फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरूसेलम: इस्त्रायलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. रमत हशारोन शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या 35 जणांना ट्रकने धडक दिली असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अडोम रेस्क्यू सर्व्हिसने दिली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने अचानक वेगाने बसस्थानकात घुसून अनेकांना चिरडले.
हमास आणि इस्लामिक जिहादशी संबंधित दहशतवादी गटाकडून हल्ल्याचे कौतुक
मीडिया रिपोर्टनुसार, हल्ला इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयाजवळ घडला. यामुळे इस्त्रायल याकडे लक्ष्यदेत असून याचा तपास सुरू आहे. इस्त्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक अरब नागरिक होता आणि त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, परंतु हमास आणि इस्लामिक जिहादशी संबंधित छोट्या दहशतवादी गटांनी या हल्ल्याचे कौतुक केले आहे.
हे देखील वाचा- इस्त्रायलचा पुन्हा एकदा उत्तरी गाझावर हल्ला; बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू
इस्त्रायली पोलिसांचे प्रवक्ते एएसआय अहारोनी यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, हल्लेखोराला निष्प्रभ करण्यात आले आहे, मात्र तो मारला गेला आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ल्याच्या वेळी इस्रायली नागरिक एका आठवड्याच्या सुट्टीनंतर कामावर परतत होते. तेल अवीवच्या ईशान्येकडील रमत हशारोन शहरातील प्रमुख महामार्ग जंक्शनजवळ असलेल्या बस स्थानकावर हा हल्ला झाला.
घटनेचा तापास सुरू
या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोसाद मुख्यालयाजवळ हल्ला घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्रायलमध्ये अशा घटनांनी सतर्कता वाढवली आहे, आणि सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्याचे पूर्ण तपास सुरु केले आहे. जखमींचे उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
अशा घटनांमुळे इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नव्याने सामोरे जावे लागणार आहे. इस्त्रायली जनतेला या परिस्थितीचा सामना करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील.