
US Mass Deportation in 2026
ट्रम्प यांनी प्रत्येक वर्षी १० लाख प्रवाशांना देशातून हद्दपार करण्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पासून ते आताप्यंत सुमारे ६ लाख २२ हजार लोकांना डिपोर्ट करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणेज यामध्ये गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या लोकांचाही सहभाग आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) विभाने आतापर्यंत अनेकांना अटक केली असून यातील ४४% लोक कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील नाहीत. यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.
ट्रम्प प्रशासनाने २०२६ साठी इमिग्रेशन क्रॅकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यासाठी एक मोठ्या खर्चाचे पॅकेजही ICE साठी मंजुर करण्यात आले आहे. २०२९ पर्यंत १७० अब्ज डॉलरपर्यंतचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून नवी डिर्टेशन सेंटर उभारण्यात येणार असून हे सेंटर अवैध प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या डिपोर्टेशनचे कार्य करणार आहे. यामुळे येत्या वर्षात अनेक वर्कप्लेसवर छापे पडण्याची शक्यता आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा नियमही कडक केले आहे. ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत इमिग्रेशन अंमलबजावणी अधिक कडक आणि मजबूत केली असल्याचे म्हटले आहे. यामुळे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द झाले आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका परदेशी विद्यार्थ्यांना बसला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रविभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ८५,००० व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. याच वेळी सर्व अर्जदारांच्या सोशल मीडिया अकाऊंट्स तपासणी देखील केली जात आहे. या नव्या नियमांमुळे, अर्जदारांची सोशल मीडिया व्हेरिफिकेशन आणि अधिक सखोल तपासणी केली जात आहे. ज्यामुळे अनेकांच्या व्हिसा अपॉइंटमेंट रद्द झाल्या आहेत.
ट्रम्प प्रशासनाचा मोठी कारवाई! तब्बल ८५,००० व्हिसा केले रद्द ; परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका