Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert: रविवारी इराणवर बॉम्बवर्षाव? अमेरिकेचा ‘फायनल वॉर्निंग’ नंतर मोठा निर्णय; ट्रम्प सरकार तेहरान उलटवून टाकण्याच्या तयारीत

World War 3 : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स रविवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत लष्करी सराव सुरू करणार आहेत, ज्यामुळे मध्य पूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यात संताप व्यक्त होत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 31, 2026 | 11:26 AM
us iran war alert trump military strike sunday tehran irgc conflict 2026

us iran war alert trump military strike sunday tehran irgc conflict 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • युद्धाचा सायरन
  • ट्रम्प यांचा ‘ग्रीन सिग्नल’
  • जागतिक व्यापार धोक्यात

US attack on Iran Sunday news : मध्य पूर्वेतील (Middle East) वातावरण आता ज्वालाग्राही बनले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध आता थेट लष्करी संघर्षात बदलताना दिसत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीत अचानक ‘लाईव्ह-फायर’ नौदल सराव जाहीर केल्यामुळे अमेरिकन सैन्य आक्रमक झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रविवारी इराणवर हवाई हल्ल्याची अधिकृत घोषणा करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी आणि संघर्षाचे कारण

होर्मुझची सामुद्रधुनी हा असा मार्ग आहे जिथून जगातील सुमारे २०% तेल पुरवठा होतो. दररोज १०० हून अधिक व्यापारी जहाजे येथून प्रवास करतात. इराणने या अरुंद मार्गात क्षेपणास्त्रांचा सराव सुरू केल्याने अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) कडक शब्दांत ताकीद दिली आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, आमच्या जहाजांच्या किंवा विमानांच्या मार्गात इराणने हाय-स्पीड बोटी किंवा शस्त्रे रोखल्यास त्याला ‘असुरक्षित कृती’ मानले जाईल आणि त्याचे परिणाम इराणला भोगावे लागतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘शरणागती नाही, युद्धच!’ अमेरिकेचा इराणला 3 बाजूंनी वेढा, 6 विनाशक नौका; ट्रम्प यांच्या अटींनी आखात पेटले

रविवारी काय घडू शकते? ‘ड्रॉपसाईट न्यूज’चा खळबळजनक खुलासा

‘ड्रॉपसाईट न्यूज’च्या ताज्या अहवालानुसार, अमेरिकन लष्करी रणनीतीकारांनी इराणमधील अणू प्रकल्प, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र केंद्रे आणि IRGC च्या तळांवर हल्ल्याची ब्लू-प्रिंट तयार केली आहे. मध्य पूर्वेतील एका बड्या मित्र देशाला (संभाव्यतः इस्रायल) अमेरिकेने कळवले आहे की, जर परिस्थिती सुधारली नाही तर रविवारी पहाटेपासून इराणवर बॉम्बवर्षाव सुरू होऊ शकतो. हे हल्ले केवळ लष्करी तळांपुरते मर्यादित नसून, इराणमधील सत्तापालट (Regime Change) घडवून आणण्यासाठी थेट नेतृत्वावर देखील होऊ शकतात.

USA will attack iran soon? revolutionary guard suffered heavy losses abroad and faced uprising inside country january 27 regime replaced several military commanders, including possible replacement of irgc commander general salami with general pakpor whats happening right now:… pic.twitter.com/KTvGnIC77H — kiruwaaaa (@kiruwaaaaaa) January 30, 2026

credit – social media and Twitter

सत्तापालटाचा ‘मास्टर प्लॅन’ आणि इस्रायलची भूमिका

ट्रम्प प्रशासनाचा असा विश्वास आहे की, जर इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावर आणि IRGC वर यशस्वी हल्ला झाला, तर इराणमधील जनता रस्त्यावर उतरेल आणि विद्यमान सरकार कोसळेल. अहवालात असेही म्हटले आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना आश्वासन दिले आहे की, इराणमध्ये नवीन लोकशाहीवादी सरकार स्थापन करण्यासाठी इस्रायल पूर्ण मदत करेल. यामुळेच यावेळचा संघर्ष केवळ सीमावादापुरता नसून तो इराणचे अस्तित्व बदलणारा ठरू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Nuclear Secret: इराणचा ‘अणू’ डाव! उद्ध्वस्त केंद्रांवर उभारली रहस्यमय छप्परं; अमेरिकेची झोप उडवणारा सॅटेलाईट फोटो आला समोर

जागतिक परिणाम आणि भारताची चिंता

जर रविवारी खरोखरच हल्ला झाला, तर कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) प्रचंड वाढ होईल, ज्याचा थेट परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थ्यावर होईल. भारताचे इराणशी व्यापारी संबंध आणि चाबहार बंदर प्रकल्प यामुळे नवी दिल्ली या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि इराणमध्ये तणाव का वाढला आहे?

    Ans: इराणच्या IRGC दलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीत लाईव्ह-फायर सराव सुरू केल्यामुळे आणि अमेरिकन जहाजांना अडथळा निर्माण केल्यामुळे तणाव वाढला आहे.

  • Que: रविवारी हल्ला होणार असल्याचे वृत्त काय आहे?

    Ans: गुप्तचर अहवाल आणि काही मीडिया सूत्रांनुसार, अमेरिका रविवारी इराणच्या लष्करी आणि अणू तळांवर हल्ले करण्याची शक्यता आहे.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी का महत्त्वाची आहे?

    Ans: हा जगातील सर्वात मोठा तेल वाहतूक मार्ग आहे, जिथून रोज लाखो बॅरल कच्च्या तेलाची निर्यात होते.

Web Title: Us iran war alert trump military strike sunday tehran irgc conflict 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • iran
  • World War 3

संबंधित बातम्या

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ
1

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ

Iran Nuclear Secret: इराणचा ‘अणू’ डाव! उद्ध्वस्त केंद्रांवर उभारली रहस्यमय छप्परं; अमेरिकेची झोप उडवणारा सॅटेलाईट फोटो आला समोर
2

Iran Nuclear Secret: इराणचा ‘अणू’ डाव! उद्ध्वस्त केंद्रांवर उभारली रहस्यमय छप्परं; अमेरिकेची झोप उडवणारा सॅटेलाईट फोटो आला समोर

VIRAL VIDEO : सत्तेच्या मंचावर प्रेमाच्या गप्पा! ट्रम्पनी आपल्याच मंत्र्याच्या पत्नीशी भरसभेत केलं फ्लर्ट; सोशल मीडियावर खळबळ
3

VIRAL VIDEO : सत्तेच्या मंचावर प्रेमाच्या गप्पा! ट्रम्पनी आपल्याच मंत्र्याच्या पत्नीशी भरसभेत केलं फ्लर्ट; सोशल मीडियावर खळबळ

US-Iran War: ‘शरणागती नाही, युद्धच!’ अमेरिकेचा इराणला 3 बाजूंनी वेढा, 6 विनाशक नौका; ट्रम्प यांच्या अटींनी आखात पेटले
4

US-Iran War: ‘शरणागती नाही, युद्धच!’ अमेरिकेचा इराणला 3 बाजूंनी वेढा, 6 विनाशक नौका; ट्रम्प यांच्या अटींनी आखात पेटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.