मिशेल ओबामा यांचा कमला हॅरिसला पाठिंबा
वॉश्गिटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे आठ दिवस उरले आहेत. यामुळे सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. रिपब्लिकेन उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या निवडणुकीसाठी लढत सुरू आहे. दरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. मिशेलने या रॅलीत कमला हॅरिस यांना पाठिंबा देत, अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी पुरुषांना आव्हान दिले. ट्रम्प यांत्या विरोधात विजयी होण्यासाठी त्यांनी कमला हॅरिसला पाठिंबा दिला.
अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी पुरुषांना आव्हान केले
मिशेल ओबामा यांनी रॅलीदरम्यान पुरुषांना आवाहन केले की, त्यांनी योग्य मतदान केले नाही तर त्यांच्या पत्नी, मुली आणि आईला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांच्या डोळ्यांत बघून तुम्ही सांगू शकाल का की तुमच्यामुळे त्यांची संधी हिरावली गेली? मिशेलच्या समर्थनाने कमला हॅरिस यांच्यासाठी मोठे महत्त्व आहे कारण अमेरिकेतील कृष्णवर्णीय महिला मतदारांमध्ये मिशेलचा प्रचंड प्रभाव आहे. या रॅलीत मिशेल भावूक होत म्हणाल्या की, “कमला यांनी प्रत्येक प्रकारे सिद्ध केले आहे की त्या राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी तयार आहे. आता प्रश्न असा आहे की हा देश तयार आहे का?”
हे देखील वाचा- इस्रायलवर दहशतवादी हल्ला: मोसाद मुख्यालयाजवळ ट्रकने अनेकांना चिरडले; घटनेचा तपास सुरू
ट्रम्प यांनी मुस्लिम आणि अरब मतदारांचे समर्थन मागितले
तसेच दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये रॅली काढून मुस्लिम आणि अरब मतदारांचे समर्थन मागितले. या रॅलीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आणि त्यावर अमेरिकेची भूमिका पाहता, डेमोक्रॅटिक पक्षाबाबत मुस्लिम आणि अरब मतदारांमध्ये नाराजी आहे. याचा फायदा घेत ट्रम्प यांनी शांततेचे वचन दिल्याचे मुस्लिम नेते बेलाल अलझुहैरी यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी मागितले मुस्लिम आणि अरब मतदारांचे समर्थन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डेमोक्रॅटिक पक्षावर इस्रायलला योग्य पाठिंबा देत नसल्याचा आरोप- डोनाल्ड ट्रम्प
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर गभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्ष इस्रायलला योग्य पाठिंबा देत नसल्याचा आरोप केला. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. मात्र, 2017 मध्ये ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांतील लोकांच्या अमेरिकेत प्रवेशावर 90 दिवसांची बंदी घातली होती.
अमेरिकेत मुस्लिमांची लोकसंख्या एक टक्का असली तरी ते स्विंग स्टेट्समध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात. गाझा युद्धामुळे मुस्लिम मतदार एकवटले असून त्यांच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प दोघेही त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे देखील वाचा- खळबळजनक! डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरिस यांचा फोन डेटा हॅक; अमेरिकेचा चिनी हॅकर्सवर आरोप