विधानावर संताप व्यक्त करत, कॅनडाची सुरक्षा ही अमेरिकेवर अवलंबून असल्याचा इशारा दिला. यामुळे कॅनडाने कोणतेही विधान करण्यापूर्वी विचार करावा असे ट्रम्प यांनी म्हटले.
Ans: ही प्रणाली अमेरिकेची हवाऊ संरक्षण प्रणाली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकाच नव्हे, तर कॅनडाच्या सुरक्षेसाठी देखील ही प्रणाली महत्वाची आहे.