ट्रम्प यांच्या एका निर्णयाने 'या' देशातील कित्येक नवजात बालकांचा जीव धोक्यात! ताज्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे पूर्व आफ्रिकेत लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. फिजिशियन्स फॉर ह्यूमन राइट्सने यासंदर्भात एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ट्रम्प यांनी पूर्व आफ्रिकेत अमेरिकेन कार्यक्रम पेपफर बंद केल्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले असल्याचे सांगितले आहे. या अहवालात यामध्ये सांगण्यात आले आहे की, ट्रम्प यांनी पूर्व आफ्रिकेतील लोकांना मदत पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यामुळे येथील महिला आणि मुलांचे जीवन धोक्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. विशेष करुन औषधांचा पुरवठा कमी झाल्याने अनेक महिलांना आपल्या मुलांना HIV पासून वाचवणे शक्यत झाले नाही. सध्या पूर्व आफ्रिकेत HIV वेगाने पसरत असून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. यामुळे अनेक महिलांना गर्भपात करावा लागत आहे.
काय आहे अमेरिकन कार्यक्रम पेपफर?
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने २००३ मध्ये पेपफर नावाचा जागतिक आरोग्य प्रकल्प सुरु केला होता. या प्रकल्पांतर्गत आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये लाखो लोकांचे जीवन वाचवण्यात आले होते. याअंतर्गत लोकांना आरोग्यशी संबंधित औषधांचा, लसींचा पुरवठा केला जात होता. पंरुत २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीत निवडूण आले आणि हा प्रकल्प बंद करण्यात आला.
ट्रम्प यांनी २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर, पेपफरसाठीचा ६ अब्ज डॉलर्सचा निधी थांबवला आहे. अहवालानुसार, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आफ्रिकन देशात औषधांचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे अहवालात अमेरिकेकडून निधी पून्हा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
काय होत आहे परिणाम?