Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Islamabad Talks: युद्धाच्या सावटात शांततेची नवी पहाट! US-Iran पुन्हा आमनेसामने; इस्लामाबादमध्ये ‘या’ दिवशी ठरणार जगाचे भवितव्य

US-Iran War: मध्य पूर्वेत शांततेची आशा! पाकिस्तानमधील इस्लामाबाद, अणुप्रश्नावर अमेरिका आणि इराण यांच्यातील महावाणिज्य वाटाघाटींसाठी तयार असून, याची निर्णायक फेरी सोमवारी सुरू होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 18, 2026 | 11:30 AM
us iran peace talks reschedule islamabad monday strait of hormuz crisis 2026

us iran peace talks reschedule islamabad monday strait of hormuz crisis 2026

Follow Us
Follow Us:
  • चर्चेची दुसरी फेरी
  • ट्रम्प यांना आशा
  • होर्मुझचा पेच

Donald Trump Iran nuclear deal update : मध्य पूर्वेतील युद्धाची भीषण परिस्थिती (US-Israel Iran War) आणि ओमानच्या आखातातील नौदल नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण जगाचे लक्ष आता पुन्हा एकदा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अणू संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी चर्चेची एक नवीन आणि अत्यंत संवेदनशील फेरी सोमवारी (२० एप्रिल) सुरू होणार आहे. या बैठकीसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी रविवारीच इस्लामाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, जगभरातील मुत्सद्दी या हालचालींकडे डोळे लावून बसले आहेत.

पडद्यामागे हालचालींना वेग: ट्रम्प यांची सकारात्मक भूमिका

गेल्या आठवड्यात झालेली २१ तासांची मॅरेथॉन चर्चा जरी कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली असली, तरी संवादाची दारे अद्याप बंद झालेली नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. ट्रम्प यांना विश्वास आहे की, आर्थिक निर्बंधांच्या दबावाखाली असलेला इराण या फेरीत काही महत्त्वाच्या अटींवर तडजोड करण्यास तयार होऊ शकतो. मात्र, दुसरीकडे इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अद्यापही अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याचे सांगत सावध पवित्रा घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Oil : युद्धाचा फटका की रणनीती? ट्रम्प प्रशासनाचा रशियन तेलाबाबत मोठा निर्णय; भारतासह जगाला मोठा दिलासा

शस्त्रसंधी संपण्यापूर्वीचा ‘निर्णायक’ प्रयत्न

पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये जो तात्पुरता शस्त्रसंधी (Ceasefire) घडवून आणला होता, त्याची मुदत आता संपत आली आहे. जर सोमवारी होणाऱ्या या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, तर आखाती प्रदेशात पुन्हा एकदा लष्करी कारवायांचा भडका उडू शकतो. म्हणूनच, ही बैठक केवळ इराण किंवा अमेरिकेसाठीच नाही, तर जागतिक तेल पुरवठ्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

🇮🇷🇺🇸🇵🇰 A new round of US–Iran talks is expected to take place in Islamabad, Pakistan, on Monday, according to CNN, citing Iranian officials. pic.twitter.com/KPLqDQQOLo — RusWar (@ruswar) April 18, 2026

credit – social media and Twitter

होर्मुझची सामुद्रधुनी आणि ऊर्जा संकटाचे आव्हान

या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ आहे. जगातील २०% तेल व्यापार या मार्गातून होतो. इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेचा नौदल दबाव आणि नाकेबंदी कायम राहिली, तर हा मार्ग कायमचा बंद केला जाईल. सध्या इराणने हा मार्ग खुला असल्याचे म्हटले असले तरी, युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यापारी जहाजांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. या बैठकीत हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bible Prophecy : केवळ निसर्गचक्र नाही! धार्मिक ग्रंथांतील ‘प्रलयाच्या’ खुणा इस्रायलमध्ये? ‘या’ भविष्यवाण्या झाल्या खऱ्या

इस्रायल-हिजबुल्लाह शस्त्रसंधीचा प्रभाव

लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शस्त्रसंधीचा प्रभाव देखील या चर्चेवर पडताना दिसत आहे. इराण हिजबुल्लाहचा प्रमुख पाठीराखा असल्याने, प्रादेशिक शांततेसाठी इराणला विश्वासात घेणे अमेरिकेसाठी अनिवार्य झाले आहे. शांततेसाठी हा अखेरचा प्रयत्न मानला जात असून, राजनैतिक मार्गाने युद्ध टाळता येईल का? याचे उत्तर सोमवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा कुठे होणार आहे?

    Ans: ही महत्त्वाची शांतता चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणार आहे.

  • Que: सोमवारी होणारी बैठक का महत्त्वाची आहे?

    Ans: कारण पाकिस्तानने मध्यस्थी केलेली तात्पुरती शस्त्रसंधी संपुष्टात येत आहे आणि तणाव कमी करण्यासाठी हा शेवटचा राजनैतिक प्रयत्न मानला जात आहे.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीचा या चर्चेत काय संबंध आहे?

    Ans: होर्मुझ हा जागतिक तेलाचा प्रमुख मार्ग आहे. इराणने तो बंद करण्याची धमकी दिली असल्याने, जागतिक ऊर्जा संकट टाळण्यासाठी हा मार्ग मोकळा ठेवण्यावर चर्चा होईल.

Web Title: Us iran peace talks reschedule islamabad monday strait of hormuz crisis 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Islamabad
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
3

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
4

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.