War Crimes : सीरियात रासायनिक हल्ल्यात 1,400 निष्पापांचा बळी घेणारा तो 'क्रूर' जनरल अटकेत; अंगावर काटा आणणारा गुन्ह्यांचा पाढा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
General Khardal Ahmad Dayoub arrested : सीरियाच्या (Syria) रक्तरंजित इतिहासातील सर्वात भीषण प्रकरणाचा निकाल लागण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. ज्या घटनेने संपूर्ण जगाचा काळजाचा ठोका चुकवला होता, त्या २०१३ च्या रासायनिक हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि बशर अल-असद यांचा अत्यंत विश्वासू मानला जाणारा माजी जनरल खर्दाल अहमद दायुब याला अखेर अटक करण्यात आली आहे. सीरियाच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली असून, या अटकेमुळे असद राजवटीत झालेल्या अमानवीय अत्याचारांचा पाढा पुन्हा एकदा वाचला जात आहे.
२१ ऑगस्ट २०१३ ची ती रात्र सीरियाच्या इतिहासात कधीही न पुसली जाणारी काळी रात्र ठरली. दमास्कसच्या बाहेरील पूर्व घौता या बंडखोरांच्या ताब्यातील भागावर ‘सरीन’ गॅसने भरलेल्या रॉकेट्सचा वर्षाव करण्यात आला होता. या हल्ल्यात कोणताही आवाज झाला नाही किंवा कोणतीही इमारत पडली नाही, परंतु काही मिनिटांतच १,४०० हून अधिक लोकांनी जीव सोडला. यामध्ये ४०० पेक्षा जास्त लहान मुले होती. लोक झोपेत असतानाच त्यांच्या फुफ्फुसात विषारी वायू शिरला आणि तडफडून त्यांचा अंत झाला. ज्या जनरलला आता अटक करण्यात आली आहे, त्यानेच या संपूर्ण ऑपरेशनचे आणि रासायनिक शस्त्रांच्या पुरवठ्याचे पर्यवेक्षण केल्याचा आरोप आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran Conflict: अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं जहाज उद्ध्वस्त; इराणनेही डागली क्षेपणास्त्रे, थरारक VIDEO VIRAL
खर्दाल अहमद दायुब हा केवळ एक लष्करी अधिकारी नव्हता, तर असद यांच्या दडपशाही यंत्रणेचा एक महत्त्वाचा कणा होता. त्याच्यावर केवळ रासायनिक हल्ल्याचाच नाही, तर अनेक ‘न्यायबाह्य’ हत्या आणि छळछावण्या चालवल्याचेही आरोप आहेत. त्याने इराण आणि हिजबुल्लाह यांसारख्या शक्तींशी हातमिळवणी करून सीरियन नागरिकांच्या विरोधात मोठे कट रचले होते. गृह मंत्रालयाच्या दाव्यानुसार, दायुबने पूर्व घौतामधील बॉम्बहल्ल्यासाठी रसद पुरवली आणि त्या भागातील नागरिकांना अन्नापासून वंचित ठेवण्यासाठी नाकेबंदी केली होती.
🇸🇾 SYRIA ARRESTS ASSAD-ERA GENERAL OVER 2013 CHEMICAL ATTACK Syria says it arrested former brigadier general Khardal Ahmed Dayoub for his alleged role in the 2013 chemical attack on Eastern Ghouta near Damascus that killed more than 1,400 civilians, according to US intelligence… pic.twitter.com/kO1xblyn3s — Mossad Commentary (@MOSSADil) May 8, 2026
credit – social media and Twitter
त्यावेळी समोर आलेले व्हिडिओ आजही अंगावर काटा आणतात. जमिनीवर रांगेत ठेवलेले पांढऱ्या कपड्यातील मृतदेह, तोंडातून फेस येत असलेली आणि श्वास घेण्यासाठी धडपडणारी निष्पाप मुले आणि आपल्या मुलांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडणारे आई-वडील… हे दृश्य पाहून संयुक्त राष्ट्रांनीही (UN) याला २१ व्या शतकातील सर्वात मोठा गुन्हा म्हटले होते. सुरुवातीला असद सरकारने हा हल्ला आम्ही केला नसल्याचा दावा केला होता, परंतु आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्यांना आपला रासायनिक शस्त्रसाठा ‘OPCW’ कडे सुपूर्द करावा लागला होता.
#Syria’s interior ministry says it arrested Khardal Ahmed Dayoub, a former brigadier general in the forces of the ousted regime and former head of the Air Force Intelligence branch in #Daraa, for his direct involvement in systematic violations against #civilians… — Arab News (@arabnews) May 8, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US war: ‘शांततेची चर्चा केवळ षडयंत्र!’ इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा ट्रम्पवर सडकून वार; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका
एक दशकाहून अधिक काळ सीरियावर हुकूमशाही गाजवल्यानंतर, २०१४ मध्ये बशर अल-असद यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी असद यांना मॉस्कोमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यांच्या पलायनानंतर सीरियामध्ये स्थापन झालेल्या नवीन सरकारने जुन्या काळातील सर्व गुन्हेगारांना शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. पाच लाखांहून अधिक बळी घेणाऱ्या या गृहयुद्धातील पीडितांना आता कुठेतरी न्यायाची आशा वाटू लागली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते, दायुबची अटक ही केवळ सुरुवात आहे; अजून अनेक ‘युद्ध गुन्हेगार’ गजाआड जाणे बाकी आहे.
Ans: २१ ऑगस्ट २०१३ रोजी दमास्कसच्या पूर्व घौता भागात सरीन गॅसचा वापर करून हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये १,४०० हून अधिक नागरिक मारले गेले होते.
Ans: तो बशर अल-असद यांच्या राजवटीतील एक कुख्यात माजी जनरल असून, त्याच्यावर रासायनिक हल्ल्याचे पर्यवेक्षण आणि युद्ध गुन्हे केल्याचा आरोप आहे.
Ans: २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर बशर अल-असद हे रशियाची राजधानी मॉस्को येथे आश्रयाला गेले आहेत.






