US Passport drops out of World's Most Powerful Passport 2025
World’s Most Powerful Passport 2025 : जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टची यादी जाहीर झाली आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्सने ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमेरिकेला (America) मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या पासपोर्टची ताकद कमी झाली आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार, अमेरिका २० वर्षात पहिल्यांदाच जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या टॉप -१० यादीतून बाहेर पडला आहे.
अमेरिकेच्या पासपोर्टची रॅंकिंग घसरुन १२ वर आली आहे. आता अमेरिकन नागरिकांना जगभरातील २२७ देशांपैकी केवळ १८० देशांमध्ये विना व्हिसा प्रवेश मिळतो.
मलेशियाचा पासपोर्ट देखील १२ व्या स्थानावर आहे. दुसरीकडे सिंगापूरचा पासपोर्ट मात्र आजही जगभरातील सर्वात शक्तीशाली ठरला आहे. सिंगापूरच्या पासपोर्टला १९३ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो. यानंतर दक्षिण कोरिया च्या नागरिकांना १९० देशांमध्ये व्हिसा-फ्री आणि जपानच्या पासपोर्टला १८९ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो.
हेनली पासपोर्ट इंडेक्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, भारताच्या पासपोर्टची ताकद वाढली आहे. भारताचा पासपोर्ट ७७ व्या क्रमांकावर आहे. आता भारतीय पासपोर्टधारकांना ५९ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल या सुविधा मिळतात. २०२५ पासून भारताची ताकद वाढली आहे. भारताचा आर्थिक विकास आणि डिजिटल क्षेत्रातील प्रभावबी वाढत आहे.
भारताने आतापर्यंत फिलिपिन्स, श्रीलंका, मलेशिया, थायलंड या देशांसोबत पासपोर्ट करार केले आहे. यामुळे या देशांनी भारतीय नागरिकांसाठी व्हिसा नियमांत सोपे बदल केले आहेत.
भारतानंतर पापुआ न्यू गिनी, म्यानमार, सोमालिया आणि व्हिएतनाम या देशांनी स्थान पटकावले आहे. ब्राझिलने अमेरिकन नागरिकांना व्हिसा-फ्री प्रवेश रद्द केला आहे.
चीनने देखील यामध्ये अमेरिकेला मान दिलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे आता चीनच्या पासपोर्टला ३७ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळत आहे. चीनचा पासपोर्टचीही ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.
याशिवाय ब्रिटनच्या पासपोर्टची ताकदही कमी होताना दिसत आहे. यापूर्वी ब्रिटनचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर होता, जो आता आठव्या स्थानावर पोहोचला आहे. हा केवळ रॅंकिंगचा प्रश्न नसून जगातिश शक्ती संतुलनात बदलाचे मोठे प्रतीक आहे. अमेरिकेचा जागतिक स्तरावरचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.
प्रश्न १. जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या यादीत अमेरिका कितव्या स्थानावर आहे?
हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या यादीनुसार, जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टमध्ये अमेरिका १२ व्या स्थानावर आहे.
प्रश्न २. भारताने जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या यादीत कितवे स्थान पटकावले?
भारताने जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या यादीत 77 वे स्थान पटकावले आहे.
प्रश्न ३. भारताला किती देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो?
भारताला ५९ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो.
प्रश्न ४. जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्ट कोणते?
हेनली पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपानचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली आहे.