Helicopter Crash : अमेरिकेत पुन्हा मोठी दुर्घटना ; मिसिसिपी नदीत कोसळले हेलिकॉप्टर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Helicopter Crash News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) अपघातांचे सत्र अद्यापही सुरुच आहे. पुन्हा एकदा एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी (०७ ऑगस्ट) अमेरिकेच्या इलिनॉय राज्यात एक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. (Helicopter Crash) मिसिसिपी नदीत हे हेलिपॉप्टटर कोसळले. या अपघातामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर विजेच्या तारांना धडकल्याने हा अपघात झाला. यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने या घटनेची पुष्टी केली.
यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. इतर कोणाही यामध्ये जखमी झालेले किंवा मृत पावलेले नाही. गुरुवारी स्थानिक वेळेनुसार ११ च्या सुमारास ही घटना घडली. हेलिकॉप्टर विजेच्या तारांना धडकले आणि मिसिसिपी नदीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर खबरदारी म्हणून नदीतील व्यावसायिकांना थांबवण्यात आले.
Gaza News : गाझा शहरावर आता इस्रायलचा ताबा? नेतन्याहूंच्या प्रस्तावाला सुरक्षा मंत्रिमंडळाची मंजुरी
OMG! This 👇 Again! A Utility Helicopter Flying Along a Power Line that Stretches across the @msstate River Crashed onto a Barge. #missouristatefair, Killing two People and Catching on Fire, The Authorities said: https://t.co/tkDS0SCaFv #NYTimes #FoxNews @MSStateFair pic.twitter.com/gEOidaPxlp
— SANDRA KAYE SMITH (@SANDRA_KAYE_S) August 8, 2025
यापूर्वी देखील घडले अपघात
यापूर्वी मार्च २०२५ मध्येही एक दुर्दैवी अपघात घडला होता. एक वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर मिसिसिपी नदीत कोसळले होते. यामध्ये पायलटसह दोन जणांचा मृत्यू झाला होता. हे हेलिकॉप्टर युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकलचे होते. तसेच एप्रिलमध्ये देखील अमेरिकेच्या मॅनहॅटनमध्ये एक हेलिकॉप्टर अपघात घडला होता. हडसन नदीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने ३ लहान मुलांसह ६ जणांचा मृत्यू झाला होता.
तसेच अमेरिकेच्या उत्तर ॲरिझोनमध्ये एक वैद्यकीय विमानाचा अपघात झाला होता. विजेच्या तारेला धडकल्यानंतर विमानाला आग लागली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता. न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्कच्या सीएसआय एव्हिशनचे हे विमान होते. या विमानातून तीन वैद्यकीय कर्मचारी रुग्णाला घेऊन चालले होते. रुग्णासह सर्वांचा मृत्यू झाला होता.
गेल्या काही काळात अमेरिकेत विमान अपघाताच्या (US Plane Crash) आणि हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये प्रचं वाढ होत आहे. आतापर्यंत १० हून अधिक विमान अपघातांच्या घटना अमेरिकेत घडल्या आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अमेरिकेच्या विमान सुरक्षा आणि उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी केला संपर्क; ‘या’ मुद्यांवर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा