Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War : एकीकडे पाठवला शांती प्रस्ताव, तर दुसरीकडे मध्यपूर्वेत 2000 US सैनिक तैनात; ट्रम्पच्या ‘एका’ निर्णयावर जगाचे भवितव्य

US-Iran War: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने आणखी २,००० सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले असून, त्यामुळे मध्य पूर्वेतील अमेरिकी सैनिकांची एकूण संख्या ७,००० झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 25, 2026 | 11:22 AM
us sends 2000 more troops to middle east operation epic fury iran trump plan 2026

us sends 2000 more troops to middle east operation epic fury iran trump plan 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • लष्करी बळात मोठी वाढ
  • ट्रम्प यांची दुहेरी चाल
  • ऑपरेशन एपिक फ्युरी

US sends 2000 more troops to Middle East : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता एका अशा वळणावर आला आहे जिथे ‘शांती’ आणि ‘विनाश’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला शांततेचा प्रस्ताव पाठवून जगाला आशेचा किरण दाखवला खरा, पण जमिनीवरील परिस्थिती काही वेगळंच सांगत आहे. पेंटागॉनने अमेरिकन लष्कराच्या अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या ८२ व्या ‘एअरबोर्न डिव्हिजन’मधील २,००० सैनिकांना तातडीने मध्य पूर्वेकडे रवाना होण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांचा हा पवित्रा म्हणजे “बोलणी शांततेची, पण तयारी युद्धाची” असा आहे.

१८ तासांत हल्ला करण्याची क्षमता: कोण आहेत हे सैनिक?

पेंटागॉनने तैनात केलेले हे २,००० सैनिक ‘इमिजिएट रिस्पॉन्स फोर्स’चे (तात्काळ प्रतिसाद दल) भाग आहेत. या दलाचे वैशिष्ट्य असे की, हे सैनिक जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात केवळ १८ तासांच्या आत पोहोचून मोठी लष्करी कारवाई करू शकतात. मेजर जनरल ब्रँडन आर. टेग्टमेयर यांच्या नेतृत्वाखालील ही तुकडी आता इराणच्या अगदी जवळ तैनात केली जाणार आहे. यापूर्वीच ४,५०० मरीन सैनिक त्या भागात पोहोचले असून, आता एकूण ७,००० भूदल सैनिक इराणच्या लष्करी तळांना घेरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Ceasefire: ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘अशा’ अशक्य अटींचा डोंगर

टार्गेट खारग बेट आणि होर्मुझची सामुद्रधुनी

लष्करी तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा मुख्य उद्देश इराणची आर्थिक नस दाबणे हा आहे. इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र असलेले ‘खारग बेट’ ताब्यात घेण्यासाठी या नवीन सैनिकांचा वापर केला जाऊ शकतो. जर अमेरिकेने खारग बेटावर ताबा मिळवला, तर इराणची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. त्यासोबतच, इराणने बंद केलेली जगाची ‘लाईफलाईन’ म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बळाचा वापर करून उघडण्यासाठी ३१ व्या एक्सपेडिशनरी युनिटमधील २,३०० मरीन सैनिक या आठवड्याच्या शेवटी दाखल होणार आहेत.

BREAKING: President Trump says he is considering “winding down” Middle East military operation even as the U.S. sends more troops to region. https://t.co/EMq8AwyPC9 — The Associated Press (@AP) March 20, 2026

credit – social media and Twitter

ऑपरेशन एपिक फ्युरी: ५०,००० सैनिकांचा महावेढा

हे युद्ध केवळ काही हजार सैनिकांपुरतं मर्यादित नाही. पेंटागॉनने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) अंतर्गत संपूर्ण मध्य पूर्व, युरोप आणि अमेरिकेतून एकूण ५०,००० सैनिकांना अलर्टवर ठेवले आहे. इराणने जर अमेरिकेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर हे ५०,००० सैनिक एकाच वेळी इराणच्या विविध लष्करी आणि ऊर्जा प्रकल्पांवर तुटून पडण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेने इराणच्या ९० हून अधिक लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव करून आपली ताकद दाखवून दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट

 ट्रम्प यांची ‘डिप्लोमसी विथ सोल्डर्स’

ट्रम्प यांचा हा जुनाच पॅटर्न आहे – एका हाताने चर्चेचा प्रस्ताव द्यायचा आणि दुसऱ्या हाताने तलवारीची धार दाखवायची. इराणने जर १५-कलमी शांतता योजना स्वीकारली नाही, तर एप्रिलच्या मध्यापर्यंत आणखी हजारो मरीन सैनिक या युद्धात उतरणार आहेत. आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे; त्यांनी शांतता निवडायची की ७,००० अमेरिकन सैनिकांचा सामना करायचा, हे त्यांनाच ठरवावे लागेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने मध्य पूर्वेत किती नवीन सैनिक तैनात केले आहेत?

    Ans: अमेरिकेने नुकतेच २,००० अतिरिक्त पॅराट्रूपर्स तैनात केले असून, यामुळे एकूण अतिरिक्त भूदलांची संख्या ७,००० वर पोहोचली आहे.

  • Que: 'ऑपरेशन एपिक फ्युरी' नक्की काय आहे?

    Ans: हे पेंटागॉनचे एक मोठे लष्करी ऑपरेशन असून, या अंतर्गत इराणविरुद्धच्या कारवाईसाठी ५०,००० सैनिक हाय-अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.

  • Que: अमेरिकेचे मुख्य टार्गेट काय आहे?

    Ans: इराणचे तेल निर्यात केंद्र असलेले 'खारग बेट' ताब्यात घेणे आणि बंद झालेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा उघडणे हे अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: Us sends 2000 more troops to middle east operation epic fury iran trump plan 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran US Ceasefire: ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘अशा’ अशक्य अटींचा डोंगर
1

Iran US Ceasefire: ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘अशा’ अशक्य अटींचा डोंगर

World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
2

World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट

US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा
3

US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा

Strait Of Hormuz: ‘आम्ही या नाटकात नाही’ इस्रायलचा ट्रम्पला घरचा आहेर; अमेरिकेच्या ’15 कलमी’ चक्रव्यूहात अडकणार इराण?
4

Strait Of Hormuz: ‘आम्ही या नाटकात नाही’ इस्रायलचा ट्रम्पला घरचा आहेर; अमेरिकेच्या ’15 कलमी’ चक्रव्यूहात अडकणार इराण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.