येमेनमधील संघर्षाला नवे वळण; काय असेल इस्त्रायलची नवीन रणनिती? पुढचे युद्धभूमीचे ठिकाण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: इस्त्रायल सेना सध्या विविध मोर्च्यांवर लढत आहे. इस्त्रायली सैन्याचे एकीकडे गाझा आणि लेबनॉनमध्ये हमास व हिजबुल्लाह या दहशतवादी गटांवविरोधात इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. तिसऱ्या बाजूल इस्त्रायल सीरियामध्ये बंडखोरांविरोधात मोठी भूमिका बजावत आहे. दरम्यान इस्त्रायलने येमेनमधील हुथी बंडखोरांवरही हल्ले केले आहेत. इस्त्रायल इराण समर्थित हूथी गटाला लक्ष्य करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल आणि हूथींमध्ये संघर्ष सुरू आहे.
इस्रायलने हूथी नियंत्रित भागांवर तीव्र हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी हूथींविरोधात ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. डिसेंबरच्या मध्यापासून इस्रायलने यमनमधील हूथी पायाभूत सुविधांवर पाच हवाई हल्ले केले. हे हल्ले हूथींनी इस्रायलवर केलेल्या 200 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र आणि 170 ड्रोन हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल होते. रेड सीमध्येही हूथी गट सक्रिय आहे, ज्यामुळे इस्रायलला जागतिक जलवाहतुकीच्या मार्गांवर धोक्याची भावना आहे.
इराणशी असलेले संबंध आणि आव्हाने
हूथी गट इराणच्या पाठिंब्यावर उभा असून, इस्रायल विरोधातील प्रतिरोधचा भाग बनला आहे. हमास व हिजबुल्लाह सध्या शांत राहिल्यामुळे इस्रायलसाठी हूथी हा महत्त्वाचा विरोधक बनला आहे. मात्र, येमेनमधील डोंगराळ भूप्रदेशामुळे हूथी गटाच्या मजबूत अड्ड्यांवर हल्ला करणे इस्रायलसाठी कठीण असल्याचे म्हटले जात आहे.
हूथींना इराणकडून पाठिंबा असूनही, त्यांचा कार्यभार अधिक स्वतंत्र आहे, यामुळे इराणच्या दबावाचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. हूथी गटांमध्ये हवाई हल्ल्यांचा सामना करण्याची क्षमता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून प्रतिकार टिकवून ठेवला आहे. त्यामुळे इस्रायलला त्यांच्या हालचाली रोखण्यासाठी केवळ हवाई हल्ले पुरेसे ठरणार नाहीत.
आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने हूथींविरोधात हवाई हल्ले सुरू ठेवले तरी व्यापक रणनीतीसाठी अमेरिकेसारख्या मित्र राष्ट्रांशी आणि अरब देशांशी सहकार्य गरजेचे ठरेल. लष्करी कारवाया व कूटनीतिक प्रयत्न यांचा योग्य समतोल साधूनच हूथी गटाची ताकद कमी करता येईल.
येमेनमधील संघर्ष आता पश्चिम आशियातील नवीन रणांगण ठरू शकते. इराणच्या पाठिंब्याने सशक्त झालेला हूथी गट, त्यांची भूगोलावर आधारित लढाऊ क्षमता, आणि इस्रायलसाठी निर्माण झालेला धोका यामुळे हा संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता कमी आहे.