
US military gets $1,776 bonus Trump makes many big announcements in his address to the nation
Trump $1,776 military bonus 2025 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि ‘अमेरिका फर्स्ट’ (America First) धोरणाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राइमटाइममध्ये देशाला संबोधित करताना ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्यासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी अशा काही घोषणा केल्या आहेत, ज्याची चर्चा आता जगभरात रंगली आहे. “आम्ही तुटलेली व्यवस्था दुरुस्त करत आहोत,” असे म्हणत त्यांनी मागील प्रशासनावर जोरदार तोफ डागली.
ट्रम्प यांच्या भाषणातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे अमेरिकन लष्करासाठी जाहीर केलेला बोनस. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे वर्ष असलेल्या १७७६ चा सन्मान म्हणून ट्रम्प यांनी प्रत्येक सैनिकाला $१,७७६ चा विशेष बोनस जाहीर केला आहे. याला त्यांनी ‘वॉरियर डिव्हिडंड’ (Warrior Dividend) असे नाव दिले आहे. ख्रिसमसच्या आधी सुमारे १४.५ लाख सैनिकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल. “आपल्या देशाच्या रक्षकांपेक्षा या बोनससाठी दुसरे कोणीही पात्र नाही,” अशा शब्दांत त्यांनी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी
अमेरिकेतील घरांच्या वाढत्या किमतींबद्दल बोलताना ट्रम्प यांनी थेट बेकायदेशीर स्थलांतरितांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मागील प्रशासनाने लाखो स्थलांतरितांना देशात आणले आणि करदात्यांच्या पैशातून त्यांना घरे दिली, ज्यामुळे सामान्य अमेरिकन माणसासाठी भाडे आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या.” नवीन वर्षात अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी ‘गृहनिर्माण सुधारणा’ (Housing Reform) योजना आणण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत, ज्यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अमेरिकनांना दिलासा मिळेल.
PRESIDENT TRUMP announces $1,776 bonuses for military service members: “Nobody deserves it more than our military.” pic.twitter.com/svyQ5cCd6E — Fox News (@FoxNews) December 18, 2025
credit : social media and Twitter
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात एक अत्यंत धाडसी दावा केला. ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच अमेरिकेतून ‘रिव्हर्स मायग्रेशन’ म्हणजेच उलट स्थलांतर सुरू झाले आहे. अनेक स्थलांतरित आता स्वतःहून आपल्या मायदेशी परतत आहेत. याचा थेट फायदा अमेरिकन नागरिकांना होत असून, निर्माण झालेल्या नवीन नोकऱ्यांपैकी १०० टक्के नोकऱ्या फक्त अमेरिकेत जन्मलेल्या नागरिकांनाच मिळाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. “अमेरिका आता आपल्या नागरिकांशी एकनिष्ठ आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी जगाला दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics : महासत्तेच्या अभेद्यकिल्याखाली केली जातेय गुपितांची पायाभरणी; व्हाईट हाऊसकडून मिळाले ‘हे’ 3 गूढ संकेत
भाषणाच्या शेवटी ट्रम्प यांनी एका नव्या अमेरिकेचे चित्र जगासमोर मांडले. ते म्हणाले की, जेव्हा जग पुढच्या वर्षी अमेरिकेकडे पाहेल, तेव्हा त्यांना असा देश दिसेल जो आपल्या कामगारांशी प्रामाणिक आहे आणि ज्याला आपल्या भविष्याबद्दल पूर्ण खात्री आहे. “अमेरिका आता संपूर्ण जगासाठी हेवा वाटण्याजोगा देश बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Ans: ट्रम्प यांनी प्रत्येक अमेरिकन सैनिकाला $१,७७६ चा 'वॉरियर डिव्हिडंड' बोनस जाहीर केला आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते 'बेकायदेशीर स्थलांतर' हे घरांच्या किमती वाढण्याचे आणि गृहनिर्माण संकटाचे मूळ कारण आहे.
Ans: ५० वर्षांत पहिल्यांदाच स्थलांतरित लोक स्वतःहून अमेरिका सोडून आपल्या मायदेशी परतत आहेत, याला ट्रम्प यांनी 'रिव्हर्स मायग्रेशन' म्हटले आहे.