अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने परग्रहवासीयांविषयीचे मौन पहिल्यांदाच सोडले; UFO फाईल्समध्ये काय आढळले? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Pentagon UFO Files 2026 : मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा आणि रहस्याचा विषय राहिलेल्या ‘परग्रहवासी’ (Aliens) आणि ‘अज्ञात उडणाऱ्या वस्तू’ (UFO) बाबत अमेरिकेने (America) आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, म्हणजेच ‘पेंटागॉन’ने (Pentagon) अनेक दशकांपासून दडवून ठेवलेली रहस्ये उघड केली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष सूचनेनंतर, प्रशासनाने १६१ अत्यंत गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. या खुलाशाने केवळ शास्त्रज्ञांमध्येच नव्हे, तर सामान्य लोकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सर्वात धक्कादायक माहिती १९६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध ‘अपोलो’ चंद्रा मोहिमांशी संबंधित आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारे दुसरे मानव, बझ आल्ड्रिन (Buzz Aldrin) यांनी १९६९ मध्ये त्यांच्या प्रवासादरम्यान एक अत्यंत तेजस्वी आणि अनाकलनीय प्रकाश पाहिल्याची नोंद केली होती. त्यांच्या मते, अवकाशात एखादी गोष्ट सतत त्यांच्या यानाचा पाठलाग करत होती. तसेच, अपोलो १२ चे अंतराळवीर ॲलन बीन यांनीही चंद्राच्या पृष्ठभागावर चमकणारे कण आणि विचित्र दिवे पाहिल्याचा दावा केला होता. या फाईल्समध्ये अंतराळवीरांचे हे दावे जसेच्या तसे देण्यात आले आहेत, जे एलियन्सच्या अस्तित्वाकडे मोठे संकेत देतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran Conflict: अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं जहाज उद्ध्वस्त; इराणनेही डागली क्षेपणास्त्रे, थरारक VIDEO VIRAL
केवळ अपोलोच नाही, तर १९६५ च्या ‘जेमिनी ७’ (Gemini 7) मोहिमेतील धक्कादायक ऑडिओ रेकॉर्डिंगही आता समोर आले आहे. अंतराळवीर फ्रँक बोरमन यांनी मिशन कंट्रोलला माहिती दिली होती की, त्यांच्या यानाजवळ एक अज्ञात वस्तू घिरट्या घालत आहे आणि तिथे लाखो चमकणारे कण दिसत आहेत. १९७२ मधील अपोलो १७ च्या अंतराळवीरांनी तर अंतराळात चक्क ‘फटाक्यांच्या आतषबाजी’सारखा प्रकाश पाहिला होता. जरी काही शास्त्रज्ञांनी याला बर्फाच्या स्फटिकांचे परावर्तन म्हटले असले, तरी पेंटागॉनच्या या फाईल्समध्ये या घटनांना ‘अज्ञात’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
TRUMP JUST PUSHED THE BIGGEST UFO DISCLOSURE IN US HISTORY 👽🛸 • Early 2025
Trump starts openly talking about UFOs/UAPs again. Promises more transparency than previous administrations. • Feb 19, 2026
Trump officially orders the Pentagon + other agencies to begin releasing… pic.twitter.com/yVBv2ULHHl — vm 🌹🍵 (@roschamomile) May 8, 2026
credit – social media and Twitter
या नवीन खुलाशात केवळ जुन्याच नाही, तर अलीकडील काळातील पुराव्यांचाही समावेश आहे. इराक, सीरिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये अमेरिकन सैन्याने रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये एक अंडाकृती वस्तू प्रचंड वेगाने उडताना दिसत आहे, जी मानवी तंत्रज्ञानाच्या पलीकडली वाटते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, “जनतेला सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर काहीतरी मोठे घडत असेल, तर ते लपवून ठेवण्यात अर्थ नाही.” ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेत पारदर्शकतेच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Crimes: ज्याच्या नावाने सीरिया थरथरायचा, ‘त्या’ जनरलला नव्या सरकारने फरफटत नेले; अंगावर काटा आणणारा गुन्ह्यांचा पाढा
पेंटागॉनच्या या पावलामुळे अमेरिकन राजकारणातही दोन गट पडले आहेत. रिपब्लिकन नेत्यांनी याला ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे, तर विरोधकांनी याला लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून विचलित करण्याचा प्रयत्न म्हटले आहे. मात्र, संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ही केवळ सुरुवात आहे. १६१ फाईल्स हा केवळ एका मोठ्या हिमनगाचे टोक (Tip of the iceberg) असून, येणाऱ्या काळात एलियन्सच्या संपर्काचे अधिक ठोस पुरावे जगासमोर येऊ शकतात. तूर्तास, या कागदपत्रांनी हे सिद्ध केले आहे की, आपण ज्याला केवळ कल्पना समजत होतो, त्यामागे काहीतरी ठोस वास्तव दडलेले असू शकते.
Ans: अमेरिकेच्या पेंटागॉनने सध्या १६१ अत्यंत गोपनीय (Classified) फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत.
Ans: बझ आल्ड्रिन यांनी १९६९ मध्ये त्यांच्या चंद्र मोहिमेदरम्यान एक रहस्यमय तेजस्वी प्रकाश आणि एक अज्ञात वस्तू पाहिल्याचा दावा केला होता.
Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला पारदर्शकता आणण्याचे आदेश दिल्यानंतर हे दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले.






