Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Midterms: अमेरिकेत राजकीय सत्तापालट! मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प पक्षाचा दारुण पराभव; इराण युद्ध ट्रम्प यांच्या अंगलट

US Midterms Elections Results: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला. इराण युद्ध आणि महागाईच्या जोरावर डेमोक्रॅट्सनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि काँग्रेसवर नियंत्रण मिळवले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 04, 2026 | 12:20 PM
US Midterm Elections 2026 Results Donald Trump Iran War Midterms

US Midterm Elections 2026 Results Donald Trump Iran War Midterms

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन काँग्रेसवर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व
  • इराण युद्ध आणि महागाई कारणीभूत
  • ट्रम्प यांच्या निर्णयांवर कायदेशीर वचक

अमेरिकेच्या राजकीय पटलावरून (US Midterms) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुप्रतिक्षित मध्यावधी निवडणुकीचे (US Midterm Elections 2026) निकाल समोर आले असून रिपब्लिकन पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. इराणमधील युद्ध, वाढती महागाई आणि परराष्ट्र धोरणांवरून जनतेमध्ये असलेल्या तीव्र असंतोषामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील – प्रतिनिधी सभागृह (House of Representatives) आणि सिनेट (Senate) – बहुमत गमवावे लागले आहे. या ऐतिहासिक निकालांमुळे विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने जबरदस्त पुनरागमन करत सत्ता मिळवली आहे.

 इराण युद्धाचा भडका आणि रिपब्लिकन पक्षाची पीछेहाट

या निवडणुकीतील सर्वात मोठा राजकीय आणि निर्णायक मुद्दा म्हणजे इराणसोबत सुरू असलेला लष्करी संघर्ष हा ठरला. ट्रम्प प्रशासनाने इराणमध्ये सत्तापालटाच्या उद्देशाने उगारलेल्या पावलांमुळे अमेरिकन सैन्य मोहिमेत गुंतले होते. या युद्धामुळे अमेरिकेतील महागाई भडकली असून लाखो नागरिकांमध्ये असंतोष पसरला. प्रत्यक्ष मतदानात जनतेने या धोरणांविरुद्ध कौल दिला. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रिपब्लिकन पक्षाच्या या पराभवाला इराण युद्ध आणि त्याबाबत निर्माण झालेली परिस्थिती अंशतः जबाबदार असल्याचे कबूल केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News : क्षणात होत्याचे नव्हते! नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; परदेशी नागरिकाचा मृत्यू; थरारक VIDEO VIRAL

ट्रम्प यांच्या अध्यक्षपदावर काय परिणाम होणार?

मध्यावधी निवडणुकीतील पराभवाचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प यांचे अध्यक्षपद तातडीने धोक्यात आले असा होत नाही. परंतु, अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आल्यामुळे ट्रम्प यांच्या एकतर्फी निर्णयांना आता मोठा अटकाव बसणार आहे. आता प्रशासनाला कोणताही मोठा कायदा, अर्थसंकल्प किंवा लष्करी विधेयक मंजूर करून घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या सहमतीवर आणि मंजुरीवर अवलंबून राहावे लागेल. ट्रम्प यांनी आधीच या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी ‘व्हिटो’ (Veto) अधिकाराचा वापर करण्याचे संकेत दिले आहेत.

🚨🇺🇸: 2026 US #midterm election results results till now #Democrats are winning one sided. Crushing Defeat for Trump… #Trump is going to attack #Iran tonight for sure.. https://t.co/lQfwjtqkAi — World_Breaking_News03 (@Breaking2003) November 4, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकन निवडणुकीत भारतीयांची विजयी हॅट्ट्रिक; पिया दांडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांचा जलवा

डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय आणि ट्रम्प यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड

या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने ऐतिहासिक आणि चकित करणारी कामगिरी नोंदवली आहे. रिपब्लिकन पक्षाचे पारंपारिक बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या अनेक राज्यांमध्येही डेमोक्रॅट्सनी विजय मिळवून राजकीय विश्लेषक आणि सर्वेक्षकांना अचंबित केले आहे. कॅन्ससमध्ये १९३२ नंतर पहिल्यांदाच डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटच्या जागेवर विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्याशिवाय, टेक्सास आणि दक्षिण कॅरोलिना सारख्या लाल (रिपब्लिकन) मानल्या जाणाऱ्या राज्यांमध्येही डेमोक्रॅट्सनी मोठे यश मिळवले. या अभूतपूर्व निकालांमुळे पुढील दोन वर्षांच्या कालावधीत ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र आणि अंतर्गत धोरणांवर संसदेची कडक नजर राहणार हे स्पष्ट झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२६ च्या अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत कोणाचा विजय झाला?

    Ans: २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने (Democratic Party) विजय मिळवत अमेरिकन काँग्रेसच्या (प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट) दोन्ही सभागृहांवर ताबा मिळवला आहे.

  • Que: रिपब्लिकन पक्षाच्या पराभवासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कशाला जबाबदार धरले?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यवर्ती निवडणुकीतील पराभवासाठी इराण युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला प्रमुख कारण मानले आहे.

  • Que: संसदेत बहुमत गमावल्यामुळे ट्रम्प प्रशासनावर काय परिणाम होईल?

    Ans: संसदेतील बहुमत गमावल्यामुळे ट्रम्प यांना आता नवीन कायदे, धोरणे आणि अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मंजुरीवर अवलंबून राहावे लागेल.

Web Title: Us midterms elections 2026 results democrats win congress trump iran war hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elections
  • World news

संबंधित बातम्या

Nepal News : क्षणात होत्याचे नव्हते! नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; परदेशी नागरिकाचा मृत्यू; थरारक VIDEO VIRAL
1

Nepal News : क्षणात होत्याचे नव्हते! नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; परदेशी नागरिकाचा मृत्यू; थरारक VIDEO VIRAL

US Midterms : अमेरिकन निवडणुकीत भारतीयांची विजयी हॅट्ट्रिक; पिया दांडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांचा जलवा
2

US Midterms : अमेरिकन निवडणुकीत भारतीयांची विजयी हॅट्ट्रिक; पिया दांडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांचा जलवा

US Midterm : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना मोठा झटका; डेमोक्रॅट्स सिनेट आणि हाऊसवर ताबा मिळवण्याच्या जवळ
3

US Midterm : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना मोठा झटका; डेमोक्रॅट्स सिनेट आणि हाऊसवर ताबा मिळवण्याच्या जवळ

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक
4

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.