US Launches Major Crackdown on Venezuelas Nicolas Maduro Offers Dollar 50 Million Bounty Over Drug Links
Nicolas Maduro drug case news marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मदुरो यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच त्यांच्या अटकेवर ५० दशलक्ष डॉलर्सचे बक्षिस ठेवले आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने निकोलसवर ड्रग्ज तस्करी केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या मते निकोलसने फेंटानिल कोकीनची तस्कीर अमेरिकेत केली आहे. यापूर्वी देखील २०२० च्या ट्रम्प प्रशासनाच्या काळात मादुरोवर ड्रग्ज तस्करीचा आरोप करण्यात आला होता.
अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांनी याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोस मादुरो यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यांना ५० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल. यापूर्वी ही रक्कम २५ दशलक्ष डॉलर्स होती, परंतु आता ही दुप्पट केली आहे. पाम बोंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकोलस मादुरो जगातील सर्वा मोठे ड्रग्ज तस्करी नेटवर्क डी अरागुआ आणि सिनालोआ कार्टेलसोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. निकोलस मादुरो याच्यांवर त्यांनी अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कोकेनची तस्करी केल्याचा आरोप केला आहे.
लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी केला संपर्क; ‘या’ मुद्यांवर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
२०२० मध्ये देखील ठेवण्यात आले होते बक्षीस
यापूर्वी २०२० मध्ये देखील ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांच्यावर अंमली पदार्थांची तस्करी, कोकेनची तस्कीरीचे आरोप ठोठवले होते. त्यावेळी त्यांच्या १५ दशलक्ष डॉलर्स बक्षिस जाहीर करण्यात आले होते.
मादुरो २०२३ पासून व्हेएनजुलामध्ये सत्तेत आहेत. अमेरिका, युरोपियन युनियन आणि लॅटिन अमेरिका देशांनी त्यांच्या निवडणूकीमध्ये धोकादडीचा आरोप केला आहे. या देशांनी मादुरो यांना कायदेशीर अध्यक्ष म्हणून मान्यता देण्यास नकार दिसा आहे. टीकाकारांच्या मते, मादुरोयांच्यामुळे व्हेनेझुलामध्ये सरकारी संस्था, सैन्य आणि न्यायव्यवस्थेवर विरोधकांना नियंत्रण कमकुवत झाले आहे.
Nicolás Maduro and his cronies think they’re untouchable. They’re wrong. We’re increasing our reward offer for Maduro to up to $50 million. https://t.co/mEomEgWLcT pic.twitter.com/ltq1cdMUji
— US Dept of State INL (@StateINL) August 8, 2025
त्यांच्या सत्तेत आल्यापासून अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये राजकीय मतभेदाचे वातावरण आहे. अमेरिकेने मादुरोवर व्हेनेझुएलामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध देखील लादले आहेत. यामुळे सध्या व्हेनेझुएलाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
व्हेनेझुएला हा १९५० च्या दशकात जगातील चौथा श्रीमंत देश होता. मात्र आज या देशाची परिस्थिती अत्यंत बिकट झाला आहे. या देशात ७५ टक्के लोकसंख्या गरिबीमध्ये जगत आहे. आतापर्यंत सुमारे ७.५ दशलक्ष लोक व्हेनेझुएलामधून स्थलांतर झाले आहेत. तसेच देशाची अर्थव्यवस्थाही घसलेली आहे.
Helicopter Crash : अमेरिकेत पुन्हा मोठी दुर्घटना ; मिसिसिपी नदीत कोसळले हेलिकॉप्टर