America Delta aircraft catches fire at Orlando airport, passengers evacuated using emergency slides
वॉशिंग्टन: अमेरिकेत विमान दुर्घटनांची मालिका अद्याप सुरुच आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या ऑर्लॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला अचानक आग लागली. परंतु घटनेची माहिती वेळेवर मिळाली. यामुळे विमानातील 282 प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन स्लाईड्सचा वापर करुन बचाव पथकाने प्रवाशांना विमनातून तातडीने बाहेर काढले.
मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी (21 एप्रिल) ऑर्लॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. सध्या या घटनेची चौकशी सुरु असल्याचे एफएएने सांगितले आहे. एफएएने दिलेल्या माहितीनुसार, अटलांटाला जाणारे विमान धावपट्टीवर उड्डाण घेत होते. यादरम्यान विमानाच्या एका इंजिनला आग लागली.
मीडिया रिपोर्टनुसार, विमानात एकूण 282 प्रवासी होते. सुदौवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने प्रवाशांना आपात्कलीन स्लाईड्सने बाहेर काढले. विमानाच्या दोन इंजिनपैकी एका इंडिनच्या टेलपाइपमध्ये आग लागली. याची माहिती मिळताच डेल्टा एअलाइन्सच्या क्र मेंमबर्सने प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
डेल्टा एअरलाईन्सच्या क्रू मेमंबर्स सांगितले की, प्रवाशांच्या सहकार्याने सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. एका क्रू मेंबरने म्हटले की, “आम्ही प्रवाशांच्या सहकार्याचे कौतुक करतो आणि या अनुभवाबद्दल दिलगीर व्यक्त करतो.” तसेच डेल्टा एअरलाईन्सने म्हटले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा महत्वाचे काही नाही. आमची टीम प्रवाशांना त्यांना जायच्या असलेल्या ठिकाणी शक्य तितक्या लवतर पोहोचवेल.
जानेवारीपासून अमेरिकेत विमान अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत पाच पेक्षा अधिक विमान अपघातांच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. अमेरिकेच्या एरिझोन राज्यात दोन लाहन विमानंचा अपघात झाला. ही दोन लहान विमान एकमेकांना हवेतच धडकली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर एक डेल्टा एअपलाईन्सचे विमानाचा देखील टोरोंटो विमानतळावर लॅंडिगदरम्यान अपघात झाला होता. सुदैवाने यातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप बचावले. याशिवाय, अलास्कामध्येही एक विमान अपघात झाला होता. यापूर्वी वॉशिंग्टन डीसीच्या अमेरिकन एअरलाइन्सट्या प्रवासी विमानाला अमेरिक सैन्याच्या विमान अपघातात 67 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. तसेच पेनसिल्व्हेनियात देखील एक विमान अपघाताची घटना नोंदवण्यात आली होती.
गेल्या काही महिन्यांत वारंवार विमान अपघात झाल्यामुळे अमेरिकेतील विमान उद्योग आणि सुरक्षा यंत्रणा चिंतेत आहेत. या घटनांमुळे विमान सुरक्षा नियम अधिक कठोर करण्यावर भर दिला जात आहे. उत्तर अमेरिका आणि जागतिक पातळीवर हवाई वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चर्चा वाढल्या आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी अधिक काटेकोर उपाययोजना करण्यात येत आहेत