US Midterms: अमेरिकन निवडणुकीत भारतीय वंशाचे वर्चस्व; पिया दांडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांच्या विजयाचा दणदणीत षटकार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिकेच्या राजकीय पटलावर (US Midterms) भारतीय वंशाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल समोर येत असून यामध्ये भारतीय-अमेरिकन उमेदवारांनी दमदार कामगिरी केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये जनतेने भारतीय नेत्यांवर पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवला आहे. या निवडणुकांमध्ये एकूण ११ प्रमुख भारतीय वंशाचे नेते नशीब आजमावत होते, त्यापैकी पिया दांडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांनी आपापल्या मतदारसंघांत दणदणीत विजय नोंदवला आहे.
अमेरिकेच्या राजकीय इतिहासात मध्यावधी निवडणुकांना अत्यंत महत्त्व असते. यावेळच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही प्रमुख पक्षांनी भारतीय वंशाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली होती. खासदार, गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर ते अगदी शहरांचे महापौर अशा विविध उच्च पदांसाठी हे नेते शर्यतीत उतरले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Smart Home Day 2026: घरातील विजेची बचत कशी करावी? ‘असा’ करा वापर स्मार्ट उपकरणांचा, ज्याने घर होईल सुरक्षित अन् स्मार्ट
डेमोक्रॅटिक पक्षाच्या धडाडीच्या उमेदवार पिया दांडिया यांनी फ्लोरिडामधून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाची (US House of Representatives) निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे माजी मरीन सैनिक केसी आस्कर यांचा पराभव केला. पिया यांना ५१.९ टक्के मते मिळाली. पिया दांडिया यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले असून, एका हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
व्हर्जिनिया मतदारसंघातून डेमोक्रॅटिक पक्षाचे सुहास सुब्रमण्यम यांनी विजय मिळवत आपली जागा कायम ठेवली आहे. सुब्रमण्यम हे अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेले पहिले भारतीय-अमेरिकन म्हणून आधीच ओळखले जातात. त्यांनी पूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. दुसरीकडे मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नर अरुणा मिलर यांनी रिपब्लिकन उमेदवार रॉब क्रोप यांचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. हैदराबादमध्ये जन्मलेल्या अरुणा मिलर या मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नरपद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला आहेत.
The 2026 US midterm elections are witnessing a growing presence of Indian-American candidates in American politics, with several securing victories in key congressional and state-level contests. Democrat Pia Dandiya won election to the US House of Representatives from Florida’s 22nd Congressional District, defeating Republican Casey Askar. Indian-American Democrat Suhas Subramanyam won re-election to the US House of Representatives from Virginia’s 10th Congressional District. In Maryland, Indian-American Lieutenant Governor Aruna Miller secured another term after NBC News projected the re-election of Democratic Governor Wes Moore. Details here 🔗https://t.co/W34iQXLljp Dive deeper into the story with the TOI App 👉 https://t.co/ogFaRsVinV #IndianAmericans #USMidtermElections #PiaDandiya #SuhasSubramanyam #ArunaMiller [Indian-American candidates, US midterm elections 2026, Pia Dandiya, Suhas Subramanyam, Aruna Miller, Florida 22nd district, Virginia 10th district, Maryland elections] — The Times Of India (@timesofindia) November 4, 2026
credit – social media and Twitter
या मध्यावधी निवडणुकीत अनेक अनुभवी आणि नव्या पिढीचे भारतीय नेते आमनेसामने आले होते. सिलिकॉन व्हॅलीच्या १७ व्या मतदारसंघातून रो खन्ना तर वॉशिंग्टनच्या ७ व्या मतदारसंघातून प्रमिला जयपाल निवडणूक लढवत आहेत. कॅलिफोर्नियाच्या तिसऱ्या मतदारसंघातून डॉ. अमी बेरा आणि ॲरिझोनाच्या पहिल्या मतदारसंघातून डॉ. अमिश शाह रिंगणात आहेत. टेक्सासमध्ये पूजा सेठी आणि संदीप श्रीवास्तव तर लॉस एंजेलिसच्या महापौरपदासाठी नित्या रमण आणि न्यूयॉर्कच्या ॲटर्नी जनरल पदासाठी सरिता कोमातिरेड्डी नशीब आजमावत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterm : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना मोठा झटका; डेमोक्रॅट्स सिनेट आणि हाऊसवर ताबा मिळवण्याच्या जवळ
या संपूर्ण निवडणुकीत सर्वात जास्त लक्ष ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन उमेदवार विवेक रामास्वामी यांच्याकडे लागले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः रामास्वामी यांच्यासाठी प्रचार केला होता. अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीनंतर ट्रम्प यांनी रामास्वामी यांची ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (DOGE) मध्ये नियुक्ती केली होती, परंतु ओहायोचे गव्हर्नर बनण्याच्या इच्छेने त्यांनी या निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
अमेरिकेच्या या मध्यावधी निवडणुकीतील निकाल हे स्पष्ट दर्शवतात की, अमेरिकन समाजात आणि धोरणनिर्मितीत भारतीय-अमेरिकन नागरिकांचा प्रभाव वेगाने वाढतो आहे. शिक्षण, कायदा, वैद्यकीय आणि व्यवसाय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर आता भारतीय वंशाची नवीन पिढी अमेरिकेच्या मुख्य प्रवाहातील राजकारणावर आपले प्रभुत्व निर्माण करत आहे. आगामी काळात हे नेते अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील यात शंका नाही.
Ans: या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या पिया दांडिया (फ्लोरिडा), सुहास सुब्रमण्यम (व्हर्जिनिया) आणि अरुणा मिलर (मेरीलँड) यांनी मोठा विजय मिळवला आहे.
Ans: पिया दांडिया यांनी फ्लोरिडामधून ५१.९ टक्के मते मिळवून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाची (US House of Representatives) निवडणूक जिंकली आहे.
Ans: रिपब्लिकन पक्षाचे विवेक रामास्वामी हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्याने ओहायो राज्याच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवत आहेत.






