अमेरिकेच्या हवाई राज्यावर घोंगावतय 'किको' वादळाचे संकट; आणीबाणीचा इशारा जारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
NWS ने दिलेल्या माहितीनुसार, किको वादळ पश्चिम-वायव्येकेडे २५ मैल प्रती तासाच्या गतीने सरकत आहे. यामुळे प्रशानासनाने हवाई राज्यात आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे.
हवामान खात्याने रविवारी हे वादळ बिग आयलंड आणि माऊई बेटावर धडकण्याची भीती व्यक्त केली आहे. तर सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे वादळ पूर्व हवाई बेटसमूहाला धडकले असे सांगतिले आहे. याचा परिणाम भीषण असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवाई राज्याचे कार्यवाहक राज्यपाल ल्यूक यांनी नागरिकांना आणि पर्यटकांना अधिकृत अपडेट्स चेक करण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच राज्य सरकारने बचाव आणि मदतकार्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात सुरुवात केली आहे. मलबा हटवणे, रस्ते, पूल सुरक्षित ठेवणे आणि आवश्य संसाधनमे उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु आहे. प्राशासनाने किको चक्रीवाद अत्यंत शक्तीशाली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवाईच्या किनाऱ्यालगत याची तीव्रता कमी असू शकते, परंतु ‘बिग आयलंड’ वर पोहोचण्यापूर्वी वादळ उष्णकटिबंधीय वादळात परिवर्तीती होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे.
आणीबाणीची सुचना जारी
हवाई इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने (EMA) आणीबाणीची सुचना जारी केली आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकानंतर प्रथमच हवाईला कीको वादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी १९९२ मध्ये इनिकी नावाच्या चक्रीवादळाने हवाई राज्यात प्रचंड विध्वंस घडवून आणळा होता. याचा वेग १४५ मैस प्रती तास नोंदवला गेला होता.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालांतर आणि खबरादारी घेण्यास सांगण्यात आले आहे. हवाई बेटावरील पर्यटाकांना अधिककृत सुचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी सुचनाही जारी करण्यात आली आहे. सध्या हवाई राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘या’ देशात जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार; तरीही राष्ट्र दारिद्र्य अन् महागाईने त्रस्त, कारण काय?






