Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait Of Hormuz: ‘आम्ही या नाटकात नाही’ इस्रायलचा ट्रम्पला घरचा आहेर; अमेरिकेच्या ’15 कलमी’ चक्रव्यूहात अडकणार इराण?

Strait Of Hormuz : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठीच्या वाटाघाटी वेगाने पुढे सरकत आहेत. दरम्यान, अमेरिकेने तेहरानसमोर एक १५-कलमी योजना सादर केली आहे. ही योजना पाकिस्तानमार्फत तेहरानला पाठवण्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 25, 2026 | 08:53 AM
us 15 point plan to end iran war pakistan mediator hormuz nuclear deal 2026

us 15 point plan to end iran war pakistan mediator hormuz nuclear deal 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेची ‘शांती’ खेळी
  • होर्मुझ आणि अणुप्रकल्प
  • इस्रायलची भूमिका

US 15-point plan for Iran 2026 : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका (US-Israel Iran War) यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. मात्र, आता या विनाशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध कायमचे संपवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त ‘१५-कलमी’ योजना तयार केली आहे. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव थेट न पाठवता पाकिस्तानच्या माध्यमातून तेहरानपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

युरेनियम संवर्धन आणि होर्मुझचा पेच

या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित आहे. अमेरिकेने मागणी केली आहे की, इराणने आपल्या भूमीवर सुरू असलेले युरेनियम संवर्धन तात्काळ आणि पूर्णपणे थांबवावे. तसेच, आतापर्यंत संवर्धित केलेले सर्व युरेनियम परदेशात हस्तांतरित करावे. या बदल्यात, इराणने रोखून धरलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा व्यापारासाठी खुली करावी लागणार आहे. ही तीच जागा आहे जिथून जगातील २०% कच्च्या तेलाची वाहतूक होते. इराणने हा मार्ग रोखल्यामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या होत्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : March 25 : इतिहासातील तो ‘काळा’ डाग आणि मानवतेचा हुंकार; गुलामगिरीचे चटके अन् बेपत्ता वीरांच्या बलिदानाची विदारक कहाणी

इराणचा फायदा काय? निर्बंधातून मुक्ती!

इराण हा प्रस्ताव का मान्य करेल? याचे उत्तर या योजनेच्या दुसऱ्या बाजूत आहे. जर इराणने या १५ अटी मान्य केल्या, तर अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध उठवले जातील. इतकेच नाही, तर इराणला त्यांच्या ‘बुशेहर’ अणुप्रकल्पात नागरी वापरासाठी (वीज निर्मितीसाठी) अणुऊर्जा विकसित करण्यासाठी अमेरिका स्वतः मदत करणार आहे. या प्रस्तावात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, यात इराणमधील सत्तापालटाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्यामुळे इराणी नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

BREAKING: The US has sent Iran a 15-point plan to end the US-Israel war, a source told Reuters, with The New York Times reporting it was delivered via Pakistan, citing two officials. 🔴 LIVE updates: https://t.co/uc5N2KCV5i pic.twitter.com/vWF3uvnKzq — Al Jazeera English (@AJEnglish) March 24, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलचा ‘नो एन्ट्री’ पवित्रा

एकीकडे अमेरिका शांतीचा मार्ग शोधत असताना, त्यांचा सर्वात जवळचा मित्र इस्रायल मात्र या चर्चेत कुठेही दिसत नाहीये. इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत डॅनी डॅनॉन यांनी स्पष्ट केले की, “आम्ही या कोणत्याही चर्चेत सहभागी नाही.” इस्रायलचा असा विश्वास आहे की इराणवरील लष्करी हल्ल्यांमुळे बरेच काही साध्य झाले आहे आणि आता चर्चा करण्याऐवजी इराणची ताकद पूर्णपणे नष्ट करणे गरजेचे आहे. इस्रायलची ही भूमिका भविष्यात या शांती प्रस्तावात अडथळा ठरू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Save Himalayas: हिमालयात दुप्पट वेगाने वितळतोय बर्फ; 2 अब्ज लोकांची तहान भागवणाऱ्या ‘आशियाच्या जलकुंभा’ला लागली गळती, वाचा कारण

जगासाठी दिलासा की नव्या संघर्षाची नांदी?

जर हा १५-कलमी प्रस्ताव यशस्वी झाला आणि एक महिन्याचा युद्धविराम लागू झाला, तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील आणि शेअर बाजारात पुन्हा तेजी येईल. मात्र, इस्रायलची नाराजी आणि इराणची संशयी वृत्ती पाहता, ही योजना प्रत्यक्षात कशी उतरते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेचा १५-कलमी प्रस्ताव नक्की काय आहे?

    Ans: हा प्रस्ताव इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी असून, यात अणुकार्यक्रम थांबवणे आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे या मुख्य अटी आहेत.

  • Que: या वाटाघाटीत पाकिस्तानची भूमिका काय आहे?

    Ans: अमेरिका आणि इराणमध्ये थेट संवाद नसल्यामुळे अमेरिकेने आपला हा अधिकृत प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून इराण सरकारपर्यंत पोहोचवला आहे.

  • Que: इस्रायल या शांती प्रक्रियेला विरोध का करत आहे?

    Ans: इस्रायलला वाटते की चर्चा करण्यापेक्षा लष्करी कारवाई करून इराणचे अणुप्रकल्प कायमचे नष्ट करणे हाच सुरक्षेचा एकमेव मार्ग आहे.

Web Title: Us 15 point plan to end iran war pakistan mediator hormuz nuclear deal 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • iran
  • Israel
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

इराण युद्ध थांबणार? Donald Trump यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना फोन! जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
1

इराण युद्ध थांबणार? Donald Trump यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना फोन! जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत

Middle East War : अली लारीजानीनंतर ‘या’ कमांडरच्या हाती इराणची सुरक्षा सुत्रे; अमेरिका-इस्रायलची उडणार झोप? 
2

Middle East War : अली लारीजानीनंतर ‘या’ कमांडरच्या हाती इराणची सुरक्षा सुत्रे; अमेरिका-इस्रायलची उडणार झोप? 

भारताला मोठा दिलासा! 92,600 टन गॅस घेऊन दोन जहाजे ‘होर्मुज’मधून सुखरूप बाहेर; पाहा कधी पोहोचणार मायदेशात?
3

भारताला मोठा दिलासा! 92,600 टन गॅस घेऊन दोन जहाजे ‘होर्मुज’मधून सुखरूप बाहेर; पाहा कधी पोहोचणार मायदेशात?

Iran Leadership : इराणच्या सत्तेचे गूढ कायम! नवा सर्वोच्च नेता ‘गायब’ मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत?
4

Iran Leadership : इराणच्या सत्तेचे गूढ कायम! नवा सर्वोच्च नेता ‘गायब’ मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.