US Citizenship For $5 Million Trump's Offer Gold Card to Rich Migrants
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाच्या सुरुवातीच्या काळातच देशातून बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्यापासून ते जन्मत: मिळणार अमेरिकन नागरिकत्व संपुष्टात आणले होते. आता त्यांनी अमेरिकन नागरिकत्वासाठी एक नवीन मार्ग श्रीमंत गुंणतवणूक दारासांठी खुला केला आहे. याद्वारे श्रीमंत विदेश गुणंतवणूक दारांना 5 दशलक्ष डॉलर्सच्या मोबदल्यात अमेरिकन नागरिकत्व मिळू शकते.
अमेरिकन सरकारसाठी महसूव निर्माण करणे
मंगळवारी ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून ही घोषणा केली. यादरम्यान त्यांनी या प्रस्तावाला ग्रीन कार्डचे प्रिमियम व्हर्जन म्हटले. यामुळे लोकांना दीर्घकालीन निवासी हक्क आणि नागरिकत्वाचा मार्ग उपल्बध होईल. ट्रम्प यांनी म्हटले की, “आम्ही एक गोल्ड कार्ड विकणार असून या कार्डची किंमत सुमारे दशलक्ष डॉलर्स असे”. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हा नवीन कार्यक्रम उच्च-श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेत आकर्षित करेन आणि अमेरिकन सरकारसाठी महसूल निर्माण होईल.
ग्रीन कार्ड साठी 10 लाख दशलक्ष डॉलर्सची गुंणतवणूक आवश्यक
‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ EB-5 कार्यक्रम इमिग्रट इन्व्हेस्टर व्हिसा प्रोगामची जागा घेईल. या व्हिसाचा उद्देश विदेशी गुंणतवणूकदारांना आकर्षित करणे आहे. यामध्ये लोकांना किमान 10 लाख दशलक्ष डॉर्लसची गुंणतवणूक करावी लागेल. यामुळे किमान दहा अमेरिकन नोकऱ्या निर्माण होतील आणि ग्रीन कार्ड मिळेल. ट्रम्प यांनी EB-5 व्हिसा कार्यक्रमाला अप्रभावी आणि कालबाह्य असे संबोधले आहे.
अमेरिकेत नोकऱ्या निर्माण करण्यासाठी
वाणिज्य विभागाचे सचिव हॉवर्ड लुटनि यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, “या EB-5 व्हिसा प्रोग्रामऐवजी आम्ही ट्रम्प गोल्ड कार्ड आणणार आहोत. EB-5 च्या विपरीत, यामध्ये नोकऱ्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे, गोल्ड कार्ड कार्यक्रम मुख्यतः अमेरिकन सरकारला थेट पेमेंटवर लक्ष केंद्रित करते.तसेच ट्रम्प यांनी 10 दशलक्ष डोल्ड कार्ड विकण्याची कल्पना मांडली आहे.
मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, गोल्ड कार्ड धारकांना नोकऱ्या निर्माण करणे गरजेचे आहे, जो EB-5 प्रोग्रामचे मुख्य घटक आहे.ट्रम्प यांच्या मते, श्रीमंत लोकांसाठी हा नागरिकत्वाचा मार्ग असून यामुळे अमेरिकन कंपन्यांना पैसा उपलब्ध होईल आणि देशात दीर्घकालीन स्थिती निर्माण होईल. आता ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जागतिक स्तरावर काय परिणाम होईल? तसेच लोक ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी गुणंतवणूक करतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.