Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drug Cartels : ट्रम्पचा ‘किलर’ प्लॅन! पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांच्या संशयित बोटीवर हल्ला; 2 जण ठार, एकाचा शोध सुरू

US Military Strike : पूर्व पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका संशयित बोटीवर अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या छाप्यात दोन जण ठार झाले आणि मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 09, 2026 | 02:11 PM
us military strike drug smuggling boat pacific ocean video-2026

us military strike drug smuggling boat pacific ocean video-2026

Follow Us
Follow Us:
  • समुद्रात लष्करी थरार
  • ट्रम्प प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’
  • भीषण स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल

US Military Strike Pacific Ocean 2026 : जागतिक सुरक्षा आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमेरिकेने (America) आतापर्यंतची सर्वात आक्रमक भूमिका घेतली आहे. पूर्व पॅसिफिक महासागराच्या निळ्याशार पाण्यावर नुकताच एक थरारक लष्करी सामना पाहायला मिळाला. अमेरिकन लष्कराने एका संशयित ड्रग्ज बोटीला लक्ष्य करत आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला. या भीषण कारवाईत दोन तस्करांचा जागीच मृत्यू झाला असून, एका बेपत्ता व्यक्तीसाठी समुद्रात शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच स्फोट!

अमेरिकेच्या ‘सदर्न कमांड’ने (US Southern Command) या संपूर्ण कारवाईचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, संशयित बोट समुद्रातून वेगाने जात असताना अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यामुळे त्या बोटीचा अक्षरशः गोळा होतो. एका प्रचंड स्फोटानंतर आगीच्या ज्वाला आकाशात उंच उठतात आणि काही क्षणातच ती बोट समुद्राच्या तळाला जाते. या घटनेने हे स्पष्ट केले आहे की, आता अमेरिका केवळ गस्त घालणार नाही, तर थेट प्रहार करणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Space Mystery: पेंटागॉनचा ‘पँडोरा बॉक्स’! Aliens आणि UFO फाईल्समधील ‘त्या’ 161 कागदपत्रांनी जग हादरले; काय आहे चंद्रावरील रहस्य?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची नवी दहशतवादविरोधी रणनीती

ही कारवाई केवळ योगायोग नसून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेल्या एका मोठ्या रणनीतीचा भाग आहे. ट्रम्प यांनी नुकतीच एका नवीन दहशतवादविरोधी आणि अमली पदार्थ विरोधी करारावर स्वाक्षरी केली आहे. या रणनीतीचे मुख्य उद्दिष्ट ‘वेस्टर्न हेमिस्फिअर’ (पश्चिमि गोलार्ध) मधील धोकादायक ड्रग्ज कार्टेल्सना पूर्णपणे नष्ट करणे हे आहे. ट्रम्प प्रशासनाने अमली पदार्थांच्या तस्करीला ‘राष्ट्रीय सुरक्षा धोका’ घोषित केले असून, यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यास हिरवा कंदील दिला आहे. सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या अशा विविध कारवायांमध्ये आतापर्यंत किमान १९३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

The U.S. military’s latest strike on an alleged drug-trafficking boat in the eastern Pacific Ocean killed two men Friday while leaving one survivor. https://t.co/6ksACpvWOc — CBS News (@CBSNews) May 9, 2026

credit – social media and Twitter

पुराव्यांचा अभाव आणि वाढता आंतरराष्ट्रीय दबाव

एकीकडे अमेरिकेची ही कारवाई यशस्वी मानली जात असली, तरी दुसरीकडे काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. लष्कराने आतापर्यंत या बोटींवर नेमके कोणते आणि किती अमली पदार्थ होते, याचे ठोस पुरावे सार्वजनिक केलेले नाहीत. असे असूनही, ट्रम्प प्रशासन लॅटिन अमेरिकेतील देशांच्या नेत्यांवर सातत्याने दबाव आणत आहे. या आंतरराष्ट्रीय टोळ्या संपूर्ण जगासाठी कर्करोग बनल्या असून, त्यांना संपवण्यासाठी सर्व देशांनी अमेरिकेच्या लष्करी मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Crimes: ज्याच्या नावाने सीरिया थरथरायचा, ‘त्या’ जनरलला नव्या सरकारने फरफटत नेले; अंगावर काटा आणणारा गुन्ह्यांचा पाढा

रेस्क्यू ऑपरेशन आणि पुढील पावले

हल्ल्यानंतर बोटीवरील एक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारल्याचे समजते. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी अमेरिकन तटरक्षक दल (US Coast Guard) आणि नौदलाची विमाने तैनात करण्यात आली आहेत. लॅटिन अमेरिकेच्या सागरी हद्दीत सुरू असलेली ही लष्करी मोहीम आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या एका कारवाईमुळे जागतिक ड्रग्ज बाजारात मोठी खळबळ उडाली असून, तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने हा लष्करी हल्ला कोठे केला?

    Ans: हा हल्ला पूर्व पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या संशयित बोटीवर करण्यात आला.

  • Que: या कारवाईत किती लोक ठार झाले?

    Ans: या भीषण लष्करी कारवाईत २ जण ठार झाले असून १ जण बेपत्ता आहे.

  • Que: ट्रम्प प्रशासनाची नवीन रणनीती काय आहे?

    Ans: ड्रग्ज कार्टेल्सना दहशतवादी संघटना मानून त्यांना लष्करी बळाने पूर्णपणे नष्ट करणे, हे ट्रम्प प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: Us military strike drug smuggling boat pacific ocean video 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • America
  • America news
  • Donald Trump

संबंधित बातम्या

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
1

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
4

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.