Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

USCIRF: ‘RAW’ वर बंदी आणि ‘RSS’ चा व्हिसा रद्द! अमेरिकेच्या ‘या’ वादग्रस्त मागणीमागे नेमकं कुणाचं डोकं? भारत शत्रूंच्या यादीत

USCIRF India Report 2026 : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या २०२६ च्या वार्षिक अहवालात भारताला विशेष चिंताजनक देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 16, 2026 | 11:15 AM
us commission recommends ban on rss and raw india religious freedom report 2026

us commission recommends ban on rss and raw india religious freedom report 2026

Follow Us
Follow Us:
  • RSS आणि RAW टार्गेटवर
  • भारताला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी
  • कडक निर्बंधांची शिफारस

USCIRF India Report 2026 : भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक मैत्री एका निर्णायक वळणावर आली असतानाच, अमेरिकेच्या एका स्वायत्त आयोगाने घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा गदारोळ माजला आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) आपल्या २०२६ च्या वार्षिक अहवालात चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारताची बाह्य गुप्तचर संस्था ‘रॉ’ (RAW) वर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. या शिफारसींमुळे केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

काय आहेत या धक्कादायक शिफारसी?

USCIRF ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारताला ‘विशेष चिंताजनक देश’ (Country of Particular Concern) म्हणून घोषित करण्यात यावे. हे लेबल सामान्यतः अशा देशांना दिले जाते जिथे धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन होते. या आयोगाने केवळ एवढ्यावरच न थांबता, आरएसएसच्या मालमत्ता जप्त करण्याची आणि त्यांच्या सदस्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्याची मागणी केली आहे. तसेच, भारताच्या ‘रॉ’ या संस्थेवर गेल्या वर्षी झालेल्या शिख फुटीरतावाद्यांच्या प्रकरणावरून कडक निर्बंध लादण्याची शिफारस केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: तुमचं तुम्ही बघा! ट्रम्प यांच्या होर्मुझ प्लॅनला जर्मनीचा कडवा प्रतिकार; US ची ‘घाण’ साफ करण्यास बर्लिनचा नकार

शस्त्रविक्री आणि व्यापारावर टांगती तलवार?

आयोगाच्या शिफारसींमधील सर्वात गंभीर भाग म्हणजे भारताला होणारी शस्त्रास्त्र विक्री. अमेरिकन नागरिकांच्या कथित छळाचे कारण देत भारतासोबतचे लष्करी आणि व्यापारी संबंध हे धार्मिक स्वातंत्र्याच्या अटींशी जोडले जावेत, असे या अहवालात म्हटले आहे. जर ट्रम्प प्रशासनाने या शिफारसी मान्य केल्या, तर याचा परिणाम भारताच्या संरक्षण क्षमतेवर आणि द्विपक्षीय व्यापारावर होऊ शकतो. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की व्हाईट हाऊस या शिफारसी स्वीकारण्यास बांधील नाही.

‘RSS पर अमेरिका में प्रतिबंध लगाना चाहिए’ – ये बात अमेरिका की सरकारी संस्था USCIRF ने ट्रंप सरकार से कही है। USCIRF का कहना है कि RSS लोगों की धार्मिक आजादी के लिए खतरनाक है। ये धर्म के आधार पर भेदभाव बढ़ाने के लिए जिम्मेदार है। इसलिए 👇🏼 • RSS पर तुरंत प्रतिबंध लगाया जाए
•… pic.twitter.com/sFQKVuwagj
— Congress (@INCIndia) March 16, 2026

credit – social media and Twitter

१८ देशांच्या यादीत भारताचा समावेश

या आयोगाने भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशांच्या रांगेत नेऊन उभे केले आहे. एकूण १८ देशांमध्ये भारताचा समावेश करून या आयोगाने भारताच्या लोकशाहीवर आणि धार्मिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या सात वर्षांपासून हा आयोग सातत्याने भारताच्या विरोधात अहवाल सादर करत आहे, मात्र भारताने नेहमीच हे अहवाल ‘पूर्वाग्रहदूषित’ आणि ‘भारताच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप’ करणारे असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WorldWar3: ‘आम्ही एकटे नाही, ‘ते’ आमच्या पाठीशी!’ इराणला ‘या’ महासत्तांनी पुरवली US लष्करी तळांची गुपितं; अब्बास अराघचींचा दावा

RAW वर नेमका आक्षेप काय?

२०२५ मध्ये कॅनडा आणि अमेरिकेतील शिख फुटीरतावाद्यांशी संबंधित प्रकरणांवरून भारताच्या ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेवर आरोप झाले होते. याच आरोपांचा आधार घेत USCIRF ने ‘रॉ’ च्या कार्यप्रणालीवर बंदी घालण्याची किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांवर लक्ष्यित निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही संस्था आता अमेरिकन राजकारण्यांच्या निशाण्यावर आल्याने दिल्लीतील सत्ताधारी गोटात हालचाली वाढल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: USCIRF म्हणजे काय आणि त्यांच्या शिफारसी बंधनकारक आहेत का?

    Ans: USCIRF ही अमेरिकन सरकारची एक स्वतंत्र सल्लागार संस्था आहे. त्यांनी केलेल्या शिफारसी व्हाईट हाऊसला सादर केल्या जातात, मात्र त्या मान्य करणे ट्रम्प प्रशासनावर बंधनकारक नाही.

  • Que: आयोगाने आरएसएस (RSS) वर बंदी का मागितली आहे?

    Ans: आयोगाचा असा आरोप आहे की आरएसएसची विचारधारा धार्मिक स्वातंत्र्याच्या आड येते, मात्र भारताने हा दावा नेहमीच निराधार असल्याचे म्हटले आहे.

  • Que: भारताने या अहवालावर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: भारताने यापूर्वीही अशा अहवालांना 'राजकीय हेतूने प्रेरित' म्हटले असून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे.

Web Title: Us commission recommends ban on rss and raw india religious freedom report 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Donald Trump
  • RAW
  • RSS
  • World news

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
2

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.