US is not most powerful country, says American journalist Ric Sanchez
Donald Trump News in Marathi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या चर्चेचा विषय बनत आहे. त्यांच्या परराष्ट्र धोरणांमुळे त्यांना जगभरातून टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण एक दिवस त्यांच्या भूमिका अतिशय चांगली, तर दुसऱ्या दिवशी विरोधी भूमिका घेत आहेत. दरम्यान त्यांच्या या धोरणावर अमेरिकेन जेष्ठ पत्रकार रिक सांचेज यांनी तीव्र टीका केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणामुळे अमेरिका एकटा पडत चालला आहे. अमेरिका भारतासारख्या मित्र देशांना चीनच्यासारख्या प्रतिस्पर्धी देशांच्या जवळ ढकलत आहेत. त्यांचे हे विधान चीनच्या तियानजिनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संगघटना परिषदेनंतर आले आहे.
ट्रम्प यांचे बिघडले मानसिक संतुलन?
सांचेज यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. कारण एक दिवस ते एखाद्या देशांसी मैत्रीपूर्ण संवाद साधत आहे, तर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर टीका करत आहेत. यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. जगातील इतर देशांना त्यांच्या या अशा वागण्यामुळे अमेरिकेच्या धोरणांना दुर्लक्ष करायचे का महत्व द्यायाचे असा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी बरेच देश त्यांच्या धमक्यांनाही विरोध करत आहे.
चीन घेत आहे फायदा?
मात्र या गोंधळाचा फायदा थेट चीनला होत आहे. अमेरिका आपल्या मित्र देशांना गमावत आहे, त्या ठिकाणी चीन व्यापार व संसाधन करांराद्वारे मैत्री साधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतासारख्या देशालाही ट्रम्प यांनी दूर स्वत:हा दूर केले आहे, आणि यामुळेच ब्रिक्स आणि SCO गटांची ताकज वाढत आहे. ही ताकद भविष्यात G-7 पेक्षा मोठी ठरु शकते.
अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर सांचेझ यांची टीका
दरम्यान पत्रकार सांचेझ यांनी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहे. ट्रम्प यांना त्यांनी पुतिन किंवा चीनच्या नेत्यांशी भेटणे योग्य वाटत आहे, पण भारताच्या पंतप्रधानांनी चीन किंवा रशियाला भेटणे अयोग्य. हे तर असेल झाले की, मी करेल ते बरोबर, पण दुसऱ्या कोणी केले तर ते चुकीचे. सांचेंज यांच्या मते, ट्रम्प यांची ही मानसिकता अत्यंत हास्यास्पद आहे.
सांचेझ यांनी यावेळी इस्रायल आणि अमेरिकेची तुलनाही केली. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका स्वत:चे निर्णय न घेता इस्रायलच्या सुचनांवर चालत आहे, यामुळे इस्रायल हा सर्वात ताकदवार आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिका फर्स्ट नव्हे, तर इस्रायल फर्स्ट हे धोरण अवलंबत आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही गोंधळ उडाला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, परिस्थिती पूर्णत: बिघडली नाही. यामुळे ट्रम्प यांनी लवकराच लवकर परराष्ट्र धोरणा योग्य तो बदल करावा.
अमेरिकेच्या हवाई राज्यावर घोंगावतय ‘किको’ वादळाचे संकट; आणीबाणीचा इशारा जारी