Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : अमेरिकेसमोर इराण झुकणार? सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेईंच्या ‘त्या’ निर्णयाने खळबळ, युद्ध थांबणार?

US Iran Ceasefire Talks : मध्यपूर्वेत इराण-अमेरिकेत तणावाचे वातावरण निवळताना दिसत आहे. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे, दुसरीकडे इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई देखील चर्चेस तयार असल्याचा दावा आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 02:43 PM
Mojtaba Khamenei and Donald Trump

Mojtaba Khamenei and Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील २४ दिवसांचा संघर्ष थांबणार
  • अमेरिकेसमोर झुकणार इराण
  • इराणच्या उर्जा केंद्रावर हल्ला
US-Israel Iran Ceasefire Talks : मध्यपूर्वेत गेल्या २४ दिवसांपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US-Israel Iran) सुरु होते. दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले सुरु होते. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होता. पण आता शांततेची चिन्हे दिसू लागली आहेत. इस्रायलच्या प्रसारमध्यम अल अरेबियाने दिलेल्या वृत्तानुसार, इराण अमेरिकेशी चर्चेस तयार आहे.

US-Israel Iran War : ट्रम्प यांचा ‘डबल गेम’! एकीकडे इराणशी चर्चेचा दावा अन् दुसरीकडे एनर्जी प्लँट्समिसाइलवर हल्ला?

अमेरिकेसमोर झुकला इराण?

इस्रायलचे प्रसारमाध्यम अल अरेबियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यास आणि संभाव्य करारासाठी तयार आहेत.या दाव्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप इराणने याची पुष्टी केलीली नाही.

अमेरिका-इराणमध्ये थेट चर्चा सुरु आहे का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतेच, इराणशी ५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली. याशिवाय त्यांनी मंगळवारी (२४ मार्च २०२६) सकाळी त्यांचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि सल्लागार जॅरेड कुशनर इराणच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्कात असल्याचे म्हटले.

यासाठी ५ दिवसांचा वेळ देण्यात आला असल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे, या काळात इराणसोबत शांतता करार होऊ शकतो. यामुळे अमेरिकेने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील नियोजित हल्ले तात्पुरते थांबवले असल्याचा दावा केला आहे.

इराणची भूमिका

इस्रायलच्या माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, इराणचे लीडर खामेनेई शांतता चर्चेसाठी तयार आहेत. परंतु इराणच्या अधिकृत यंत्रणांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तसेच ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्याला देखील इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि ‘फार्स न्यूज’ने फेटाळले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारची कोणतीही थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केवळ मध्यस्थी देशांच्या मार्फत अमेरिकेचा १५ कलमी प्रस्ताव मिळाल्याचे संकेत इराणने दिले आहेत.मात्र अमेरिकेशी चर्चेच्या दाव्यावर मोजतबा खामेनेईंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इराणच्या दोन उर्जा केंद्रांवर हल्ला

या चर्चेच्या घडामोडींदरम्यान इराणच्या दोन प्रमुक उर्जा केंद्रावर हल्ले झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी(२४ मार्च २०२६) पहाटे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)च्या निमलष्करी वृत्तसंस्थेने देशातील दोन प्रमुख उर्जा केंद्रावर हल्ले झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये इस्फहानमधील नैसर्गिक वायूचा पायाभूत प्रकल्प आणि खोर्रमधील वीज प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले असल्याचे म्हटले.

युद्ध थांबणार का?

सध्या इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्याची जबाबदारी अमेरिका किंवा इस्रायलने घेतलेली नाही. तसेच शांतता चर्चेस तयार असल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. यामुळे युद्धबंदीवर अनिश्चितता कायम आहे.

दिलासादायक ! युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण अमेरिकेशी चर्चेस तयार आहे का?

    Ans: काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे नवे सुप्रीम लीडर अमेरिकेशी शांतता चर्चेस तयार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अद्याप इराणी माध्यमांनी किंवा सरकारने याची अधिकृत पुष्टी केलीली नाही.

  • Que: अमेरिका-इराणमध्ये थेट शांतता चर्चा सुरु आहे का?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका इराणशी संवाद साधत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे. परंतु इराणने अद्याप कोणत्याही थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चा सुरु असल्याची पुष्टी केलेली नाही.

Web Title: Us iran ceasefire talks mojtaba khamenei donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.