Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO

US Plane Crash : अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर ॲमेझॉनचे बोइंग ७६७ मालवाहू विमान धावपट्टीवरून पुढे गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲमेझॉनचे एक मालवाहू विमान कोसळले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान धावपट्टी ओलांडून पुढे गेले आणि कोसळले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 07, 2026 | 02:22 PM
Miami Plane Crash Amazon Cargo Jet Crash Boeing 767 Runway Overrun

Miami Plane Crash Amazon Cargo Jet Crash Boeing 767 Runway Overrun

Follow Us
Follow Us:
  • फ्लोरिडा येथील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲमेझॉनचे बोइंग ७६७ मालवाहू विमान उतरताना धावपट्टीवरून घसरून भीषण अपघात झाला.
  • अपघातात विमामाने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्याने ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
  • घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली; बचावकार्यासाठी २०० हून अधिक अग्निशमन दलाचे जवान आणि ६० पथके घटनास्थळी दाखल झाली.

अमेरिकेतील (US Plane Crash) फ्लोरिडा राज्यातील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी एका भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ॲमेझॉन प्राईम एअरसाठी (Amazon Prime Air) उड्डाण करणारे एक बोइंग ७६७-३०० मालवाहू विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक धावपट्टी ओलांडून पुढे गेले आणि विमानतळाबाहेरील रस्त्यावर असलेल्या वाहनांना धडकत कोसळले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये, अपघातानंतर विमानाला भीषण आग लागल्याचे आणि आकाशात धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत होते. विमान धावपट्टीवरून पुढे गेल्यावर विमानतळाच्या आसपासच्या गोदामांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या अंगावर धावून गेले, ज्यामुळे हा अपघात अधिक भीषण बनला.

अपघात कसा आणि कुठे घडला?

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) कडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर फ्लाइट ७५९८ (21 Air Flight 7598) हे विमान पोर्तो रिकोच्या सान जुआन येथील लुइस मुनोज मारिन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करून मियामीला आले होते. रविवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे १:५८ ते २:०० वाजताच्या सुमारास हे विमान मियामी विमानतळावर लँडिंग करत होते. विमानतळाच्या ३० क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरत असताना विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टी ओलांडून पुढे गेले. विमानाने विमानतळाच्या सीमाभिंतीजवळ उभ्या असलेल्या अनेक लहान-मोठ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत काही वाहनांचा पार चुराडा झाला असून विमान एका रस्त्यालगत असलेल्या दोन मोठ्या ट्रकजवळ जाऊन थांबले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Map: नव्या जागतिक नकाशावरून भारत-पाकिस्तान वाद पेटला; जम्मू-काश्मीरबाबत भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाक संतप्त

आपत्कालीन बचावकार्य आणि अग्निशमन दलाची धाव

मियामी-डेड काउंटीच्या शेरीफ रोझी कॉर्डेरो-स्टुट्झ यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची बातमी मिळताच आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. मियामी-डेड फायर रेस्क्यू डिपार्टमेंटने ६० हून अधिक बचाव पथके आणि सुमारे २०० अग्निशमन जवानांना घटनास्थळी तैनात केले. अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी सांगितले की, विमानाच्या इंजिनला भीषण आग लागली होती आणि विमानातून मोठ्या प्रमाणावर इंधन गळती (Fuel Leak) होत होती. जवानांनी विशेष फोमचा (Foam) वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. विमानाचे पायलट आणि सह-पायलट कॉकपिटमध्ये अडकले होते, तर काही नागरिक धडक बसलेल्या गाड्यांमध्ये अडकले होते. बचाव पथकाने वाहनांखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जखमी झालेल्या ५ जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मियामी-डेड काउंटीच्या महापौर डॅनिएला लेविन कावा यांनी स्पष्ट केले.

विमान वाहतुकीवर मोठा परिणाम

या भीषण अपघातानंतर मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व धावपट्ट्या आणि टॅक्सीवे तात्काळ बंद करण्यात आले. यामुळे विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांचे प्रचंड वेळापत्रक कोलमडले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, १६० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली, तर ३२५ हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. मियामीकडे येणारी अनेक उड्डाणे २०० मैल दूर असलेल्या ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आली.

अपघाताच्या चौकशीचे आदेश आणि वातावरणाचा अंदाज

या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी अमेरिकेची नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) यांनी संयुक्त चौकशी सुरू केली आहे. NTSB च्या अध्यक्षा जेनिफर हॉमेंडी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक मियामीमध्ये तपासासाठी दाखल झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, अपघाताच्या वेळी मियामी परिसरात तीव्र वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू होता. वाऱ्याचा वेग ताशी ३० मैलांपर्यंत होता. खराब हवामानामुळे विमानाचे लँडिंग चुकले की विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास आता ब्लॅक बॉक्स (Black Box) आणि फ्लाइट डेटाद्वारे केला जात आहे. ॲमेझॉनच्या प्रवक्त्या केली नँटेल यांनी कंपनीच्या वतीने शोक व्यक्त करताना सांगितले की, “उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. आम्ही स्थानिक प्रशासनाला तपासात संपूर्ण सहकार्य करत आहोत आणि बाधितांच्या मदतीसाठी तत्पर आहोत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू

कॅलिफोर्नियातही विमान अपघात: दोन मुलांचा मृत्यू

दरम्यान, मियामीतील या मोठ्या अपघाताच्या अवघ्या २४ तास आधी कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो येथेही एक दुर्दैवी विमान अपघात घडला. शनिवारी सकाळी फ्रेस्नो येथे एक इंजिन असलेले छोटे विमान सॅन जोक्विन नदीकाठच्या डोंगराळ भागात कोसळले. या अपघातात विमानात असलेल्या चार जणांपैकी दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रौढ गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटनांमुळे अमेरिकेतील विमान वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title: Us plane crash miami amazon cargo plane crash boeing 767 runway overrun 5 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • America
  • US Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट
1

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट

World Map: नव्या जागतिक नकाशावरून भारत-पाकिस्तान वाद पेटला; जम्मू-काश्मीरबाबत भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाक संतप्त
2

World Map: नव्या जागतिक नकाशावरून भारत-पाकिस्तान वाद पेटला; जम्मू-काश्मीरबाबत भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाक संतप्त

Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू
3

Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO
4

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.