इराण-अमेरिका युद्ध: ट्रम्प यांच्या 'लष्करी युती'ला खिंडार! जर्मनीने हात झटकले; मध्यपूर्वेत अमेरिका पडणार एकटी? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Germany rejects US Hormuz Mission : मध्यपूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता केवळ रणांगणापुरते मर्यादित राहिले नसून, ते आता जागतिक मुत्सद्देगिरीच्या (Diplomacy) कसोटीवर उतरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी एक मोठी जागतिक आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र समजल्या जाणाऱ्या जर्मनीने या मोहिमेत सहभागी होण्यास स्पष्ट शब्दांत नकार देऊन ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. जर्मनीच्या या भूमिकेमुळे ‘नाटो’ (NATO) देशांमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.
जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले की, जर्मनी सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणतीही लष्करी भूमिका बजावणार नाही. “आम्ही या संघर्षाचा भाग बनणार का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. जर्मनीच्या मते, होर्मुझची सुरक्षा ही तोफा आणि विमानांनी नाही, तर राजनैतिक संवाद आणि कूटनीतीनेच सुनिश्चित केली जाऊ शकते. जर्मनीने घेतलेली ही भूमिका अमेरिकेच्या आक्रमक धोरणापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bibi Alive: नेतान्याहू यांचा ‘तो’ VIDEO आणि अफवांचा बाजार; इस्रायली पंतप्रधानांनी शत्रूला आपल्याच स्टाईलमध्ये कसं झापलं?
जर्मनीने यावेळी युरोपियन युनियनच्या ‘ऑपरेशन अॅस्पाइड्स’चा उल्लेख केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये हुथी बंडखोरांपासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र, वाडेफुल यांच्या मते, हे अभियान अद्याप पूर्णपणे प्रभावी ठरलेले नाही. “जेव्हा आधीची मोहीमच संघर्ष करत आहे, तेव्हा होर्मुझसारख्या अतिशय संवेदनशील भागात नवीन आघाडी उघडणे जर्मनीला मान्य नाही,” असे संकेत त्यांनी दिले आहेत. यामुळे युरोपमधील इतर देशही आता अमेरिकेला पाठिंबा देण्यापूर्वी दोनदा विचार करण्याची शक्यता आहे.
Germany will not send long-range Taurus missiles — Scholz. “We have made a clear decision about what we will and will not do. This decision will not change.” And yet, they could help all of us end the war faster. But no. pic.twitter.com/EygANmLBS4 — Maria Drutska 🇺🇦 (@maria_drutska) September 14, 2024
credit – social media and Twitter
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. त्यांनी अशा सात देशांची यादी तयार केली आहे जे त्यांच्या ऊर्जा गरजांसाठी मध्यपूर्वेतील तेलावर अवलंबून आहेत. ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेला आता या मार्गाची तितकीशी गरज नाही, कारण आमच्याकडे स्वतःचे तेल साठे मुबलक आहेत. त्यामुळे ज्या देशांना तेल हवे आहे, त्यांनी पुढे येऊन या प्रदेशाचे रक्षण करावे.” ट्रम्प यांच्या या विधानाचा सरळ अर्थ असा आहे की, अमेरिका आता दुसऱ्यांच्या हितासाठी स्वतःचे सैन्य आणि पैसा खर्च करण्यास तयार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Diplomacy: इराणची भारताला मोठी ‘ऑफर’; होर्मुझमधून मार्ग मोकळा, पण PM मोदींना घ्यावा लागणार ‘हा’ मोठा निर्णय
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची ‘आर्थिक नाडी’ मानली जाते. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० ते ३० टक्के तेल याच मार्गावरून जाते. इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, तर अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत जर्मनीसारख्या बड्या देशाने माघार घेतल्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ans: जर्मनीच्या मते ही समस्या लष्करी बळापेक्षा राजनैतिक संवाद आणि कूटनीतीने सोडवणे गरजेचे आहे, तसेच त्यांना सध्याच्या परिस्थितीत नवीन लष्करी धोका पत्करायचा नाही.
Ans: हे युरोपियन युनियनचे एक नौदल अभियान आहे, जे लाल समुद्रात व्यापारी जहाजांना हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
Ans: ट्रम्प यांनी तेलावर अवलंबून असलेल्या देशांना होर्मुझच्या सुरक्षेसाठी एक लष्करी युती (Coalition) बनवण्याचे आवाहन केले आहे.






