Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Intervention : ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम; खळबळजनक अहवालामुळे ट्रम्पची काळी कृत्ये जगासमोर

US military interventions : अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण केले आणि मादुरोला अटक केली. त्यानंतर, एका अहवालात असे म्हटले गेले की अमेरिकेने गेल्या 35 वर्षांत 251 देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 05, 2026 | 01:59 PM
us military interventions iraq venezuela false claims shocks world 2026

us military interventions iraq venezuela false claims shocks world 2026

Follow Us
Follow Us:
  •  काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालानुसार, अमेरिकेने गेल्या ३५ वर्षांत २५१ देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केला असून १७९८ पासून हा आकडा ४६९ वर पोहोचला आहे.
  • इराक, लिबिया आणि सीरियासारख्या देशांमध्ये अमेरिकेने केलेले लष्करी हल्ले नंतर खोट्या गुप्तचर माहितीवर आणि पुराव्यांवर आधारित असल्याचे सिद्ध झाले आहे.
  •  नार्को-टेररिझमच्या आरोपाखाली व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर अमेरिकेच्या ‘ग्लोबल पोलिसिंग’ धोरणावर पुन्हा एकदा जागतिक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

US military interventions list 1798-2022 : जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेने गेल्या काही दशकांत ‘लोकशाही’ आणि ‘सुरक्षेच्या’ नावाखाली अनेक देशांचे नकाशे बदलले आहेत. नुकत्याच व्हेनेझुएलामध्ये करण्यात आलेल्या धडाकेबाज लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक केल्यानंतर, अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा हा अस्वस्थ करणारा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. ‘काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस’ (CRS) या सरकारी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, अमेरिकेने केवळ गेल्या ३५ वर्षांत तब्बल २५१ वेळा इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लष्करी बळाचा वापर केल्याचे समोर आले आहे.

इराक: जैविक शस्त्रांचा तो खोटा दावा

२००३ मध्ये अमेरिकेने इराकवर केलेला हल्ला हा इतिहासातील सर्वात वादग्रस्त हस्तक्षेप मानला जातो. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी दावा केला होता की, सद्दाम हुसेन यांच्याकडे ‘जैविक आणि रासायनिक शस्त्रे’ (WMDs) आहेत, जी जगासाठी धोकादायक आहेत. या नावाखाली इराकवर भीषण बॉम्बवर्षाव करण्यात आला आणि सद्दाम यांची सत्ता उलथवून लावली. मात्र, २००४ मध्ये अमेरिकेच्याच ‘इराक सर्वेक्षण गटा’ने कबूल केले की, तिथे कोणतीही सक्रिय जैविक शस्त्रे नव्हती. खोट्या आरोपांमुळे एका समृद्ध देशाचे रूपांतर युद्धभूमीत झाले.

लिबिया: नागरी संरक्षणाच्या नावाखाली गदाफींचा अंत

२०११ मध्ये ‘नाटो’ (NATO) च्या मदतीने अमेरिकेने लिबियामध्ये हस्तक्षेप केला. मुअम्मर गद्दाफी हे आपल्याच जनतेवर अत्याचार करत असल्याचा दावा करून अमेरिकेने तिथे लष्करी कारवाई केली. मात्र, २०१६ मध्ये ब्रिटीश संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले की, लिबियावरील हा हल्ला चुकीच्या आणि अपूर्ण गुप्तचर माहितीवर आधारित होता. आज लिबिया अस्थिरता आणि यादवी युद्धाच्या खाईत लोटला गेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार

TWO PICTURES… SAME LIE 20 YEARS LATER! In Iraq, It Was All About The Lies of Weapons of Mass Destruction! Till Today, Iraq has Been Ravaged and No Weapons of Mass Destruction but They Are Stealing Iraqi Oil and The People are Poorer With Al Qaeda and ISIS Dominating. Today… pic.twitter.com/gstOTerpjl — Retson Tedheke (Sarkin Yakin Ga’ate) (@RetsonTedheke01) January 3, 2026

credit : social media and Twitter

सीरिया आणि अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास

सीरियामध्ये रासायनिक हल्ल्यांचा आरोप करून अमेरिकेने अनेकवेळा क्षेपणास्त्र हल्ले केले. २०२४ मध्ये अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे बशर अल-असद यांना सत्ता सोडावी लागली, परंतु तिथे शांतता प्रस्थापित होण्याऐवजी दहशतवादी गटांचा प्रभाव वाढला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानात अल-कायदाचा नायनाट करण्यासाठी गेलेल्या अमेरिकन सैन्याला २० वर्षांनंतर रिकाम्या हाती परतावे लागले आणि आजही तिथे तालिबानचीच सत्ता आहे. अमेरिकेच्या २० वर्षांच्या रणनीतीचे हे सर्वात मोठे अपयश मानले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर

व्हेनेझुएला: नवी रणनीती की जुनाच पॅटर्न?

३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेली कारवाई ही या साखळीतील नवी कडी आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा (Drug Trafficking) आरोप लावून मादुरो यांना अमेरिकेत नेण्यात आले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, व्हेनेझुएलातील अफाट तेल साठ्यावर नियंत्रण मिळवणे हा यामागील मुख्य उद्देश असू शकतो. ट्रम्प यांनी उघडपणे म्हटले आहे की, “आम्ही आता व्हेनेझुएला चालवू आणि तिथल्या तेल पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून नफा कमवू.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने गेल्या ३५ वर्षांत किती वेळा लष्करी हस्तक्षेप केला आहे?

    Ans: अधिकृत अहवालानुसार, १९९१ ते २०२२ दरम्यान अमेरिकेने २५१ वेळा इतर देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केले आहेत.

  • Que: इराक युद्धाचे मुख्य कारण काय सांगितले गेले होते आणि ते खरे ठरले का?

    Ans: इराककडे जैविक आणि रासायनिक शस्त्रे असल्याचा दावा अमेरिकेने केला होता, परंतु नंतर तिथे असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

  • Que: काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (CRS) म्हणजे काय?

    Ans: ही अमेरिकेची एक सरकारी संशोधन संस्था आहे, जी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना धोरणात्मक निर्णयांसाठी माहिती आणि अहवाल पुरवते.

Web Title: Us military interventions iraq venezuela false claims shocks world 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Nicholas Maduro

संबंधित बातम्या

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
1

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
2

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
4

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.