
अमेरिकेचा मोठा निर्णय! ७५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया बंद (Photo Credit- X)
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेल्या मेमोरँडमनुसार, हा निर्णय “अर्जदारांची अत्यंत कठोर तपासणी” करण्यासाठी घेण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा आता व्हिसा देण्याच्या जुन्या कायद्यांची समीक्षा करणार असून, अर्जदारांच्या मूल्यमापनाच्या पद्धती पुन्हा एकदा तपासून पाहिल्या जाणार आहेत. नवीन सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत संबंधित ७५ देशांच्या नागरिकांना व्हिसा नाकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या ७५ देशांच्या यादीवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत, त्यामध्ये अनेक मोठ्या देशांचा समावेश आहे. रशिया, ब्राझील, थायलंड, सोमालिया, इराण, अफगाणिस्तान, नायजेरिया, इराक, इजिप्त आणि येमेन. या देशांतील अशा नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखणे हा मुख्य उद्देश आहे, जे स्वतःच्या उत्पन्नापेक्षा अमेरिकेच्या सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची शक्यता जास्त आहे.
US visa cancellation: ट्रम्प सरकारचा मोठा झटका! 1 लाखांहून अधिक व्हिसा केले रद्द
अमेरिकेच्या या कडक भूमिकेमागे मिनेसोटा येथे झालेला एक मोठा आर्थिक घोटाळा कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. मिनेसोटामध्ये टॅक्सपेअर्सच्या पैशातून चालणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांमध्ये सोमाली-अमेरिकन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघड झाले होते. या फ्रॉडनंतर प्रशासनाने परदेशी नागरिकांच्या स्क्रीनिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सोमालियासारख्या देशांवर आता पैनी नजर ठेवली जात आहे.
यापुढे अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी केवळ कागदपत्रे पुरेशी नसतील. नव्या नियमांनुसार खालील गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. जास्त वय आणि अधिक वजन असलेल्या अर्जदारांना व्हिसा नाकारला जाऊ शकतो, कारण त्यांच्यामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता असते. ज्यांनी यापूर्वी कधीही सरकारी रोख मदत किंवा सबसिडी घेतली आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद होऊ शकतात. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक राजकारणात आणि पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २१ जानेवारीनंतर या ७५ देशांतील नागरिक कोणत्याही कारणासाठी अमेरिकन व्हिसा मिळवू शकणार नाहीत.