Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

US Senate Resolution : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहानंतर आता वरिष्ठ सभागृहातही इराण युद्धविरोधी ठराव मंजूर करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या पक्षातील लोकांनी देखील इराण युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 01:21 PM
US Senate approves Iran war powers resolution

US Senate approves Iran war powers resolution

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले?
  • सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
  • इराणला पुन्हा ट्रम्प यांची धमकी
US Senate Resolution : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या संसदेच्या वरच्या सभागृहात इराणविरुद्धच्या युद्धाविरोधात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ५०-४८ मतांनी हा ठारव मंजूर झाला असून यामध्ये ट्रम्प यांना  इराणविरोधी सैन्य कारवाई रोखण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या कनिष्ठ  सभागृहातहही हा ठराव मंजूर करण्यात आला होता. यामुळे सध्या अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Nirav Modi Verdict : फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन कोर्टाचा दणका; कर्जप्रकरणी १०० कोटींची थकबाकी भरण्याचा आदेश

अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्राध्यक्षांच्या इराणविरोधी लष्करी कारवाईला थांबवण्याची मागणी केली आहे. या युद्धविरोधी प्रस्ताला अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात २१५ पैकी २०८ मते मिळाली होती. ज्यामध्ये चार रिपब्लिकन खासरादारांनीही ठरावाच्या बाजूने डेमोक्रॅटिक पक्षाला साथ दिली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या पक्षातच इराण युद्धावरुन असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या ठरावाचा अमेरिकेच्या सैनिकी कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही असे व्हाइट हाऊसने सांगितले.

अमेरिका-इराण शांतता करार (US-Iran Ceasefire)

सध्या अमेरिका-इराणमध्ये ६० दिवसांची युद्धबंदीची घोषणा करण्यात आली असून दोन्ही देशांत शांतता चर्चेला सुरुवात झाली आहे. स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे शांतता चर्चेची पहिली फेरी यशस्वी पार पडली आहे. यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा लवकरच सुरु पूर्णपणे जगभरातील देशांसाठी खुली झाली आहे.

ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी

परंतु दोन्ही देशांमध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावरुन वाद कायम आहे. नुकतेच ट्रम्प यांनी इराणने अणुनिरीक्षणास परवानगी देण्यास नकार दिला, तर दोन्ही देशांमधील सुरू असलेली तांत्रिक चर्चा थांबवली जाईल’, असा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने त्यांना वैयक्तिकरित्या निरीक्षणाचे आश्वासन दिले असून शांतता चर्चा सकारात्मकपण सुरु  आहे. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. परंतु ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिका-इराण करारानुसार तीन महिन्यांहून अधिक काळानंतर पश्चिम आशियामध्ये प्रस्थापित झालेली शांतता पुन्हा धोक्यात आली आहे.

रुबियो यांचा आखाती देशांचा दौरा

दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि कुवैत या देशांच्या दौऱ्यावर आहेत. याचा उद्देश अमेरिका-इराण शांतता करारावर या देशांचा संशय दूर करणे आहे.

आखीत देशांच्या मते, या करारामुळे होर्मुझवर इराणचे नियंत्रण वाढेल. तसेच या करारात इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणत्याही अटी नसल्यामुळे आखाती देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

Web Title: Us politics trump party rebels iran war resolution passed senate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.