अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना वाहली श्रद्धांजली; म्हणाले, शांत, सौम्य आणि...
वॉश्गिंटन: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर 2024 रोजी, 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतच नव्हे, तर संपूर्ण जग हळहळले आहे. शांत, संयमी आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे नेते म्हणून मनमोहन सिंग ओळखले जातात. त्यांच्या जाण्याने एका महान नेत्याची, विचारवंताची उणील जाणवेल. दरम्यान त्यांना देशभरातून अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देखील श्रद्धंजली अर्पण केली.
काय म्हणाले जो बायडेन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, “जिल आणि मी माजी भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारताच्या नागरिकांसोबत शोक व्यक्त करत आहोत. या कठीण काळात आम्ही त्यांच्याद्वारे स्थापित केलेल्या दृष्टिकोनाला कायम ठेवण्याचे आश्वासन देतो.” त्यांनी डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर, त्यांच्या तीन मुलांना, तसेच भारतीय जनतेला सांत्वना व्यक्त केली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचे भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्थानात मोठे योगदान आहे. 1991 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला जागतिक स्तरावर एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून प्रस्थापित केले. जागतिक आर्थिक संकटाचा सामना करताना त्यांच्या शांत आणि ठाम नेतृत्वाचा भारताला मोठा फायदा झाला. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ कायम स्मरणात राहील, कारण त्यांनी देशाच्या विकासाला गती दिली आणि जागतिक मंचावर भारताला प्रतिष्ठा मिळवून दिली.
जागतिक स्तरावरील प्रभाव
डॉ. सिंग यांचे योगदान फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते. जागतिक पातळीवरही त्यांना आदर मिळाला आहे. त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान मजबूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात मनमोहन सिंग यांना जाते. त्यांच्या कार्यकाळात भारताने जागतिक आर्थिक संकटावर यशस्वीरीत्या मात केली, ज्यामुळे त्यांची दूरदृष्टी स्पष्ट झाली.
दुनियाभरातून शोक व्यक्त
डॉ. सिंग यांच्या निधनानंतर भारत आणि जगभरातील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शांत, सौम्य आणि प्रगल्भ विचारांच्या नेतृत्वाची ओळख असलेल्या डॉ. सिंग यांना जागतिक नेत्यांनीही आदरांजली वाहून त्यांची प्रशंसा केली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या शांत, संयमी आणि विचारशील नेतृत्वामुळे त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्यामुळे आधुनिक भारताला नव्या दिशेने वाटचाल करण्याचा मार्ग सापडला, ज्याचे प्रभाव भविष्यातही जाणवत राहतील.